घरमनोरंजनसोहम स्वीकारेल का अभिजीत आणि आसावरीचं नातं?

सोहम स्वीकारेल का अभिजीत आणि आसावरीचं नातं?

Subscribe

झी मराठी वाहिनीवरील ‘अग्गंबाई सासूबाई’ ही मालिका चांगलीच गाजत आहे. या मालिकेत सासू आणि सूनेच्या अनोख्या आणि प्रेमळ नात्याचं बंधन एका वेगळ्या पद्धतीने दाखवण्यात आलं आहे. मालिकेचं नाविन्य, त्याची आगळी-वेगळी कथा, निवेदिता सराफ-गिरीश ओक ही जोडी, इत्यादी. या सगळ्यांमुळे मालिकेने अल्पशा कालावधीतचं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली आहे. सध्या या मालिकेमध्ये आसावरी आणि अभिजीत राजे यांच्या नात्याचा प्रवास वेगळ्या वळणावर आला आहे. अभिजीत राजे यांनी आसावरीवर असलेल्या प्रेमाबाबत तिच्या समोर खुलासा केला आहे. त्यामुळे या मैत्रीचं नातं दिवसेंदिवस दृढ होतं आहे. मात्र सोहमला अभिजीत राजेंना आसावरी आवडतं असल्याचं समजलं आहे. याबाबत नुकताचं भाग प्रसारित झालेला आहे.

सोहम अभिजीत राजे आणि आसावरी मंदिरात भेटणार असल्याचे चोरुन ऐकतो आणि तो त्यांची भेट होऊन द्यायची नाही हे ठरवितो. त्यामुळे तो आसावरीचा फोन पाण्यात फेकून देतो. तसंच तो आजोबांना आसावरीला गावाला पाठविण्याबाबत सांगून प्लानिंग आखतो. पण आजोबा सोहमला आसावरीसोबत जायला सांगतात. हे सगळं घडतं असताना अभिजीत राजे आसावरीची मंदिरात वाट पाहत असतात. आसावरी सोहमला अभिजीत यांना भेटत असल्याचं सांगते. मग सोहम तिला जाताना भेटूया असं सांगतो. जेव्हा ते गावी जायला निघतात तेव्हा मंदिराजवळ रिक्षा थांबवून आसावरी देवळात जातं असल्याचं सांगते. मात्र सोहम तिला जाऊ देत नाही. बऱ्याचं वेळापासून अभिजीत राजे आसावरीची वाट पाहतं बसलेले असतात.

- Advertisement -

पण आता सोहम ऑफिसचं काम असल्याचं सांगून आसावरीला एकटचं गावी जायला सांगत आहे. त्यात त्याने आसावरीला चुकीच्या बसमध्ये बसवले आहे. याबाबत जेव्हा आसावरीला समजतं तेव्हा तिचा गोंधळ उडतो. तर दुसरीकडे वाट पाहतं असलेले अभिजीत राजे निघून जातात. मात्र त्यावेळी बसच्या बाजूला अभिजीत राजेंची गाडी सिग्नला थांबते. त्यादरम्यान आसावरी चुकीच्या बसमध्ये बसल्याचे कंडक्टरला सांगण्याचा प्रयत्न करत असते. त्याचवेळी लोक अभिजीत राजे म्हणून ओरडू लागतात. यासर्व गोष्टी पुढील भागात घडणारं आहेत. त्यामुळे आता सोहम आसावरी आणि अभिजीत राजे यांच्या नात्याला स्वीकारतो की नाही? हे येत्या काळात कळेलं.

- Advertisement -

हेही वाचा – साऊथ आफ्रिकेची जोजिबीनी टुंजी ठरली यंदाची मिस युनिव्हर्स!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -