घरमनोरंजन'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेत प्रिया मराठेची एंट्री

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेत प्रिया मराठेची एंट्री

Subscribe

स्वीटूला जरी मोहित सोबत झालेलं लग्न मान्य नसलं तरी ती घरच्यांसाठी ती खुश आहे असं त्यांना भासवून चेहऱ्यावर खोटं हसू आणतेय. ओम आणि स्वीटू एकत्र यावे अशी प्रेक्षकांची सुद्धा इच्छा आहे. त्यामुळे या मालिकेत अजून एक रंजक वळण येणार आहे.

झी मराठीवरील(zee mrathi) ‘येऊ कशी तशी मी नांदायला'(yeu  kashi tashi mi nandayla) या मालिकेत ओम स्वीटू (om and sweetu) यांच्या लग्न विशेष भागानंतर एक विलक्षण आलं ते म्हणजे स्वीटूच लग्न ओम सोबत न होता मोहित सोबत होतं. स्वीटूला अजूनही माहित नाही आहे कि ओम लग्नाच्या दिवशी कुठे होता आणि ओम स्वीटूच्या प्रेमाखातर तिला हे सत्य कळू देत नाही आहे. स्वीटूला जरी मोहित सोबत झालेलं लग्न मान्य नसलं तरी ती घरच्यांसाठी ती खुश आहे असं त्यांना भासवून चेहऱ्यावर खोटं हसू आणतेय. ओम आणि स्वीटू एकत्र यावे अशी प्रेक्षकांची सुद्धा इच्छा आहे. त्यामुळे या मालिकेत अजून एक रंजक वळण येणार आहे. ओम आणि स्वीटूला एकत्र आणण्यासाठी या मालिकेत एका नवीन चेहऱ्याची एंट्री होणार आहे. अभिनेत्री प्रिया मराठे आता या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ती मालिकेत एका सकारात्मक भूमिकेत दिसणार असून तिच्यामुळे ओम आणि स्वीटू पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत.(yeu kashi tashi mi nandayla sireal new marathi actress to enter)

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Marathe (@priyamarathe)

- Advertisement -

या भूमिकेबद्दल बोलताना प्रिया म्हणाली, “येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत अशा विलक्षण वळणावर माझ्या व्यक्तिरेखेची एंट्री होणार आहे याचा मला खूप आनंद आहे. हि मालिका खूप जास्त लोकप्रिय आहे आणि या मालिकेत प्रेक्षकांचे लाडके ओम आणि स्वीटू यांना पुन्हा एकदा एकत्र आणण्यात माझ्या व्यक्तिरेखेचा खूप मोठा हात असणार आहे त्यामुळे मी जास्त उत्सुक आहे. मी एका सकारात्मक पण तितकीच ठसकेबाज भूमिका निभावतेय त्यामुळे ती प्रेक्षकांना देखील प्रचंड आवडेल याची मला खात्री आहे.”


हे हि वाचा – ‘क्या मेरी सोनम गुप्ता बेवफा है?’ अभिनेत्री सुरभि ज्योती देणार बहुचर्चीत प्रश्नाचे उत्तर

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -