घरफिचर्ससारांशलाख मोलाचा मध !

लाख मोलाचा मध !

Subscribe

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. या तालुक्यातील स्ट्रॉबेरी देशभर प्रसिद्ध आहे. महाबळेश्वर येथे शासनाचे मध संचालनालयाचे कार्यालय असून, शेतकर्‍यांनी मधनिर्मिती करावी यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. घोगलवाडी या गावात 30 कुटुंबे आहेत. गावात पूर्वी कमी प्रमाणात पारंपरिक पद्धतीने मधनिमिर्ती केली जात होती. मध संचालनालयाच्या प्रयत्नामुळे या गावात व्यावसायिक पद्धतीने मधनिर्मिती सुरू झाली आहे. सेंद्रिय शेतीच्या चळवळीतही वेग आला आहे. घोगलवाडी गावातील शेतकर्‍यांनी गावाच्या दुर्गम व जंगलाचा चांगल्या पद्धतीने उपयोग करून सेंद्रिय मधनिर्मिती सुरू केली असून यातून लाखो रुपये मिळत आहेत.

विदर्भात ऑक्टोबर महिन्यापासून फुलांचा हंगाम सुरू होतो. हा हंगाम जानेवारीपर्यंत असतो. त्यामुळे याच कालावधीत मधमाशा फुलांमधील परागकण शोषून घेऊन त्यातून मधनिर्मितीची प्रक्रिया करताना दिसून येतात. पाच महिन्यांत मध संकलित करून पावसाळ्यात मधमाशांना स्थलांतरित करावे लागते. शेतीला जोडधंदा आणि लाभदायक व्यवसाय म्हणून मधमाशी पालन व्यवसायाकडे कल वाढताना दिसत आहे.

अनेक रोगावर मध गुणकारी, मधमाशी व मध हा एक नैसर्गिक चमत्कार आहे. फार वर्षीपासून मानवाला मधमाशांबाबत माहिती होती असे दिसून येते. त्या दृष्टीने मधमाशा पाळून मधाचे उत्पादन घेण्याच्या दृष्टीने संशोधन झाले. त्यामधून मधमाशाबाबतचे अनेक पैलू अवगत झाले व मधमाशी पालनाचे शास्त्रीकृत तंत्रज्ञान आज विकसित झाले आहे. मधामुळे रक्तातील लाल कणांची वाढ होते. मधामुळे आपल्या शरीराला उष्णता व शक्ती प्राप्त होते. मधामध्ये जीवनसत्व ‘बी’चे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे त्याचे सेवन केल्याने अनेक रोग दूर होतात. आपल्या आहारात ज्या ठिकाणी साखर तुपाचा उपयोग केला जातो. तेथे मधाचा उपयोग करता येऊ शकतो. भारतासाठी तर शेतीत मधमाशांचे महत्व अनन्यसाधारण आहे. वर्ष 2022 पर्यंतदेशाचे कृषि उत्पन्न दुप्पट करण्याचे प्रयन्त सुरू आहेत. भारतातील विविध प्रकारची भौगोलिक परिस्थिती तसेच नैसर्गिक झाडेझुडपे व पिके याव्दारे अक्षयपणे मिळत राहणारा फुलोरा, समृध्द साधनसंपत्ती यांचा आधुनिक शास्त्रीय पध्दतीने योग्य उपयोग करुन सेंद्रिय मध निर्मितीला मोठा वाव आहे.

- Advertisement -

प्रत्येक स्वयंपाक घरात वापरली जाणारी औषधी गोष्ट म्हणजे मध. हे फक्त स्वयंपाकासाठीच नव्हे तर स्किनकेअर, हेअरकेअर, वजन कमी करण्याच्या उपचारांमध्ये आणि इतर आरोग्य उपचारांमध्ये देखील वापरले जाते. मध नैसर्गिक प्रक्रियेतून येत असल्याने, सेंद्रिय मध नेहमीच सर्वोत्तम असते आणि त्याला मागणी ही असते. मधमाशी पालन हा शेतीवर आधारित एक उपक्रम आहे, शेतकरी अतिरीक्त उत्पन्न मिळवण्यासाठी आता सेंद्रिय मधाकडे कल वाढत चालला आहे.

मधमाश्या फुलांमधील मकरंदाचे मधामध्ये रुपांतरण करतात आणि त्यांना पोळ्याच्या कप्प्यांमध्ये साठवून ठेवतात. जंगलांमधून मध गोळा करण्याचा उद्योग दीर्घकाळापासून अस्तित्वात आहे. मध आणि त्यापासून बनवलेल्या उत्पादनांची बाजारपेठेतील मागणी वाढत असल्याने मधमाशी पालनाचा उद्योग एक टिकाऊ उद्योग म्हणून उदयास येत आहे. मध आणि मेण ही मधमाशी पालनातून मिळणारी आर्थिकदृष्ठ्या महत्वाची दोन उत्पादने आहेत. सेंद्रिय मधाला मागणी वाढत असल्याने महाबळेश्वर तालुक्यातील घोगलवाडी या छोट्याशा गावात सेंद्रिय मधनिर्मिती सुरू केली आहे. या सेंद्रिय मधास अपेक्षित दर मिळत असल्याने लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊन, रोजगारही उपलब्ध झाला आहे.

- Advertisement -

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. या तालुक्यातील स्ट्रॉबेरी देशभर प्रसिद्ध आहे. महाबळेश्वर येथे शासनाचे मध संचालनालयाचे कार्यालय असून, शेतकर्‍यांनी मधनिर्मिती करावी यासाठी प्रयत्न केले जातात. या संस्थेकडून आयोजित केलेल्या प्रशिक्षणास घोगलवाडी येथील शेतकरी सहभागी झाले होते. घोगलवाडी या गावात 30 कुटुंबे असून, लोकसंख्या सुमारे शंभर आहे. गावात पूर्वी कमी प्रमाणात पारंपरिक पद्धतीने मधनिमिर्ती केली जात होती. 1998 मध्ये मध संचालनालयाच्या प्रयत्नामुळे या गावात व्यावसायिक पद्धतीने मधनिर्मिती सुरू झाली आहे. सेंद्रिय शेतीच्या चळवळीसही वेग आला आहे. घोगलवाडी गावातील शेतकर्‍यांनी गावाच्या दुर्गम व जंगलाचा चांगल्या पद्धतीने उपयोग करून सेंद्रिय मधनिर्मिती सुरू केली आहे.

अल्पभूधारक शेतकरी, सुशिक्षीत बेरोजगार व आर्थिकदृष्ठ्या कमकुवत असणार्‍या लोकांना मधमाशापालनातून मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होत आहे. पश्चिम घाटातील डोंगर, दया व अतिदुर्गम भागात राहणार्‍या लोकांना मधमाशापालन हा उद्योग आर्थिक स्थैर्य देत आहे. असाच एक प्रयोग घोगलवाडी येथील शेतकर्‍यांनी केला आहे. गावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल आहे, गावात कोणतेही नगदी पीक घेतले जात नाही. त्यामुळे गावात कसल्याही रासायनिक फवारण्या केल्या जात नाहीत. तसेच पेट्या जंगलात ठेवल्यामुळे सेंद्रिय मध मिळतो. या मधाची चवही नैसर्गिक असल्याने येथील मधास मागणी चांगली आहे, दरही चांगला मिळण्यास मदत होते. या गावात 30 कुटुंबे आहेत, यात सुमारे 20 कुटुंबांकडून मधमाशीपालन व्यवसाय केला जातो.

या परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल असून येथील शेतकरी खूप कष्ट करून सेंद्रिय मध व्यवसाय करत आहे. येथील शेतकर्‍यांकडे सुमारे 900 हून जास्त मध पेट्या आहेत. या छोट्याशा गावातून सेंद्रिय मध व्यवसाय सुरू करून लाखो रुपयांची उलाढाल करत आहेत. घोगलवाडी दुर्गम असल्याने आणि व्यावसायिक शेती नसल्यामुळे गावातील ग्रामस्थांचे उत्पन्न जेमतेम होते. मात्र व्यावसायिक पद्धतीने मधनिर्मिती सुरू झाल्यापासून येथील अर्थकारणात सुधारणा झाली आहे. हंगामात गावातून चार टनांपर्यंत मधनिर्मिती होत आहे. मध विक्रीसाठी महाबळेश्वरात बाजार पेठ उपलब्ध आहे. याभागात सहकारी संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून मधाची खरेदी होत आहे. मधनिर्मिती व्यवसायातून गावाची उलाढाल लाखात गेली आहे.

–राकेश बोरा 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -