घरताज्या घडामोडीकोरोनाच्या भीतीने मलायका विसरली पँट घालायला!

कोरोनाच्या भीतीने मलायका विसरली पँट घालायला!

Subscribe

कोरोना व्हायरसचा धोका कळल्यानंतर त्याबद्दलची भीती अजून लोकांमध्ये तितकीच आहे. लोकं फेस मास्क घालण्यापासून सतत हात धुण्यापर्यंत सतर्क राहत आहेत. कोरोनाच्या भीतीपोटी बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने आपल्यासोबत घडलेला एक किस्सा सांगितला आहे. मलायकाने हा किस्सा इन्स्टाग्रामच्या स्टोरीद्वारे सांगितला आहे. जो वाचून तिचे सर्व चाहते हैराण झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

मलायकाने इन्स्टाग्रामच्या एका स्टोरीमध्ये लिहिले आहे की, ‘जेव्हा पहिल्यांदा घरी लोकं येत होते. तेव्हा मी त्यांना सांगत होती की, घाबरू नका मी माझ्या कुत्र्याला लस टोचली आहे. आता मी त्यांना सांगते, घाबरू नका, आम्ही लस घेतली आहे.’

- Advertisement -

त्यानंतर तिने नंतरच्या स्टोरीमध्ये लिहिले आहे की, ‘आपण सर्वजण क्रेजी झालो आहोत. एके दिवशी मी एक रेस्टॉरंटच्या बाथरुममध्ये गेली होती. मी कोपराने बाथरुमचा दरवाजा उघडला. त्यानंतर माझ्या पायाने मी टॉयलेटची सीट उघडली. मग टिश्यूच्या मदतीने मी पाण्याचा नळ उघडला. आपले हाथ धुतले. त्यानंतर बाहेर येण्यासाठी कोपऱ्याच्या मदतीने बाथरुमचा दरवाजा उघडला आणि जेव्हा मी परत टेबलवर आली. तेव्हा मला कळाले की, मी पँट घालायला विसरले.’ यासोबत मलायकाने लाफिंग इमोज टाकले आहेत.

- Advertisement -

दरम्यान मलायकाने ७ सप्टेंबर २०२० आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. त्यानंतर ती होम क्वारंटाईन झाली आणि तिने कोरोनासोबत लढाई जिंकली. मलायका नेहमी आपल्या फॅशन आणि फिटनेसमुळे नेहमी चर्चेत असते. पण आता मलायका तिच्यासोबत घडलेल्या भन्नाट गोष्टीमुळे चर्चेत आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)


हेही वाचा – Coronavirus: आमिर खानला कोरोनाची लागण, दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांशी झाली होती भेट


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -