घरफिचर्समायमहानगर ब्लॉगशरदचंद्रजी पवार: भारतीय राजकारणातील योद्धा!

शरदचंद्रजी पवार: भारतीय राजकारणातील योद्धा!

Subscribe

भारतीय राजकारण आणि समाजकारणातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार माननीय शरदचंद्रजी पवार साहेब होय. शरद पवार साहेब म्हणजे भारतीय राजकारणातील एक योद्धा पुरुष म्हणून गणले जाते. देशाच्या आणि महाराष्ट्र राज्याच्या विकासात शरद पवार साहेबांचे मोठे योगदान आहे. शरद पवार साहेबांचा 12 डिसेंबर रोजी 80 वा वाढदिवस आहे. मात्र, आज देखील तरुणाला मागे टाकेल, लाजवेल इतकी ऊर्जा त्यांच्याकडे आहे. ना कधी थकले, का कधी थांबले, असा अविरत प्रवास सुरु आहे. शरद पवार म्हणजे राजकारणातील एक वादळ आहे. जे आड आले त्यांना चारीमुंड्या चित करून टाकले. ज्यांनी साथ दिली त्यांना सोबत घेऊन देशाचा आणि राज्याच्या विकासाचा मार्ग निश्चित केला.

शरद गोविंदराव पवार साहेब एक मराठी, भारतीय राजकारणी आहेत. इ.स. 1978 ते इ.स. 1980, इ.स. 1988 ते इ.स. 1991 व इ.स. 1993 ते इ.स. 1995 या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. इ.स. 1999 साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. पवार साहेबांचा जन्म डिसेंबर 12, इ.स. 1940 रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झाला. त्यांचे छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तीन आदर्श आहेत. शरद पवार यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव पवार आणि आईचे नाव शारदाबाई पवार आहे. गोविंदराव हे निरा कॅनॉल सहकारी सोसायटीचे बराच काळ सेक्रेटरी होते. पुढे ते बारामती येथे निघालेल्या सहकारी बँकेचे पहिले व्यवस्थापक झाले. शारदाबाई या 1938 मध्ये पुणे जिल्हा लोकल बोर्डाच्या शिक्षण समितीच्या प्रमुख होत्या. बारामतीच्या लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या त्यांच्या सुकन्या आहेत. तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब हे त्यांचे पुतणे आहेत.

- Advertisement -

इ.स. 1956 साली ते शाळेत असताना त्यांनी गोवा मुक्ती सत्याग्रहाला पाठिंबा दर्शविण्यासाठी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला. येथून त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली. त्यानंतर कॉलेजमध्ये असताना विद्यार्थी संघटनेचे नेते म्हणूनही त्यांनी काम पाहिले. विद्यार्थी संघटनेच्या एका समारंभासाठी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आमंत्रित केले. पवार साहेबांनी त्याप्रसंगी केलेल्या भाषणामुळे यशवंतराव चव्हाण अतिशय प्रभावित झाले. त्यानंतर चव्हाणांच्या सांगण्यावरून पवारांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. चव्हाणांनी पवारांमधील सुप्त नेता हेरला आणि त्यानंतर पवार साहेब त्यांचे शिष्य बनले. त्यानंतर चव्हाणांनी त्यांच्या पुणे शहराला दिलेल्या भेटींदरम्यान पवार साहेबांना मुद्दाम भेटायला बोलावून त्यांना अनेकवेळा मार्गदर्शन केले. वयाच्या 24 व्या वर्षी ते महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले.

त्यानंतर यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले. इ.स. 1966 साली पवार साहेबांना युनेस्को शिष्यवृत्ती मिळाली. त्याअंतर्गत त्यांना पश्चिम जर्मनी, फ्रान्स, इटली, इंग्लंड इत्यादी देशांना भेट देऊन तेथील राजकीय पक्षांचा आणि त्यांच्या पक्षबांधणी करायच्या पद्धतीचा जवळून अभ्यास करता आला. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ते देशाचे कृषीमंत्री असा त्यांचा प्रवास विकासाला दिशा देणारा आहे. भाजपने सत्ता काबीज केल्यानंतर आता पुढे राजकारण संपले अशी भावना बनली. मात्र, शरद पवार साहेब यांच्या राजकीय गुगलीने सर्वांनाच मोठा धक्का दिला. महाराष्ट्रात भाजपच्या देवेंद्र फडणवीस सरकारचा अहंकार संपविला. शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात महाविकास आघाडी उभी झाली. शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्र जिंकला, उद्या दिल्ली नक्कीच काबीज होईल, असा विश्वास वाटतो.

- Advertisement -

— मल्लिकार्जुन पुजारी, चिटणीस
-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र प्रदेश

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -