बलिप्रतिपदा, पुष्पक विमान आणि दाक्षिणात्य बळीराजा

भारतीय पौराणिक ग्रंथांचे अभ्यासक डॉ. प. वि. वर्तक यांच्या 'वास्तव रामायण' या पुस्तकातील काही मुद्दे

vastav ramayana

बळीराजा हा दक्षिणेकडचा अतिशय पराक्रमी आणि दानशूर राजा होता. त्याकाळी दक्षिण आणि उत्तरेकडच्या राजांमध्ये सत्तास्पर्धा सुरू असे. उत्तरेकडचे राजे बळी राजाच्या दानशूरपणाची परीक्षा पाहून त्याला नेस्तनाबूत करण्यासाठी एका बटू ब्राह्मणाला त्याच्याकडे पाठवतात. त्या ब्राह्मणाला बळीराजाकडे त्रिखंड भूमी दान मागायला सांगतात. (ब्राह्मण हे पूर्वीपासून राजे लोकांकडून असेच वापरले जात असत) तो जाऊन बळी राजाकडे त्रिखंड भूमी दान मागतो. दानात बळी कधीच मागे नसतो, त्यासाठीच तो प्रसिद्ध असतो. बळी त्या ब्राह्मणाला, त्याचा राज्य विस्तार असलेले आशिया, युरोप आणि आफ्रिका हे तीन खंड दान देतो. त्यानंतर बळीराजा पाताळात निघून जातो. पाताळ म्हणजे जे खाली आहे तो भाग. भारताच्या बरोबर १८० अंशांवर विरुद्ध दिशेला अमेरिका आहे. बळी राजा त्याकाळी पाताळात म्हणजे आताच्या अमेरिकेत निघून जातो. तिथे त्याचा वास्तुरचनाकार मयासूर बळी राजासाठी मायानगरी उभारतो. आजही अमेरिकेत या माया संस्कृतीचे अवशेष आहेत.

दक्षिण भारतातले लोक हे विज्ञान, तंत्रज्ञानात पुढारलेले होते. पुष्पक विमान दाक्षिणात्य राजा रावणाकडे होते, उत्तरेतील राजा रामाकडे नव्हते. आजही दक्षिणेतील केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश या चार दाक्षिणात्य राज्यांमधून इतर राज्यांच्या तुलनेत वैज्ञानिकांची मोठी संख्या आपल्याला दिसून येते. याचा अर्थ त्यांचे पूर्वज हे विज्ञान, तंत्रज्ञानात पुढारलेले होते, हेच आताची ही मंडळी त्यांचा वारसा चालवून दाखवून देत आहेत. अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष हे होमी भाभा आणि अनिल काकोडकर यांचा अपवाद सोडला तर सगळे साऊथ इंडियन आहेत हे लक्षात घेण्यासारखे आहे. विज्ञानात नोबेल पुरस्कार मिळवणारे सी.व्ही.रामन, चंद्रशेखर, तसेच थोर गणितज्ज्ञ रामानुजन अयंगार, मिसाईल मॅन एपीजे अब्दुल कलाम हे साऊथ इंडियन होते.

सीता स्वयंवरात रावणाला द्रौपदी स्वयंवरात पराक्रमी असूनही कर्णाला ठरवून अपमानित करण्यात येते तसे अपमानित करण्यात आले. त्याचा राग ठेऊन रावणाने सीतेचे हरण केले, पण त्याने सीतेवर शारीरिक जबरदस्ती केली नाही. हे लक्षणीय आहे.