घरफिचर्सजन्म मुंबई आकाशवाणीचा!

जन्म मुंबई आकाशवाणीचा!

Subscribe

विद्युत चुंबकीय लहरी वातावरणातून पुढे जाण्याची शक्यता जेम्स मॅक्सवेलने १८७३ मध्ये प्रथम कागदावर गणिते करून दाखवून दिली. या संकल्पनेवर अनेक शास्त्रज्ञ १७८९ पासून काम करीत होते; पण १८८६ मध्ये हैन्रिक हर्ट्झने मॅक्सवेलच्या सिद्धांताला दुजोरा देणारे प्रयोग केले. त्याने शोधलेल्या ‘हर्ट्झच्या लहरी’ (रेडिओ लहरी) अनेक शास्त्रज्ञांनी त्यांच्या प्रयोगात वापरायला सुरुवात केली आणि ऑगस्ट १८९४ मध्ये ऑलिव्हर लॉज या ब्रिटिश भौतिक शास्त्रज्ञाने एका व्याख्यानाच्या वेळी हर्ट्झच्या लहरींचे ५० मी. अंंतरावर प्रक्षेपण करून दाखवले. १८९६ मध्ये मार्कोनीने बिनतारी संदेशवहनाचे स्वामित्व हक्क मिळवले आणि या तंत्रज्ञानाचा व्यापारी तत्त्वावर उपयोग सुरू झाला. संगीत आणि आवाजाच्या प्रक्षेपणाचे काही प्रयोग २०व्या शतकाच्या सुरुवातीला झाले; पण रेडिओ तंत्रज्ञानाचा वेगाने विकास झाला तो पहिल्या महायुद्धात, लष्करी उपयोगासाठी! १९२० पर्यंतच्या इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील विकासामुळे लहरींचे विस्तारीकरण करणे सोपे झाले आणि १९२० नंतर बातम्या, गाणी, भाषणे ऐकवणारा रेडिओ महत्त्वाचे लोकमाध्यम बनला.

प्रक्षेपक (Transmitter) आणि ग्राहक (Receiver) प्रक्षेपक एका बाजूने आलेला श्राव्य (Audio) स्वरूपातील संदेश स्वीकारतो, तो सांकेतिक भाषेत साइन लहरीमध्ये मिसळतो आणि रेडिओ लहरींच्या स्वरूपात बाहेर सोडतो.भारतात रेडिओ प्रसारणासंबंधीचे प्रयोग १९१५ साली सुरू झाले.बी बी सी च्या धर्तीवर इंग्रज सरकारने भारतात इंडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन स्थापन करून पहिल्यांदा रेडिओ प्रसारणासाठी मुंबई केंद्र निर्माण केले. मात्र प्रत्यक्ष प्रसारणास सुरुवात १९२४ साली मद्रास येथे सुरू झालेल्या एका खाजगी संस्थेने केली. त्याचवर्षी इंग्रजांनी भारतीय प्रसारण संस्था नावाच्या एका खासगी संस्थेला मुंबई व कलकत्ता येथे रेडिओ यंत्रणा स्थापित करण्याची अनुमती दिली. १९३० साली या संस्थेचे दिवाळे निघाल्यानंतर इंग्रजांनी ही दोन ठिकाणे आपल्या अधिपत्याखाली घेतली व कामगार व उद्योग या विभागाअंतर्गत ‘भारतीय राज्य प्रसारण मंडळ’ नावाची प्रसारण संस्था स्थापन केली. १९३६ साली या संस्थेचे ‘ऑल इंडिया रेडिओ’ असे नामकरण करून दूरसंचार विभागात याचे स्थलांतर केले. १९४७ साली जेव्हा भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले तेव्हा ‘ऑल इंडिया रेडिओ’ नावाचा स्वतंत्र विभाग माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापन करण्यात आला. ‘ऑल इंडिया रेडिओ’चे अधिकृतरित्या ‘आकाशवाणी’ हे नाव १९५७ साली ठरविण्यात आले. ते प्रसिद्ध हिंदी कवी पं. नरेंद्र शर्मा यांनी सुचविले होते. म्हैसूर संस्थानाने १९३५ मध्ये स्थापिलेल्या रेडिओ-केंद्रास ‘आकाशवाणी’ हे नाव दिले होते. हेच नाव पुढे भारत सरकारने देशातील सर्व रेडिओ-केंद्रांसाठी स्वीकारले.१९९० च्या दशकापासून खाजगी संस्था रेडिओ प्रसारणात उतरल्या असल्या तरीही देशाच्या कुठल्याही कोपर्‍यात पोहोचणारी ‘आकाशवाणी’ आपली लोकप्रियता टिकवून आहे.

- Advertisement -

आकाशवाणीच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीप्रमाणे भारतातील ९९.३७% लोकांपर्यंत आकाशवाणीचे प्रसारण पोहोचते. आकाशवाणीची एकूण २२९ प्रसारण केंद्रे आहेत. तसेच २४ भाषांमध्ये एकूण ३८४ वाहिन्या प्रसारित केल्या जातात. आकाशवाणी, दूरदर्शनचे प्रक्षेपण सुरू होताना किंवा त्यांचे विविध कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी जी विशिष्ट संगीत धून वाजविली जाते त्याला ‘सिग्नेचर ट्यून’ असे म्हटले जाते. आकाशवाणीची ही लोकप्रिय सिग्नेचर ट्यून वॉल्टर कॉफमन यांनी तयार केली होती. १९३०च्या सुमारास कॉफमॅन हे मुंबई आकाशवाणी केंद्राच्या पाश्चिमात्य संगीत विभागात संगीतकार म्हणून काम करत होते. त्यावेळी त्यांनी ही सिग्नेचर ट्यून तयार केली असल्याची माहिती आहे. तेव्हा तंबोरा आणि व्हायोलिन या वाद्यांचा वापर यात करण्यात आलेला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -