Vikram : ‘विक्रम’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी केली ॲडव्हान्स बुकिंगद्वारे इतक्या कोटींची कमाई

तमिळ बॉक्स ऑफिसने ॲडव्हान्स बुकिंगद्वारे सर्वाधिक तिकिटे विकलेली आहेत. तमिळ बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंग तिकिट विकून आत्तापर्यंत 14.35 कोटींची कमाई केली आहे.

तमिळ चित्रपटाचे सुपरस्टार अभिनेता कमल हासनचा बहुचर्चित ‘विक्रम’ चित्रपट आज प्रदर्शित झाला. या चित्रपटात कमल हासनसोबत विजय सेतुपति आणि फहाद फासिल हे सुद्धा प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. लोकेश कनगराज यांनी दिग्दर्शित केलेला ‘विक्रम’ चित्रपटाचे प्रदर्शित होण्याआधीच ॲडव्हान्स बुकिंगद्वारे कोटींची कमाई केली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार कमल हासनच्या ‘विक्रम’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी ॲडव्हान्स बुकिंगद्वारे 15 कोटींची कमाई केली आहे. मीडिया रिपोर्ट्सच्या मते, तमिळ बॉक्स ऑफिसने तमिळ बॉक्स ऑफिसने ॲडव्हान्स बुकिंगद्वारे सर्वाधिक तिकिटे विकलेली आहेत. बुकिंगद्वारे सर्वाधिक तिकिटे विकलेली आहेत. तमिळ बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंग तिकिट विकून आत्तापर्यंत 14.35 कोटींची कमाई केली आहे. त्यानंतर तेलगू बॉक्स ऑफिसवर विक्रम चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगद्वारे 68 लाखांची कमाई केली आहे. तसेच हिंदी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगद्वारे 27 लाखांची कमाई केली आहे. सर्व  बुकिंग एकत्र करून ‘विक्रम’ चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगद्वारे 15.30 कोटींची कमाई केली आहे.

‘विक्रम’ चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच 200 कोटींची कमाई
‘विक्रम’ चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच 200 कोटी रूपये कमावले आहेत. रिपोर्टच्या माहितीनुसार, या चित्रपटाने मोठी रक्कम डिजिडल आणि सेटेलाइट राइट्स विकून मिळवलेले आहेत. त्यामुळेच हा चित्रपट प्रदर्शनानंतर आता बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई नक्कीच करू शकतो.

आईएमडीबी रेटिंगमध्ये नंबर 1 चा रॉकिंग मिळवला होता
या चित्रपटाबाबत आश्चर्याची गोष्ट अशी आहे की, या चित्रपटाला आईएमडीबी 2022 ची सर्वात जास्त बहुप्रतिक्षित चित्रपटांच्या यादीमध्ये टॉप पोजिशन मिळालेली आहे. शिवाय या चित्रपटानंतर दुसऱ्या क्रमाकांवर ‘मेजर’ चित्रपट आहे. तसेच तिसऱ्या क्रमांकावर अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपट आहे. अशातच आता कमल हासनचा ‘विक्रम’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे.

 

 


हेही वाचा :http://Vikram VS Major VS Samrat Prithviraj : ‘फ्रायडे’ला बॉक्स ऑफिसवर ‘काटे की टक्कर’; कोणता सिनेमा ठरणार ‘सुपरहिट’