घर भविष्य साप्ताहिक राशीभविष्य साप्ताहिक राशीभविष्य रविवार 11 जून ते शनिवार 17 जून 2023

साप्ताहिक राशीभविष्य रविवार 11 जून ते शनिवार 17 जून 2023

Subscribe

मेष : या सप्ताहात बुध, मंगळ कर्क राशीत प्रवेश करीत आहे. धंद्यात चांगली संधी मिळेल. थकबाकी वसलू करा. संसारात चांगली घटना घडेल. जमीन, घर यासंबंधी चिंता सप्ताहाच्या मध्यावर होऊ शकते. राग वाढेल. दूरदृष्टिकोन ठेवा. प्रेमाने प्रश्न सोडवा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. लोकप्रियता मिळेल. लोकांच्यासाठी चांगले काम करा. त्याचाच उपयोग पुढील काळात होईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नवीन परिचय फायदेशीर ठरेल. संशोधनाच्या कामात यश मिळेल. विद्यार्थी वर्गाने खाण्याची काळजी घ्यावी. ध्येयावर लक्ष द्यावे. शुभ दि. 11, १5

वृषभ : या सप्ताहात कर्क राशीत बुध, मंगळ प्रवेश करीत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला वादाचा प्रसंग निर्माण होईल. कौटुंबिक सौख्य मिळेल. नोकरीत प्रगती होईल. परदेशात जाण्याचा योग येईल. प्रेमाला चालना मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात पदाधिकार मिळेल. लोकांचे सहकार्य मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक व लाभ मिळेल. संशोधनाच्या कामात यशस्वी व्हाल. घर, जमीन खरेदी करता येईल. कोर्ट केस लवकर संपवा. सप्ताहाच्या शेवटी कायद्याचे पालन करा. भलता मोह टाळा. विद्यार्थी वर्गाला नवा विषय उत्तम प्रकारे निवडता येईल. शुभ दि. १2, 16

- Advertisement -

मिथुन : या सप्ताहात बुध, मंगळ कर्क राशीत प्रवेश करीत आहे. धंद्यात खर्च वाढेल. यांत्रिक काम करावे लागेल. डोळ्यांची काळजी घ्या. घरातील चिंता मन उदास करेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढतच जाईल. प्रत्येक गोष्टीला सीमा असते हे मात्र विसरू नका. लोक तुमच्या विरोधात बोलतील. कला-क्रीडा क्षेत्रात मोह होईल. विरुद्धलिंगी व्यक्तीकडून मनस्ताप होऊ शकतो. नोकरीत वरिष्ठ खूश होतील. संशोधनाच्या कामात प्रगती कराल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. जुने मित्र काड्या घालण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. परदेशात जाण्याचा योग येईल. शुभ दि. १3, १7

कर्क : या सप्ताहात तुमच्याच राशीत बुध, मंगळ प्रवेश करीत आहे. प्रतिष्ठेवर घाला घालण्याचा प्रयत्न सप्ताहाच्या सुरुवातीला होईल. कायदा मोडू नका. मारामारीचा प्रसंग येऊ शकतो. गुप्त शत्रू राजकीय-सामाजिक कार्यात अडचणी निर्माण करतील. त्या अडचणींवर यशस्वीरित्या मात कराल. मोठ्यांचे ऐका. प्रवासाचा बेत आखाल. वाहन हळू चालवा. बोलताना वेळेचे भान ठेवा. घरातील व्यक्ती तुमच्या पाठीशी असतील. कला-क्रीडा क्षेत्रात मैत्री वाढेल. प्रसिद्धीसाठी वेळ द्या. कोर्टकेस चिघळण्याची शक्यता आहे. सावध रहा. संशोधन कार्यात दिशाभूल होईल. वरिष्ठांचा दबाव राहील.
शुभ दि. १1, १4

- Advertisement -

सिंह : या सप्ताहात कर्क राशीत बुध, मंगळ प्रवेश करत आहे. सप्ताहाच्या शेवटी धंद्यात गैरसमज होऊ शकतो. एखादी व्यक्ती दबाव आणेल. जमीन, घर याची समस्या लवकर संपवा. नोकरीत वर्चस्व राहील. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा टिकवता येईल. मुलांच्या प्रगतीने खूश व्हाल. घरातील वाद मिटवण्याचा प्रयत्न करा. कोर्टाची पायरी चढावी लागेल, असे बोलू नका. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. कौतुक होईल. नवा परिचय होईल. कलागुणांचा विकास करणारी संधी मिळेल. संशोधनात यश मिळेल. विद्यार्थ्यांनी ध्येयावर लक्ष केंद्रित करावे. शुभ दि. १2, १5

कन्या : कर्क राशीत बुध, मंगळ प्रवेश करीत आहे. धंद्यात प्रगती करता येईल. मागील येणे वसूल करा. जमीन, घर यासंबंधी कामे करा. खरेदी-विक्रीत फायदा होईल. घरगुती कामे होतील. वाटाघाटीत यश मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात प्रभाव राहील. लोकांना तुमचे महत्त्व वाटेल असेच काम करत रहा. नोकरीत चांगला बदल करता येईल. अविवाहितांना लग्नासाठी स्थळे शोधता येतील. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. लाभ मिळेल. परदेशात जाण्याचा योग येईल. विद्यार्थी वर्गाने याच वर्षात अधिक मोठे यश मिळवण्याचा प्रयत्न करावा. शुभ दि. १3, १6

तूळ : या सप्ताहात कर्क राशीत बुध, मंगळ प्रवेश करीत आहे. सूर्य, चंद्र त्रिकोणयोग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीपासून तुम्ही महत्त्वाची कामे करा. धंद्यात वाढ होईल. घरातील वातावरणात संमिश्र स्वरूपाचा गैरसमज होऊ शकतो. रागावर ताबा ठेवा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे वर्चस्व निर्माण करा. कट करणारे जवळचे लोक पाहून ठेवा. प्रवासात वस्तू सांभाळा. कला-क्रीडा क्षेत्रात स्पर्धा जिंकाल. संशोधनाच्या कामात यश मिळेल. विद्यार्थी वर्गाला प्रगतीचा नवा टप्पा गाठता येईल. मैत्री जपून करा. व्यवहारात सावध रहा. शुभ दि. १4, १7

वृश्चिक : या सप्ताहात बुध, मंगळ कर्क राशीत प्रवेश करीत आहे. साडेसातीचे शेवटचे पर्व सुरू आहे. धंद्यात सुधारणा होईल. मैत्रीतून मोठे काम मिळवता येईल. घरातील लोकांना मदत करण्यात वेळ खर्च होईल. व्यवहारात सावध रहा. राजकीय-सामाजिक कार्यात विरोधक हल्लाबोल करण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही खंबीर राहू शकाल. नोकरीत कामाचे प्रेशर राहील. वरिष्ठांना नाराज करू नका. कला-क्रीडा क्षेत्रात ओळखी होतील. मेहनत करा. कोर्ट केस जिंकणे कठीण आहे. संशोधनाच्या कामात अडथळे येतील. विद्यार्थी वर्गाने नम्र वागावे. अभ्यास करावा. शुभ दि. १1, १3

धनु : धनु राशीला साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे. या सप्ताहात कर्क राशीत बुध, मंगळ प्रवेश करीत आहे. धंद्यात काम घेऊन ठेवा. कामगार वर्गाला सांभाळून ठेवा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमची प्रतिष्ठा राहील. पदाधिकार मिळेल. लोकांची नाराजी दिसून येईल. घरगुती कामे वाढतील. नातलगांसाठी धावपळ करावी लागेल. कला-क्रीडा क्षेत्रात मोठ्या लोकांचा सहवास मिळेल. प्रसिद्ध व्हाल. संशोधनाच्या कामात प्रगती होईल. कोर्ट केस संपवण्यात यश मिळू शकते. विद्यार्थी वर्गाने चांगली संगत व योग्य आहार घ्यावा. तरच प्रगती होईल. शुभ दि. १2, १4

मकर : मकर राशीला साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. या सप्ताहात कर्क राशीत बुध, मंगळ प्रवेश करीत आहे. अडचणी, तणाव धंद्यात होईल. गुंतवणूक करणारे भागीदार वाद घालतील. राजकीय-सामाजिक कार्यात तुमची प्रतिमा दूषित करण्याचा प्रयत्न होईल. जवळचे मित्र तुमची बाजू सावरून घेतील. कला-क्रीडा क्षेत्रात स्पर्धा फारच अवघड वाटेल. नवीन ओळख उत्साहवर्धक ठरेल. प्रवासात घाई करू नका. वाहन हळू चालवा. संशोधनाच्या कामात चुका होतील. लक्ष ठेवा. विद्यार्थी वर्गाने सरळ मार्गे रहावे. प्रवेश पत्रिका नीट भरावी. गोंधळ होईल. शुभ दि. १3, १5

कुंभ : या सप्ताहात कर्क राशीत बुध, मंगळ प्रवेश करीत आहे. सूर्य चंद्र त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात सप्ताहाच्या सुरुवातीलाच कामे मिळवा. नंतर अडचणी वाढतील. भागीदार खुसपट काढेल. नोकरीत वर्चस्व असले तरी व्याप वाढेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील. वाटाघाटीची चर्चा सफल होणे कठीण आहे. प्रकृतीची काळजी घ्या. आप्तेष्ठांना मदत करावी लागेल. खर्च वाढेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. तरीही मन उदास राहील. संशोधनाच्या कामाला दिशा मिळेल. ते लवकर पूर्ण करा. विद्यार्थ्यांना प्रवेश मनाप्रमाणे मिळू शकेल. शुभ दि. १4, 16

मीन : या सप्ताहात कर्क राशीत बुध, मंगळ प्रवेश करीत आहे. प्रत्येक दिवशी तुमची महत्त्वाची कामे करता येतील. वेळेला महत्त्व द्या. धंदा वाढेल. कामांची गर्दी होईल. पैसे वसूल करा. योग्य सल्ल्याने गुंतवणूक करा. राजकीय-सामाजिक कार्यात क्षुल्लक आरोप येऊ शकतो. प्रतिष्ठा राहील. पद मिळेल. वाटाघाटीत यश मिळेल. घरातील समस्या सोडवता येईल. प्रवासाचा बेत आखाल. प्रवासात घाई करू नका. वाहन हळू चालवा. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिकात भर पडेल. लोकप्रियता वाढेल. कला क्षेत्रात विशेष चमकाल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे अभ्यासक्रम निवडता येईल.
शुभ दि. १5, १7

- Advertisment -