घरमनोरंजनVideo: अभिनेत्री इशिता दत्तालाही 'मधुमास' गाण्याची भुरळ

Video: अभिनेत्री इशिता दत्तालाही ‘मधुमास’ गाण्याची भुरळ

Subscribe

अभिनेता अजय देवगण याच्या ‘दृश्यम’ सिनेमात दमदार भुमिका करणारी इशिता दत्ता सध्या आपल्या प्रेग्नेंसीमुळे फार चर्चेत आहे. ती लवकरच आई बनणार आहे. इशिता दत्ता आपल्या प्रेग्नेंसीदरम्यान फार आनंदीत दिसून येत आहे. त्याचसोबत वत्सल सेठ आणि त्याच्या परिवाराकडून सुद्धा तिची काळजी घेतली जातेय. अशातच इशिताचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. त्यात ती मराठी सिनेमा ‘महाराष्ट्र शाहीर’ मधील ‘बहरला हा मधुमास’ गाण्यावर डान्स करताना दिसून येत आहे.

इशाताने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता.त्यात ती तन्वी ठक्कर हिच्यासोबत बहरला हा मधुमासवर डान्स करताना दिसतेय. या दोघींचा व्हिडिओ पाहून युजर्स आता विविध प्रतिक्रिया देत असून त्यांना काळजी ही घेण्यास सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ishita Dutta Sheth (@ishidutta)

- Advertisement -

अभिनेत्री इशिचासह तन्वी ठक्कर सुद्धा आई बनणार आहे. तन्वीने नुकत्याच काही दिवसांपूर्वी आपल्या बेबीशॉवरची एक ग्रँन्ड पार्टी सुद्धा ठेवली होती. त्यात तन्वीने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. आपला लूकला शोभेल अशी गोल्ड ज्वेलरी आणि न्यूड मेकअप केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -