घरफिचर्ससारांशव्यवसायाचे ९ प्रमुख स्तंभ!

व्यवसायाचे ९ प्रमुख स्तंभ!

Subscribe

अनेक नवउद्योजक हे आता नोकरी नाही म्हणून उद्योजकतेकडे वळत आहेत. हे ही खरे आहे की ७५ टक्के नवीन व्यवसाय हे सुरू झाल्यापासून दोन वर्षांच्या आत बंद होतात. ह्या बंद होण्याच्या कारणांचा एक सर्व्हे उपलब्ध आहे, त्यात २२ टक्के कारणे हे तुमची मार्केटिंग टीम नसणे, ३४ टक्के कारणे हे तुमचे प्रॉडक्ट किंवा सेवा ही ग्राहकांच्या गरजेनुसार नसणे, १८ टक्के कारणे तुमच्याकडे योग्य टीम नसणे, १६ टक्के कारणे फायनान्स किंवा भांडवल प्रॉब्लेम ही आहेत. नवीन व्यवसाय सुरू करताना व्यवसायाचे काही प्रमुख ९ स्तंभ आहेत. त्यावर आधी काम केले (व्यवसाय सुरू करण्याआधी) तर नक्कीच व्यवसाय यशस्वी होतील.

-राम डावरे

प्रत्येक व्यवसाय सुरू करण्यासाठी व तो यशस्वी होण्यासाठी महत्त्वाच्या ९ स्तंभांची माहिती आपण करून घेऊया.
१. ग्राहकांचे प्रकार वा वर्गीकरण
२. तुमच्या मालाचे किंवा सेवेचे मूल्य
३. तुमच्या ग्राहकांपर्यंत पोहचण्याचे विविध मार्ग
४. कस्टमर रिलेशन
५.तुमच्या व्यवसायातील उत्पन्नाचे विविध मार्ग
६. महत्त्वाची साधने व संसाधने
७. व्यवसायाचे विविध खर्च
८. महत्त्वाचे उपक्रम
९. महत्त्वाच्या भागीदारी

- Advertisement -

प्रत्येक व्यावसायिकाने व्यवसाय सुरू करताना किंवा असलेला व्यवसाय वाढवण्यासाठी हे ९ स्तंभ फार महत्त्वाचे आहेत. याला बिझनेस मॉडेल कॅनव्हास असेही म्हटले जाते. यातील एक जरी स्तंभ तुमच्या व्यवसायात नसेल तर व्यवसाय यशस्वी होत नाही.

१. ग्राहकांचे प्रकार वा वर्गीकरण :
व्यवसाय सुरू करताना आपले ग्राहक कोण असणार आहे याची यादी करणे महत्त्वाचे आहे. ती यादी करताना ग्राहकाचे वर्गीकरण करणे महत्त्वाचे आहे. जसे की पुरुष ग्राहक, स्त्री ग्राहक, शिक्षित ग्राहक, अशिक्षित ग्राहक, राज्यातील ग्राहक, परराज्यातील ग्राहक, ऑनलाईन ग्राहक, ऑफलाईन ग्राहक इ. आजच्या डिजिटल मार्केटिंगच्या जमान्यात सोशल मीडिया मार्केटिंग करताना ह्या वर्गीकरणाला फार महत्त्व आहे. तुमचे प्रॉडक्ट किंवा सेवा ही नक्की कुठल्या ग्राहकांसाठी आहे यावर फोकस करणे महत्त्वाचे आहे.

- Advertisement -

२. तुमच्या मालाचे किंवा सेवेचे मूल्य :
एकदा तुमच्या हातात ग्राहकांचे प्रकार व वर्गीकरण आले की कोणत्या ग्राहकांसाठी काय मूल्य ठेवायचे हे निश्चित करावे लागते. सरसकट मूल्य सर्व ग्राहकांना ठेवता येत नाही किंवा लागू होत नाही. जसे की ग्राहक वर्गानुसार चप्पल, बूट बाजारात एकाच कंपनीचे उपलब्ध आहेत. कार कंपन्यांच्या किमतीनुसार सर्वांना परवडतील त्या किमतीत उपलब्ध आहेत. मोबाईलही वेगवेगळ्या किमतीला उपलब्ध आहे. सर्वांसाठी एकच किंमत सध्याच्या स्पर्धेच्या युगात अशक्य आहे.

३. तुमच्या ग्राहकांपर्यंत पोहचण्याचे विविध मार्ग :
व्यवसाय नवीन असो वा जुना तुम्हाला ग्राहकांपर्यंत तुमची सेवा किंवा उत्पादन घेऊन पोहचावे लागते. ते कसे व कोणत्या मार्गाने पोहचायचे हे येथे नेहमी महत्त्वाचे आहे. तुमचे प्रॉडक्ट नवीन असेल तर प्रिंट मीडिया जाहिरात, इलेक्ट्रीक मीडिया जाहिरात आणि आता फार महत्त्वाचे म्हणजे सोशल मीडिया जाहिरात यामार्फत तुम्ही तुमच्या ग्राहकांपर्यंत पोहचू शकता. व्यवसायात मार्केटिंगला फार महत्त्व आहे.

४. कस्टमर रिलेशन :
फक्त कस्टमर मिळविणे म्हणजे काम झाले असे नाही ते टिकवण्यासाठी त्यांच्यासोबत रिलेशन टिकवणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी तुमच्या व्यवसायामध्ये योग्य ती व्यवस्था असणे महत्त्वाचे आहे. आहे त्या ग्राहकाकडून काही तक्रारी आल्या तर त्या वेळेत सोडवणे महत्त्वाचे आहे. त्यांच्याकडून नवीन ऑर्डर किंवा बिझनेस मिळवणे, त्यांच्याकडून नवीन ग्राहकांचे रेफरन्स मिळवणे ह्या सर्व बाबी कस्टमर रिलेशनमध्ये येतात.

५. तुमच्या व्यवसायातील उत्पन्नाचे विविध मार्ग :
तुमच्या व्यवसायात उत्पन्नाचे विविध कोणते मार्ग आहेत याची यादी तयार करणे गरजेचे आहे. जसे की मालाची खरेदी-विक्री, वार्षिक फी, कामानुसार फी. सेवा उद्योगाच्या बाबतील वार्षिक फी किंवा कामानुसार फी हे पर्याय उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

६. महत्त्वाची साधने व संसाधने
व्यवसायासाठी महत्त्वाची कोणती संसाधने लागतात याची यादी तयार करून त्यावर काम करणे जरुरी असते. काही महत्त्वाची संसाधने खालीलप्रमाणेः
-मनुष्यबळ
-फायनान्स
-मार्केट रिसर्च
-स्पर्धात्मक फायदा

७. व्यवसायाचे विविध खर्च
व्यवसाय सुरू करताना किंवा व्यवस्थित सुरू ठेवण्यासाठी विविध काय काय खर्च लागतात त्याचे अंदाजपत्रक तयार करून त्यासाठी लागणार्‍या फंडाची उभारणी कुठून करायची ही फार महत्त्वाची बाब आहे व ही कायम चालणारी प्रोसेस आहे. तसेच आपल्या व्यवसायाचे उत्पन्न व खर्च यांचा मेळ घालणे हेसुद्धा महत्त्वाचे आहे. व्यवसाय हा नफा मिळवण्यासाठीच करायचा असतो हे नेहमी लक्षात असू द्यावे. खर्चासाठी लागणारा फायनान्स कसा उपलब्ध होणार आहे, तो किती प्रमाणात उपलब्ध होणार आहे ह्या सर्व बाबी विचारात घेणे गरजेचे आहे.

८. महत्त्वाचे उपक्रम
व्यवसाय सुरू करताना किंवा असलेला व्यवसाय सुरळीत सुरू ठेवण्यासाठी काही महत्त्वाचे उपक्रम सतत सुरू ठेवावे लागतात. आपापल्या व्यवसायानुसार ते उपक्रम बदलत असतात. काही महत्त्वाचे उपक्रम खालीलप्रमाणे ः
-व्यवसायासाठी नेहमी लागणारा फायनान्स नियोजन
-तुमच्या व्यवसायाचे मार्केटिंग करणे
-तुमच्या स्टाफला कायम विविध गोष्टींचे ट्रेनिंग देणे
-मार्केट संशोधन करणे
– तुमच्या मालाची किंवा सेवेची गुणवत्ता सतत सुधारणे
-व्यवसायासाठी लागणारी करविषयक पूर्तता, विविध कायद्यांचे पालन करणे व त्यानुसार विविध सरकारी विवरणपत्रे भरणे.

९. महत्त्वाच्या भागीदारी
व्यवसाय सुरू करताना किंवा नंतरसुद्धा विविध लोक, संस्था यांच्याशी तुम्हाला भागीदारी किंवा संबंध प्रस्तापित करावे लागतात. तुमच्या व्यवसाय उद्योग वाढीसाठी हे फार महत्त्वाचे असते. काही लोकांची व संस्थांची यादी खालीलप्रमाणे ः
-तुमच्या व्यवसायाची बँक
-तुम्ही ज्या व्यवसायात आहात त्या व्यवसायाची देश किंवा राज्य पातळीवरील संघटना.

-कामगार संघटना
-सरकारी ध्येयधोरणांबाबत सतर्कता
व्यवसाय सुरू करताना दोन गुंतवणुकी महत्त्वाच्या असतात. त्यात पहिली म्हणजे सुरू करण्याआधी योग्य रिसर्च करणे व दुसरी गुंतवणूक म्हणजे व्यवसाय सुरू केल्यानंतर लागणारी प्रत्यक्ष भांडवलाची गुंतवणूक. या ९ स्तंभांवर रिसर्च करणे ही पहिली गुंतवणूक फार महत्त्वाची आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -