घरलाईफस्टाईलतुमचीही नॉन-स्टिक भांडी लवकर खराब होतात

तुमचीही नॉन-स्टिक भांडी लवकर खराब होतात

Subscribe

सध्याच्या काळात अनेक व्यक्ती नॉन-स्टिक भांड्यांचा वापर करतात. झटपट स्वयंपाक करण्यासाटी या भांड्यांचा वापर केला जातो. या भांड्यांची खासियत म्हणजे या भांड्यात कोणताही पदार्थ केला तरी तो चिटकत नाही. पण, ही महागडी भांडी लवकर खराब होतात. नॉन-स्टिक भांडी लवकर खराब होऊ नये, याकरता आपण देखील काही चुका करतो. त्या कोणत्या चुका करतो ते आज आपण पाहणार आहोत.

धातूच्या चमच्याचा वापर करु नये

- Advertisement -

बऱ्याचदा नॉन-स्टिक भांड्यांसोबत लाकडी चमचा देण्यात येतो. पण, आपण त्याचा शक्यतो वापर करत नाही. अनेकदा महिला धातूच्या चमच्याचा वापर करतात. त्यामुळे आपला नॉन-स्टिक पॅन खराब होतो. धातूच्या चमच्यांनी पॅनवर स्क्रॅच पडतात. यामुळे नॉन-स्टिक पॅनवरील कोटिंग निघून जाते. म्हणून नेहमी लाकडाच्या किंवा नॉनस्टिकसाठी मिळणाऱ्या वेगळ्या चमच्यांचा वापर करावा.

अधिक उष्णता देऊ नये

- Advertisement -

नॉन-स्टिक पॅनवर अन्न शिजवताना कधी ही अधिक उष्णता वापरू नका. कारण अधिक उष्णतेमुळे कोटिंगचे नुकसान होते. तसेच हानीप्रद टॉक्सिन सोडतात यामुळे आपल्या आरोग्यास नुकसान संभवतो.

गरम पाण्यात टाकू नये

कोणतेही नॉन-स्टिकचे भांडे गरम असताना थंड पाण्यात ठेऊ नये, असे केल्यास टॉक्सिन बाहेर फेकले जाते. यामुळे आरोग्यास नुकसान होते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -