घरफिचर्ससामान्यांत नायक शोधणारा असामान्य नायक!

सामान्यांत नायक शोधणारा असामान्य नायक!

Subscribe

अण्णाभाऊंच्या साहित्याचं वैशिष्ट्य हेच की त्यांच्या कथा अथवा कादंबरीचा नायक कधीच 'handsome, dashing' असा नव्हता. कधी तो गरीब घरात जन्मलेला, आई बाप नसलेला, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेला असा तो असायचा. पण तो त्यांचा 'हिरो' होता. त्यांच्या फकिरा, आघात, रूपा, माकडीचा माळ, बरबादया कंजारी, वारणेचा वाघ, वारणेच्या खोऱ्यात, माझे माहेर वाघदरा, वैजयंता, पाझर, गजाआड आणि यांसारख्या कितीतरी कथा-कादंबऱ्यांमधून त्यांनी जनसामान्यांना मोठं केलं हे त्यांच्या मनाचं मोठेपण म्हणावं लागेल.

आज लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती. अण्णाभाऊ साठे म्हटले की विशिष्ट समाजातले किंवा जातीतले लोकच त्यांची जयंती साजरी करताना दिसतात. इतर बऱ्याच मंडळींना तर अण्णाभाऊ साठे माहीतही नाहीत ही आपल्या भारतातली मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. कम्युनिस्ट विचारसरणीचे असलेल्या अण्णाभाऊंना एकदा रशियात जाण्याचा योग आला होता. रशियाच्या भ्रमंतीवर त्यांचं ‘माझा रशियाचा प्रवास’ हे प्रवासवर्णनपर पुस्तकही प्रसिद्ध आहे. त्यांचे राशियातल्या शहरांबद्दलचे पोवाडेही रशियात आणि भारतात प्रसिद्ध झाले. दीन-दलित, कामगार आणि हातमजुर यांच्यावर विशेष प्रेम असलेल्या अण्णाभाऊ साठेंच्या लेखणीतून कामगारांचं दुःख आणि वेदना व्यक्त होत असल्याने ते भारताबरोबरच राशियातही प्रसिद्ध झाले.

पंडित जवाहरलाल नेहरुंसंदर्भात एक किस्सा सांगितला जातो. जेव्हा पंडित नेहरू रशिया दौऱ्यावर होते तेव्हा तिकडच्या राष्ट्राध्यक्षांनी नेहरूंना प्रश्न विचारला, How is India And How is Annabhau? गोंधळात पडलेल्या नेहरूंना अण्णाभाऊ माहीत नव्हते. तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. आणि नंतर अण्णाभाऊंबद्दल चौकशी केली.

- Advertisement -

अण्णाभाऊ साठे हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतलं महत्वाचं नाव! त्यांच्या अनेक लावण्यांनी चळवळीला उभारी दिली. त्यांच्या लावण्यांमधून त्यांनी जनसामान्यांचं दुःख मांडण्याचा प्रयत्न केला. त्यापैकीच एक मुंबईतील गिरणी कामगारांच्या आयुष्यावर असलेली मुंबईची लावणी. या लावणीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. ‘माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतीया काहिली’ या ओळींमधून आपल्या कारभारणी पासून दूर राहण्याचं अतोनात दुःख व्यक्त होताना दिसतं.

अण्णाभाऊंच्या साहित्याचं वैशिष्ट्य हेच की त्यांच्या कथा अथवा कादंबरीचा नायक कधीच ‘handsome, dashing’ असा नव्हता. कधी तो गरीब घरात जन्मलेला, आई बाप नसलेला, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेला असा तो असायचा. पण तो त्यांचा ‘हिरो’ होता. त्यांच्या फकिरा, आघात, रूपा, माकडीचा माळ, बरबादया कंजारी, वारणेचा वाघ, वारणेच्या खोऱ्यात, माझे माहेर वाघदरा, वैजयंता, पाझर, गजाआड आणि यांसारख्या कितीतरी कथा-कादंबऱ्यांमधून त्यांनी जनसामान्यांना मोठं केलं हे त्यांच्या मनाचं मोठेपण म्हणावं लागेल.

- Advertisement -

आजही जगातील शोषित/दलित साहित्याचा विचार केला तर अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याला एक वेगळं स्थान आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण इतकी प्रतिभा असलेल्या प्रतिभावंताचा अंत मात्र करूण दारिद्र्यात व्हावा, ही एक मोठी शोकांतिका ठरली. देवाधर्माच्या गारोड्यात अडकलेल्या महाराष्ट्रात आपण अनेक देवा-धर्माच्या पालख्या निघताना पाहतो. पण सांगली जिल्ह्यातील वाटेगावात, अण्णाभाऊंच्या मूळ गावी त्यांच्या साहित्याची, त्यांच्या पुस्तकांची पालखी काढली जाते ही अभिमानाची बाब म्हणावी लागेल.

अण्णाभाऊ साठे या व्यक्तिमत्वाला जाणून घेण्यासाठी साहित्यात एक वेगळं स्थान निर्माण करणारी त्यांची पुस्तकं वाचायला हवीत आणि अण्णाभाऊंबद्दल जाणून घ्यायला हवं, एवढंच !

दलित-कामगार-हातमजुरांची दुःख मांडणाऱ्या साहित्याला क्रांतिकारी सलाम!

– अरहत धिवरे (पत्रकारिता विद्यार्थी)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -