रेहाना पंडिताच्या प्रेमात जीशान खान झाला वेडा, किस करतानाच फोटो केला शेअर

Zeeshan Khan Confirms Dating Reyhna Pandit; Bigg Boss OTT Fame Shares Intimate Picture With Her
११ वर्ष मोठ्या रेहाना पंडिताच्या प्रेमात वेडा झालाय जीशान खान, शेअर केला kiss करतानाचा Photo

गेल्या काही दिवसांपासून लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ ओटीटीचा स्पर्धक जीशान खान आणि ‘कुमकुम भाग्य’ फेम अभिनेत्री रेहाना पंडित यांच्या अफेअरची जोरदार चर्चा होती. मात्र आज अखेर जीशान खानने रेहानासोबतचे नाते जगजाहीर केले आहे. जीशानने रेहानाला लिपलॉक किस करतानाचा एक रोमँटिक फोटो शेअर करत त्यांच्या नात्याला ऑफिशियल केले आहे.

टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘कुमकुम भाग्य’ यामध्ये रेहाना आणि जीशान याने आई आणि मुलाची भूमिका केली होती, यात रेहाना आईच्या तर जीशान मुलाच्या भूमिकेत दिसला होता. मात्र आज पडद्यावरील आई आणि मुलगी ही जोडी खऱ्याखुऱ्या आयुष्यात प्रियकर-प्रेयसी झाले आहेत. रेहाना जीशानपेक्षा ११ वर्षांनी मोठी आहे आणि दोघेही एकमेकांना डेट करत आहेत.

जीशानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर करत एक रोमँटिक नोट लिहिली आहे. या नोटमध्ये जीशानने लिहिले की, माझ्या प्रिय मैत्रिणीपासून ते माझी प्रेयसी होण्यापर्यंत, माझ्या आनंदापासून माझ्या मनःशांतीपर्यंत, मला जशी पाहिजे होती तशीच आहेस तू. तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण जो मी तुझ्यासोबत घालवतो, प्रत्येक श्वास मी तुझ्या समोर घेतो… माझे हृदय प्रेमाने भरुन टाकले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zeeshan Khan (@theonlyzeeshankhan)


जीशीनने पुढे लिहिले की, मला लोकं वेड्यात काढण्याचा प्रयत्न करतील, अनेकांना वाटू शकते की असे प्रेम खरे असू शकत नाही. पण लोकांकडे नसलेल्या गोष्टींवर त्यांचा विश्वास नाही. जे जादुई आहे ते एखाद्या परीकथेपेक्षा कमी नाही. तू माझी आहेस आणि मी सर्वांना सांगत आहे की तू माझी आहेस.. मी तुझ्यावर प्रेम करतो, आणि माझी इच्छा आहे प्रत्येकाला आपण अनुभवतोय तसे प्रेम मिळावे. अशी पोस्ट जीशान खान याने केली आहे.

जीशानच्या या सुंदर पोस्टवर त्याची गर्लफ्रेंड रेहाना पंडित हीनेही कमेंट केली आहे. रेहानाने लिहिले आहे की, ‘ मला लाज वाटतेय, मी भावूक झाले आहे, आय लव्ह यू जान’. मला खूप प्रेम देण्यासाठी धन्यवाद, नेहमी असाच रहा. त्यांच्या या फोटोवर दोघांचे चाहते त्यांच्या शुभेच्छा देत आहेत आणि त्यांच्या प्रेमाचा वर्षाव करत आहेत.