Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'JGM' चित्रपटातून पहिल्यांदाच vijay deverakonda आणि pooja hegde दिसणार एकत्र

‘JGM’ चित्रपटातून पहिल्यांदाच vijay deverakonda आणि pooja hegde दिसणार एकत्र

Subscribe

टॉलिवूडचा सुपरस्टार विजय देवरकोंडा सध्या एका मागे एक नवनवीन चित्रपट घेऊन येत आहे. नुकताच त्याने त्याच्या लाइगर चित्रपटाचे चित्रीकरण अभिनेत्री समंथा प्रभूसोबत पूर्ण केले असून विजयने आता ‘जेजीएम’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात केली आहे. या चित्रपटात विजय देवरकोंडा एका आर्मी ऑफिसच्या भूमिकेत दिसणार असून मागील काही दिवसांपूर्वी निर्मात्यांकडून चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्यावेळी विजय देवरकोंडा सोबत कोणती अभिनेत्री असणार याचा खुलासा झाला नव्हता. मात्र आता ‘जेजीएम’मधील मुख्य अभिनेत्रेच नाव समोर आले आहे.

‘जेजीएम’ चित्रपटात ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत
चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक शेअर करत अभिनेत्री पूजा हेगडेच स्वागत केले आहे. नुकतेच या चित्रफटाते शूटिंग सुरू झाले असून अभिनेत्री पूजा हेगडेने संबंधित फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.

- Advertisement -

‘जेजीएम’ चित्रपटातून पहिल्यांदाच पूजा हेगडे आणि विजय देवरकोंडा एकत्र


‘जेजीएम’ चित्रपटातून पहिल्यांदाच पूजा हेगडे आणि विजय देवरकोंडा ही जोडी पहिल्यांदा एकत्र काम करणार आहेत. त्यामुळे यांची जोडी नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल. याशिवाय पूजा हेगडे येत्या काळात सलमान खानसोबत ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. तसेच ती रणवीर सिंहच्या ‘सर्कस’ चित्रपटामध्ये सुद्धा दिसणार असून महेश बाबूसोबत सुद्धा आगामी चित्रपटात झळकणार आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा :http://मराठमोळ्या सई ताम्हणकरने पटकावला IIFA 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -