घरफिचर्सविवाहबाह्य संबंधामध्ये महिलांकडूनच का केली जाते अवास्तव अपेक्षा

विवाहबाह्य संबंधामध्ये महिलांकडूनच का केली जाते अवास्तव अपेक्षा

Subscribe

विवाहबाह्य संबंध हे आपल्या संस्कृतीत आणि आपल्या समाजात सहजासहजी स्वीकारले जात नाहीत. या संबंधाबाबत कोणीही उघड बोलू शकत नाही. म्हणूनच सर्वाधिक घुसमट असे संबंध प्रस्तापित केलेल्या स्त्री पुरुषांचीच होताना दिसते.

विवाहबाह्य संबंध हे आपल्या संस्कृतीत आणि आपल्या समाजात सहजासहजी स्वीकारले जात नाहीत. या संबंधाबाबत कोणीही उघड बोलू शकत नाही. म्हणूनच सर्वाधिक घुसमट असे संबंध प्रस्तापित केलेल्या स्त्री पुरुषांचीच होताना दिसते. वैवाहिक संबंधातील कोणतीही तक्रार आपण उघड बोलून दाखवू शकतो. पण विवाहबाह्य संबंध आणि त्यातून होणारा मानसिक त्रास कोणाशीच बोलता येत नाही. वास्तविक हे संबंध दोघांच्या गरजेतून निर्माण झाले आहेत, की एकजण फक्त दुसर्‍यावर उपकार करतोय, या संबंधाचा पाया खरंच प्रेम, आदर आणि आपुलकी आहे. परस्परांना ओळखून पारखून हे संबंध सुरु झालेत की अगदीच वरवरच्या गोष्टींवर भाळून आपली फसगत झाली की फक्त आणि फक्त शारीरिक गरज भागवणे हा हेतू आहे, हे समजणं कठीण असत. त्यातून यातील एक जण विवाहित आणि एकत्र कुटुंबातील असेल तर दुसरा एकाकी जीवन जगणारा परंतु रिलेशनशिपमध्ये असणारा जास्तच भरडला जातो.

विवाहबाह्य संबंधामध्ये एकमेकाबद्दलचे शारीरिक आकर्षण ही एकच गोस्ट प्रामुख्याने गृहीत धरली जाते. महिला जेव्हा एकटी असल्यामुळे किंवा पतीपासून सुखी नसल्यामुळे विवाहबाह्य संबंध स्वीकारते, तेव्हा तीच्या बाबतीत तर फक्त आणि फक्त शारीरिक गरज हाच भाग अधोरेखित केला जातो. समुपदेशनसाठी आलेल्या अनेक विवाहबाह्य प्रकरणातून हेच जाणवले की, ज्या स्त्रीने कोणत्याही कारणास्तव असे संबंध प्रस्तापित केलें आहेत त्यातून तीला समोरची व्यक्ती समजून घ्यायला खूपच कमी पडत आहे. जेव्हा कोणताही विवाहित पुरुष आणि विवाहित महिला दुसरे संबंध प्रस्तापित करतात तेव्हा महिलांनी काही भावनिक, मानसिक अपेक्षा त्या पुरुषाकडून ठेवलेल्या असतात. पतीपासून जे भावनिक सुख, काळजी, प्रेमाचे शब्द, स्तुती, आदर, समजूतदारपणा तीला मिळत नाही किंवा पती पत्नीमध्ये कुठेतरी आवडीनिवडी, सवयी, एकमेकांचे विचार पटत नाहीत तेव्हा याच्या शोधार्थ असे संबंध तयार होतात. परंतु, जेव्हा एखादी स्त्री पर पुरुषाशी संबंध ठेवते तेव्हा त्यात समोरील पुरुष फक्त तीची शारीरिक गरज ओळखतो. महिलेची ती गरज कदाचित बर्‍यापैकी पूर्ण देखील होते. तीची मानसिक, भावनिक, कमतरता, तीच्या फीलिंग्स, गुंतवणूक आणि कंमिटमेन्ट याला पुरुषाकडून फारसा थारा दिला जात नाही. पुरुषांना विवाहबाह्य संबंध ठेवनारी स्त्री ही इतकी निकृष्ट दर्जाची का वाटावी? मग ती कितीही चांगल्या घरातील असली, सुशिक्षित असली, तीचे सासर, माहेर कितीही प्रतिष्टीत असले तरी तीच्या भावना, गरजा, अपेक्षा पूर्णत्वास नेण्यासाठी एखाद्या चांगल्या मित्राची, सोबतीची गरज वाटू शकते, हे कोणाकडूनही समजून घेतले जात नाही. समाज किंवा घरातले तर अशा नात्यांना कधीच स्वीकारत नसतात आणि आपल्या परंपरेनुसार पुरुषाने घराबाहेर निर्माण केलेले संबंध घरापर्यंत आणणे आणि घरच्यांनी ते स्वीकारणे हे कदापिही शक्य नसते. विवाहित पुरुषाशी संबंध ठेवणारी स्त्रीदेखील स्वतःच्या मर्यादा अनेकदा ओळखून असते. त्यामुळे तीच्या अपेक्षा खूपच माफक असतात. निदान आपण ज्याच्यावर प्रेम केले आणि आपले सर्वस्व ज्याला दिले, त्याने तरी आपल्याला समजून घ्यावे, एवढी माफक अपेक्षा त्या स्त्रीची असते. परंतु, परक्या पुरुषासोबत मैत्री केली आणि शारीरिक संबंध ठेवले की त्या स्त्रीला खूप अडचणींना सामोरे जावे लागते. स्वतः च्या गरजेपोटी, ती समाजाला झुगारून, कुटुंबातील लोकांना चोरून लपून स्वतःला एखाद्याच्या प्रेमात झोकून देते. त्या ठिकाणी ती कशाचाही विचार करत नाही. कारण तीने जशा जीवनसाथीचे स्वप्न पाहिलेले असते ते ती पूर्ण करण्यासाठी धडपडत असते. पण ज्याच्यासाठी ती हे करते तो तीला कितपत न्याय देतो किंवा न्याय तर सोडा कशी वागणूक देतोय हे समजायला तीला खूप उशीर लागतो. सीमा (काल्पनिक नाव) नवर्‍या पासून वेगळे झाल्यावर तीचे एक वैवाहिक पुरुष अशोक (काल्पनिक नाव) सोबत संबंध निर्माण झाले. जो अशोक सुरुवातीला तीला तीच्या स्वप्नांचा राजकुमार वाटत होता तो कालांतराने तीला इतका गृहीत धरू लागला होता की, स्वतः च्या सोईनुसार तीला हवे तसे नाचवत होता. पण सीमावर मात्र इतकी बंधन होती की तीने अशोकला तो घरी असतांना फोन करायचा नाही, तो बोलायला फ्री असेल तेव्हाच बोलायचं. जेव्हा त्याला टाइम्स अ‍ॅडजस्ट होईल तेव्हाच तीने भेटण्याची वेळ अ‍ॅडजेस्ट करायची. त्यांच्या पूर्ण रेलशनशिपमध्ये कधीही सीमाच्या मूडला प्राधान्य दिल नव्हतं. अशोक स्वतः च्या कोणत्याही गोष्टीशी थोडीही तडजोड करत नव्हता.

- Advertisement -

अनघा (काल्पनिक नाव ) स्वतः च्या पतीसोबत शारीरिक संबंधामध्ये हवी तेवढी समाधानी नव्हती म्हणून तीला अजय (काल्पनिक नाव सामाजिक कार्यक्रमात ओळख झालेला एक सहकारी) खूप आवडू लागला. अजय पण पत्नीपासून शारीरिक बाबतीत तीतकासा खुश नव्हता म्हणून दोघांचं सूत लगेच जमलं.सुरुवातीला अनघाला अजय सोबत इंटरनेटवर दाखवल्यानुसार विविध नाविन्यपूर्ण शारीरिक संबंध करणे आनंददायी वाटत होते. पण कालांतराने अजयने तिच्याकडे विविध फिल्म पाहून अशा काही अपेक्षा केल्या की तीच्या कल्पनेपलीकडले होते. त्याच्या इतक्या गलिच्छ अपेक्षा ऐकून तीच्या पाया खालची वाळू सरकली. यावेळी अजयला स्पष्टपणे नकार देणे आणि त्यांचे संबंध इतक्या खालच्या थराला अजयने नेले आहे, हे समजून घेणे अनघाला अतिशय कठीण होते. अनघाला समुपदेशन मार्फत अजयच्या या मागण्या किती चुकीच्या आहेत आणि त्याची तुझ्याकडे पाहण्याची दृष्टी किती खालच्या थराची आहे, हे लक्षात आणून द्यावे लागले.

– मीनाक्षी जगदाळे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -