घरफिचर्ससौंदर्यवतीस अभिवादन!

सौंदर्यवतीस अभिवादन!

Subscribe

नूतन समर्थ बेहल. नूतन या नावाने ओळखली जाणारी ही भारतीय अभिनेत्री सौन्दर्याची खाण होती. चार दशकांहून अधिक काळ चित्रपट सृष्टीत करियर केलेल्या नूतनने ७० हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये भाग घतला आहे. हिंदी सिनेमाच्या इतिहासात ती सर्वोत्कृष्ट महिला कलाकार म्हणून ओळखली जाते. ४ जून १९३६ रोजी मराठी चांद्रसेनीय कायस्थ प्रभू(सीकेपी) कुटुंबात नूतनचा जन्म झाला. दिग्दर्शक, कवी कुमारसेन समर्थ आणि अभिनेत्री शोभना यांच्या ४ मुलांपैकी सर्वात मोठी नूतन. प्रसिद्ध अभिनेत्री तनुजा ही नूतनची सर्वात लहान बहीण. अभिनेत्री तनुजा, चतुरा आणि जयदीप ही नूतनची लहान भावंडे.

शालेय जीवनातच नूतनने अभिनयाला सुरुवात केली. आई शोभना समर्थ यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘हमारी बेटी’तून नूतनने हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. मात्र कालांतराने आई शोभना यांनी नूतनला स्वित्झर्लंडमध्ये पुढील शिक्षणासाठी पाठवले. भारतात पुन्हा आल्यानंतर नूतनने ‘हम लोग’ आणि ‘नगना’ सारख्या चित्रपटात काम केले. दरम्यानच्या काळात नूतनला मिस इंडियाने सन्मानित करण्यात आले. १९५५ मध्येच नूतनने अभिनयाच्या क्षेत्रात सर्वोच्च स्थान प्राप्त केले. १९५५ मध्ये ‘सुधार घर’ चित्रपटात नूतनने अपराध्याची भूमिका साकारली. या भूमिकेसाठी प्रेक्षकांसह, चित्रपट समीक्षकांनी नूतनची खूप प्रशंसा केली. एवढेच नसून त्या भूमिकेसाठी नूतनला प्रथमच सर्वोत्कृष्ट नायिकेच्या भूमिकेसाठी फिल्म फेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘पेयिंग गेस्ट’ आणि ‘दिल्ली का ठग’ या चित्रपटांमुळे नूतनचे १९५७ मध्ये त्याकाळी बिकिनी गर्ल्सच्या यादीत नाव घेतले जाऊ लागले. अभिनेता मोहनीश बेहल हा नूतनचा मुलगा.

- Advertisement -

मुलाच्या जन्मानंतर नूतन काही काळ चित्रपट सृष्टीपासून लांब राहिली. १९६३ मध्ये ‘तेरे घर के सामने’ या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाद्वारे नूतनने पुन्हा चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. त्याच वर्षी विमल रॉय च्या ‘बंदिनी’ मध्ये सुद्धा नूतनने भूमिका केली. १९७० मध्ये नूतनने पुन्हा यशाचे शिखर गाठले. यावेळी ‘मिलन’, ‘सरस्वतीचंद्र’, ‘दिल ने फिर याद किया’, ‘सदाबहार’, ‘मै तुलसी तेरे आंगणे की’, ‘साजन बिना सुहागन’, ‘कस्तुरी’ सारख्या चित्रपटातून नूतनने दमदार भूमिका साकारल्या. १९७९ मध्ये सुजाता चित्रपटातील नूतनची भूमिका विशेष लक्षवेधी ठरली. १९९१ मध्ये नूतनचे ‘नशिबवाला’ आणि ‘इंसानियत’ हे चित्रपट प्रदर्शित झाले. ११ ऑक्टोबर १९५९ मध्ये नूतनने लेफ्टनंट कमांडर रजनीश बहल यांच्याशी विवाह केला. त्यानंतर १९६१ मध्ये नूतनचा मुलगा अभिनेता मोहनीश बहलचा जन्म झाला. आई प्रमाणेच मोहनीश बहल यांनी अभिनय क्षेत्राची निवड केली.

१९९० साली नूतनला स्तनांचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. कर्करोगावर मात करण्याचा आजचा दिवस. नूतनने कर्करोगाने खूप त्रास सहन केला. तेव्हा कर्करोगावरील उपचारही दुर्मीळ होते. कर्करोग झाला की मृत्यू अटळ अशीच भावना तेव्हा होती. आज प्रगत विज्ञानाने या असाध्य रोगावरही मात केली आहे. कर्करोगात ग्रस्त झालेल्या नूतनविषयी प्रत्येक भारतीयाच्या मनात एक भावनात्मक कप्पा निर्माण झाला होता. तिने जगलं पाहिजे, असंच सर्वांना वाटे. अशी शांत स्वभावाची हुरहुन्नरी अभिनेत्री २१ फेब्रुवारी १९९१ रोजी उपचारा दरम्यान मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात जगाला सोडून गेली तेव्हा तिचे चाहते धायमोकलून रडले. अनेक मान्यवर कलाकारांचं देखणं रूप म्हणजे नूतन, अशी व्याख्या बनलेल्या नूतची आठवण तहहयात राहण्याचं कारणही तिच्या सौंदर्यात होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -