घरफिचर्समराठी भाषेतील अग्रणी कवी

मराठी भाषेतील अग्रणी कवी

Subscribe

माधव ज्यूलियन हे मराठी भाषेतील अग्रणी कवी, रविकिरण मंडळाचे संस्थापक आणि सर्वात यशस्वी सदस्य होते. तसेच ते फारसी आणि इंग्रजी विषयाचे प्राध्यापकसुद्धा होते. मुंबई विद्यापीठाच्या मराठी साहित्यातील देशभरातील पहिल्या-वहिल्या डी.लिट. पदवीचे ते मानकरी आहेत. २९ नोव्हेंबर रोजी त्यांचा स्मृतिदिन. २१ जानेवारी १८९४ रोजी बडोदा येथे डॉ. माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ माधव ज्यूलियन यांचा जन्म झाला. कवी माधव यांनी पटवर्धन ऐवजी ज्यूलियन नाव लावण्यामागे दोन आख्यायिका ऐकायला मिळतात. इंग्लिश कवी शेले याने रचलेल्या ज्यूलियन आणि मडालो या कवितेवरून त्यांनी ज्यूलियन असे टोपणनाव धारण केले. याशिवाय ‘गॉड्ज गुड मेन’ या कादंबरीतील नायिका ज्यूलियन या व्यक्तिरेखेवरून माधवरावांनी ज्यूलियन हे नाव घेतले, असेही सांगितले जाते.

१९१६ मध्ये माधव पटवर्धन यांनी फारसी भाषा हा विशेष विषय निवडून बी.ए.ची पदवी मिळवली. त्यानंतर १९१८ मध्ये इंग्रजी साहित्य या विषयात त्यांनी एम.ए.चा पदव्युत्तर अभ्यास पूर्ण केला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १९१८ ते १९२४ या कालावधीत ते फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथे फारसी भाषा शिकवू लागले. त्यानंतर कोल्हापूरमधील राजाराम महाविद्यालयात ते फारसी भाषेचे प्राध्यापक म्हणून रूजू झाले. १९२५ ते १९३९ या कालावधीत त्यांनी तेथे अध्यापनाचे कार्य केले. दरम्यान, १ डिसेंबर १९३८ रोजी माधव त्र्यंबक पटवर्धन यांना त्यांच्या ‘छंदोरचना’ या ग्रंथासाठी मुंबई विद्यापीठाने डी.लिट. ही पदवी देत कवी माधव ज्यूलियन यांचा सन्मान केला. गझल आणि रुबाई हे काव्यप्रकार फारसीमधून मराठीत आणण्याचे श्रेय कवी माधव ज्यूलियन यांना दिले जाते. माधव ज्यूलियन यांनी ‘दित्जू’, ‘मा.जू’ आणि ‘एम. ज्यूलियन’ या नावानेसुद्धा लेखन केले आहे. यापैकी काही लिखाण त्यांनी इंग्रजीमध्ये केले आहे. एवढेच नाही तर कविवर्य भा.रा.तांबे यांच्या कवितांचे संकलन आणि संपादन सुद्धा माधव ज्यूलियन यांनी केले. उत्कृष्ट संपादनाचा एक नमुना म्हणून याकडे पाहिले जाते. कवितांशिवाय माधव ज्यूलियन यांनी भाषाशास्त्रीय लेखन सुद्धा केले. ते नेहमीच सोप्या व शुद्ध मराठीचा पुरस्कार करत आणि म्हणूनच त्यांनी भाषाशुद्धी-विवेक हा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथात कालबाह्य ठरलेल्या शेकडो मराठी शब्दांची सूची समाविष्ट करण्यात आली आहे. त्यांच्या एकूण प्रकाशित साहित्यामध्ये स्फुट गझला, खंडकाव्य, दीर्घकाव्य, काव्यसंग्रह, अनुवादित लेख, संशोधनात्मक व भाषांतरीत वाड्मय प्रकारांचासुद्धा समावेश आहे. त्यांच्या प्रकाशित कवितांपैकी ’कशासाठी पोटासाठी’, ’जीव तुला लोभला माझ्यावरी’, ‘प्रेम कोणीही करीना’, ‘प्रेमस्वरूप आई’, ‘मराठी असे आमुची मायबोली’ या कविता खूपच प्रसिद्ध आहेत. १९३३ साली नाशिक येथे पार पडलेल्या कविसंमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले होते, तर १९३४ रोजी बडोदे येथे झालेल्या साहित्य संमेलनात ते कविशाखेचे अध्यक्ष होते. १९३६ मध्ये जळगाव येथे आयोजित मराठी साहित्य संमेलनाचे सुद्धा कवी माधव ज्यूलियन यांनी अध्यक्षपद भूषवले होते. २9 नोव्हेंबर १९३९ रोजी कवी माधव ज्यूलियन यांनी जगाचा निरोप घेतला. माधव ज्यूलियन यांच्या पहिल्या स्मृतिदिनाला मुंबई आकाशवाणीवरून एक संगितिका प्रसारित करण्यात आली होतीच. जिचे लेखन आणि दिग्दर्शन कवी बा. सी. मर्ढेकर यांनी केले होते. एका कवीने दुसर्‍या कवीला केलेला हा एक मानाचा मुजराच समजला जातो.
इ.स. १९३३मध्ये नाशिक येथे झालेल्या कविसंमेलनाचे माधव ज्युलियन यांनी अध्यक्षपद स्वीकारले होते. इ.स. १९३४मध्ये बडोदे येथे झालेल्या साहित्यसंमेलनात ते कविशाखेचे अध्यक्ष होते. इ.स. १९३६मध्ये जळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. पुण्यातल्या टिळक रोडवरील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहाला ’माधवराव पटवर्धन सभागृह’ असे नाव देण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -