घरमनोरंजनएसटी स्टँडवरच पहा सिनेमा

एसटी स्टँडवरच पहा सिनेमा

Subscribe

स्थानकांवर मिनी थिएटर उभारणार

राज्याच्या एसटी महामंडळाच्या स्टँडवर मिनी थिएटर्स उभारली जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.लवकरच एसटी स्टँडवर खासगी आणि सार्वजनिक भागीदारीतून 60 आसनांचे हे मिनी थिएटर बांधण्यात येणार आहे. त्यामुळे बसची वाट पाहात थांबलेल्यांना आपला वेळ चित्रपट पाहत घालवता येणार आहे.

महाराष्ट्रातील विविध भागातील एसटी बसमधून दररोज 6० लाख प्रवासी प्रवास करीत असतात. प्रवासाच्या निमित्ताने बस स्टँडवर येणार्‍या प्रवाशांना मनोरंजनाची सुविधा मिळावी आणि त्यांचा वेळ आनंदाने जावा या उद्देशातून एसटी स्टँडवरच छोटेखानी चित्रपटगृहे उभारण्यात येणार आहेत.

- Advertisement -

राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून ही कामे केली जाणार आहेत. लवकरच चित्रपटगृहांच्या उभारणीसाठी आर्किटेक्टची नियुक्ती करण्यात येईल. राज्यात नव्याने उभारण्यात येत असलेल्या 100 नवीन एसटी स्थानकांपैकी काही निवडक स्थानकांमध्ये चित्रपटगृहांची निर्मिती करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -