घरफिचर्सलढा हृदयविकाराशी - भाग १

लढा हृदयविकाराशी – भाग १

Subscribe

आपल्या देशात कार्डियक आजारांचे प्रमाण चिंताजनकरित्या वाढत आहे. तरुण व्यक्तींचा अचानक हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. हा मोठ्या चिंतेचा विषय आहे. आपण या परिस्थितींसाठी आपल्या जीवनशैलीला सहज दोष देऊ शकतो. तणावाची पातळी, हायपरटेन्शन ( उच्च रक्तदाब) सातत्याने वाढत आहेत आणि त्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा करणार्‍या धमन्यांचे विकार, हार्ट फेल्युअर, पक्षाघात किंवा अन्य काही संस्थांच्या आजारांचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

त्याचप्रमाणे अनारोग्यकारक आहार आणि खाण्याच्या विचित्र सवयी यामुळे व्यक्तींमध्ये स्थूलत्व वाढत आहे. हृदयविकारांसाठी हाही मोठा धोक्याचा घटक आहे. या लेखात आपण हार्ट अटॅकच्या मूलभूत बाबींविषयी तसेच प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपायांबद्दल जाणून घेऊ. आपण जेव्हा ‘हार्ट अटॅक’ ही संज्ञा वापरतो, तेव्हा हृदयाकडे जाणार्‍या रक्तप्रवाहात काही अडथळा निर्माण झाला असतो; तेव्हा ही रक्ताभिसरणाची समस्या आहे.

- Advertisement -

हार्ट अटॅक

शास्त्रीय भाषेत हार्ट अटॅकला मायोकार्डिअल इन्फार्क्शन (एमआय) म्हणतात. त्यामुळे हृदयाच्या काही स्नायूंची हानी होते. या स्नायूंना रक्तपुरवठा पुरेसा होत नाही. सामान्यपणे हृदयाला रक्तपुरवठा करणार्‍या एका किंवा एकाहून अधिक रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा आल्याने हार्ट अटॅक येतो. स्नायूंना ऑक्सिजन मिळत नाही आणि परिणामी त्यांचे नुकसान होते. लक्षात घ्या, जर रक्तवाहिनीतील अडथळा काढून टाकला (काहीवेळा हा अडथळा छोट्या गुठळ्यांच्या स्वरुपात असतो) तर स्नायू पूर्ववत होतात.

- Advertisement -

अर्थात रक्तपुरवठा पूर्ववत करण्यास अधिक कालावधी लागला, तर स्नायूंचे नुकसान अधिक होते आणि त्यांना कार्यासाठी आवश्यक ती पोषके मिळत नाहीत. याचा अर्थ कालांतराने हृदयाचे स्नायू कमकुवत होतात आणि शरीराच्या दैनंदिन मागण्या पूर्ण करू शकत नाहीत. अशारितीने उपचारांना विलंब करणे किंवा या अवस्थेबद्दल अज्ञान असणे यामुळे नुकसान वाढू शकते. अर्थात, अचानक होणार्‍या अर्‍हिदमियामध्ये हृदयाचे ठोके थांबतात तसे ते हार्ट अटॅकमध्ये थांबत नाहीत.

हार्ट अटॅकची लक्षणे
हार्ट अटॅकची सामान्य लक्षणे म्हणजे अस्वस्थता, छाती, मान, जबडा किंवा पोटावर दाब जाणवणे किंवा वेदना होणे. काही जणांना धाप लागू शकते, अचानक मळमळ किंवा उलट्या होऊ शकतात, डोके हलके वाटू शकते किंवा चक्कर किंवा अकारण थकवा जाणवू शकतो. ही लक्षणे तत्काळ जाणवू शकतात आणि तीव्र असू शकतात. मात्र, अनेक रुग्णांमध्ये ही लक्षणे प्रत्यक्षात हार्ट अटॅक येण्याच्या काही दिवस ते काही आठवडे आधीपासून दिसू शकतात. या लक्षणांची तीव्रता तेवढी अधिक नसते, त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते किंवा या समस्या तणावामुळे किंवा शारीरिक श्रमामुळे निर्माण झाल्या असतील, असे समजले जाते.

-डॉ. नारायण गडकर हृदयरोगतज्ज्ञ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -