घरताज्या घडामोडीमनकवडी ‘बीसीआय’ इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजी

मनकवडी ‘बीसीआय’ इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजी

Subscribe

एखाद्या धुमकेतूसारखे आदळत ‘बीसीआय’ इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजी आपल्या प्रत्येकाच्या जीवनात नखशिखांत बदल घडवून आणणार आहे. ज्ञानार्जनासाठी यापुढे शाळा-कॉलेजची गरजच राहणार नाही. मेंदूत किंवा मेंदूबाहेर एक इलेक्ट्रॉनिक्स नॅनो चिप बसविली की काम फत्ते! विशेष म्हणजे सिमकार्ड न वापरता एकमेकांशी जणू अगदी टेलीपॅथीसारखे विनाशब्द, विनाअक्षर डायरेक्ट ‘ब्रेन टू ब्रेन’ संवाद याच शतकात आपण पाहू शकू. त्यामुळे मोबाईलदेखील लवकरच गायब झालेले दिसतील. विशेष म्हणजे मनात विचार येताक्षणी आपल्या तकदिरचा दरवाजा ‘खुल जा सिम सिम करीत’ उघडणारे ‘बीसीआय’ हे ‘सिमलेस व मनकवडे तंत्रज्ञान’ आहे.

– प्रा. किरणकुमार जोहरे

मानवी सभ्यतेचा हा प्रवास अमरत्वाकडे नेणारा आहे. ‘बीसीआय’ नामक अद्भुत व जादुई इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजीने तो घडतोय. मासमीडिया न वापरता केवळ इलेक्ट्रॉनिक्स लहरी वातावरणात सोडत हवे तसे राजकीय जनमतप्रवाह निर्माण करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणा विकसित करण्यासाठीदेखील संधी उपलब्ध आहेत. गोपनीयता, नैतिकता अशी नवी आव्हाने घेऊन येणार्‍या ‘बीसीआय’ इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजीला आताच समजून घेणे ही आपल्या प्रत्येकाची अपरिहार्य गरज बनली आहे.

तुम्ही नुसता विचार केला की सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला कुणीतरी झटपट गरमागरम चहा आणि तुमच्या आवडीचा नाष्टा तुमच्या हातात आणून द्यावा…सकाळी सकाळी पाखरांच्या किलबिलाटाबरोबर तुमच्या आवडीचे गीत सुमधूर आवाजात तुमच्यासाठी तुमच्या जोडीदाराने गुणगुणावे…तुमच्या मनात काय चालले आहे अगदी सेम टू सेम तसे घडावे…तुम्ही नुसते पाऊल टाकले तरी घराचा, तुमच्या गाडीचा दरवाजा अगदी राजेशाही थाटात तुमच्यासाठी कुणीतरी उघडावा आणि तुम्हाला व्हीव्हीव्ही आयपी म्हणजे अगदी महत्त्वाची ट्रीटमेंट देत तुमचा रिस्पेक्ट केला जावा! तर हो लवकरच हे घडणार आहे. ‘बीसीआय’ इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाने आता हे शक्य झाले आहे.

- Advertisement -

मानवी सभ्यतेवर अत्यंत वेगाने व खोलवर परिणाम घडवून आणणारे ‘बीसीआय’ ही अभिनव टेक्नोलॉजी आहे. पुण्यातील ख्राईस्ट कॉलेजने नुकतेच आयोजित केलेल्या एका आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये ‘ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेसेस् (बीसीआयज्) : अ‍ॅडव्हान्समेंट, अ‍ॅप्लिकेशन्स, अँड फ्यूचर प्रॉस्पेक्ट्स फॉर कम्युनिकेशन अँड न्यूरोरिहॅबिलीटेशन’ हा रिसर्च पेपर प्रेझेंट करीत इंटरनेट ऑफ थिंग्ज (आरोपी) आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सने (एआय) वर काम करणार्‍या इलेक्ट्रॉनिक्स उपक्रमांद्वारे ‘सेन्स्ड’ ब्रेन अल्फा वेवज संदर्भात प्राप्त काही प्राथमिक नावीन्यपूर्ण निष्कर्ष मांडण्याची संधी मला मिळाली. मानवी संवेदनशीलतेवर महत्त्वपूर्ण प्रगती करीत येत्या काळात माहिती, ज्ञान आणि मानवी अनुभवदेखील डाऊनलोड करीत मनुष्य अमर होऊ शकेल.

नेमके काय आहे ‘बीसीआय’ टेक्नोलॉजी?

‘बीसीआय’ टेक्नोलॉजी म्हणजे ‘ब्रेन टू कॉम्प्युटर इंटरफेस’! थोडक्यात आपल्या मेंदूची संगणक किंवा मशिन्सला जोडणी करणारे अद्ययावत इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान होय! म्हणूनच बर्‍याचदा बीसीआय हे ‘बीएमआय’ म्हणजे ‘ब्रेन टू मशिन्स’ किंवा ‘मानव-कॉम्प्युटर इंटरफेस’ या नावानेदेखील ही टेक्नोलॉजी ओळखली जाते. यात वायर्ड आणि वायरलेस असे दोन मुख्य संशोधन प्रवाह आहेत. बीसीआय (किंवा बीएमआय) ही खरंतर इलेक्ट्रॉनिक्सची शाखा आहे. मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स तसेच इलेक्ट्रॉनिक्स प्लस कॉम्प्युटर्स प्लस मॅकॅनिकल असे ‘मॅकॅ-कॉम्प्युट्रॉनिक्स’ असे म्हटले तरी चालेल. ज्यांचा केवळ ‘ए ग्रुप’ आहे अशा विद्यार्थ्यांबरोबरच ‘बी ग्रुप’ म्हणजे मेडिकलमध्ये आवड असलेल्या विद्यार्थ्यांनादेखील या शाखेत काम करीत जॉब सॅटिस्फॅक्शन आणि पैशांचा पाऊस पाडत क्रिएटिव्हीटी आणि मानव जातीच्या कल्याणासाठी काहीतरी योगदान दिले असे कार्य करीत अजरामर होण्याची संधी देणारे असे हे अत्यंत सुंदर आणि नावीन्यपूर्ण क्षेत्र होय. इतकेच नव्हे तर नवीन स्टार्टअप किंवा स्वत:ची कंपनी किंवा बिझनेस सुरू करू इच्छिणार्‍या सर्वांसाठी ‘बीसीआय’ या क्षेत्रात अमाप संधीची द्वारे खुली आहेत. (अधिक माहितीसाठी लेखकाशी 9168981939 अथवा [email protected] वर संपर्क साधू शकता.) थोडक्यात बीसीआय ही अशी यंत्रणा आहे जी वापरकर्त्यांच्या मनाशी आणि बाह्य उपकरणांशी संबंध प्रस्थापित करणे आणि त्यानुसार क्रिया घडवून आणल्या जातात किंवा खुल जा सिम सिम असे न म्हणतादेखील क्रिया आपोआप घडतात.

- Advertisement -

‘बीसीआय’ कसे काम करते?

बीसीआय म्हणजे ब्रेन टू कॉम्प्युटर किंवा ‘बीएमआय’ म्हणजे ब्रेन टू मशिन्स हे मेंदूतील लहरी किंवा सिग्नल्स विविध सेन्सरच्या माध्यमातून पकडते. नंतर त्यांचा अर्थ लावत समजून घेते आणि मेंदूतील विचारानुसार शरीराच्या आतील आणि शरीराबाहेरची उपकरणे तसेच रोबोट कंट्रोल केले जातात.

नवीन काय?

सायन्स फिक्शन मुव्हीप्रमाणे स्वप्ने आणि वास्तव यातील दरी कमी करणार्‍या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत आहेत. मेंदूत घुसून मेंदू मानवी संज्ञानात्मक क्षमता म्हणजे कॉग्नेटिव्ह एबिलीटी समजून घेण्याचे वेगवान संशोधन सध्या ‘मेंदूबाज’ माणसांकडून सुरू आहे. जागतिक पटलावर येत्या काळात सर्वाधिक रोजगार संधी देणार्‍या ‘बीसीआय’ इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानापासून सामान्यजन अगदीच अनभिज्ञ आहेत. इलॉन मस्कची स्टार्टअप कंपनी ‘न्यूरालिंक’ला ‘ब्रेन-कॉम्प्युटर इंटरफेस’ (बीसीआय) टेक्नोलॉजीचा वापर करीत इलेक्ट्रॉनिक्स चिप आणि काही इलेक्ट्रॉनिक्स मायक्रो व नॅनो उपकरणांना मानवी मेंदूत बसविण्यासाठी तसेच चाचण्या घेण्यास युनायटेड स्टेट्स फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने (एफडीआय) नुकतीच परवानगी दिली आहे. परिणामी ‘रिमोट कंट्रोल’ने आता मेंदूदेखील नियंत्रित करणे तसेच कुठलाही आजार दूर करणे शक्य होणार आहे.

सुरुवात कशी झाली?

बीसीआय टेक्नोलॉजीची संकल्पना खरंतर 1970च्या दशकात उदयाला आली. मानवी मन काम कसे करते याचा अभ्यास करताना 1973 साली जॅक विडाल यांनी विश्लेषण करणार्‍या संगणक प्रणालीसाठी सर्वप्रथम ब्रेन-कॉम्प्युटर इंटरफेस म्हणजे सीसीआय हा शब्दप्रयोग केला. आता या क्षेत्रात इतकी प्रगती झाली आहे की जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग हे आपल्या पापण्या आणि डोळ्यातील बुबुळाच्या हालचालीवरून बाहेरील विविध उपक्रमांना नियंत्रित करीत असत. इतकेच नव्हे तर ‘मोटर न्यूरॉन डिसिज’ हा मज्जातंतूशी निगडित विरळ व असाध्य आजार असताना शरीराची हालचाल जवळपास पूर्णपणे थांबलेली असतानाही ब्रम्हांडाची रहस्ये उलगडणारे नेक सिद्धांत मांडणारी पुस्तके त्यांनी याच तंत्रज्ञानाचा वापर करीत लिहिली आणि प्रकाशित केली हे अनेकांना माहीत नाही. त्यांच्या मेंदूतील विचार समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी अनेक नवीन इलेक्ट्रॉनिक्स सेन्सर बनविले हे विशेष.

मानव जातीला फायदेशीर का?

जगभरातील लाखो लोक हे मानवी चेतातंतूशी निगडित विविध आजाराने त्रस्त आहेत. मायग्रेन आणि तणाव-प्रकारची डोकेदुखी, स्ट्रोक, अल्झायमर रोग, स्मृतिभ्रंश, अपस्मार, पार्किन्सन आजार, सेरेब्रल पाल्सी, मल्टिपल स्क्लेरोसिस अशी भलीमोठी आजारांची यादी आहे, जेथे ‘बीसीसीआय’ इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजीच्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाययोजना व उपचार शक्य आहे. न्यूरोरिहॅबिलीटेशनच्या माध्यमातून मानवी अवयव पुन:कार्यान्वित करणे, कॅन्सरसारख्या पेशींचा शोध घेत शरीरात त्यांची वाढ रोखणे व त्या नष्ट करणे, पेशींची नवनिर्मिती करीत मानवी आयुष्य वाढविणे अशा कितीतरी क्षेत्रात आवडीप्रमाणे करियर करणे शक्य आहे.

करियर संधी व भविष्यातील स्कोप काय?

अ‍ॅडवान्स टेक्नोलॉजीज्, न्यूरो सायन्स, वेगवान डेटा प्रोसेसिंग, मशीन लर्निंग अल्गोरीदम आदींच्या संगमामुळे ‘बीसीआय’ ची क्षमता कित्येक पटीने वाढली आहे. विविध इलेक्ट्रॉनिक्स सेंसरची निर्मिती, नवीन गेम विकसित करणे, चिंताविरहीत मेंदूसाठी लहरी निर्माण करणे, मेंदूतील विचार गुप्त ठेवण्यासाठी यंत्रणा विकसित करणे, आनंददायी भावनांच्या निर्मितीसाठी सुयोग्य प्रमाणात डोपामाईन व इतर एंझाइम्स व हार्मोन्सची निर्मिती व नियमन करणे आदी विविध क्षेत्रात करियरसाठी संधी उपलब्ध आहेत. याशिवाय मासमीडिया न वापरता केवळ इलेक्ट्रॉनिक्स लहरी वातावरण सोडत हवे तसे राजकीय जनमतप्रवाह निर्माण करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणा विकसित करण्यासाठीदेखील संधी उपलब्ध आहेत.
‘बीसीआय’ इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजीला वैद्यकीय क्षेत्रातच नव्हे तर तंत्रज्ञान क्षेत्रातदेखील अमाप संधी आहेत. कस्टमायझेशन करीत प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी यंत्रणा विकसित करीत या क्षेत्रात करियर करण्याबरोबरच पैसा, जॉब सटिस्फॅक्शन, क्रियेटिव्हीटीचा आनंद आणि अमाप करिअर संधींचे भांडार खुले आहे. असा ‘बीसीआय’ इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजीचा कुबेरी व जादूई खजाना आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -