घरसणवारआदिवासी पाड्यांवरील दिवाळी

आदिवासी पाड्यांवरील दिवाळी

Subscribe

दिवाळी म्हणजे हर्ष आणि उत्साह. त्यातही लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांचाच आवडता सण. नवीन कपडे खरेदी करण्याची लगबग, खमंग फराळ आणि आतिषबाजी. पण, काळप्रमाणे आता सगळ्याच सणांच स्वरूप बदललं आहे. पण, ग्रामीण भागातील आदिवासी पाड्यांवर मात्र, आजही जुन्याच प्रथेप्रमाणे दिवाळसण साजरा केला जातो.

पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागात आजही दिवाळी अगदी पारंपरिक वेशभूषेत आणि तारपा नृत्याने साजरी केली जाते. वसुबारस पासून दिवाळीला सुरुवात होते. या कालखंडात देवी देवतांचा जागर होत असतो. हिरवा, कनसरी, धनतरी, गावतरी, चेडा, वीर, यांना नवस पुरवून सगळयांना सुखी ठेवण्याची प्रार्थना केली जाते. मानुसपुतळा, गाय-गोजी, चिडी-मुंगी, कोंबडी-बकरी, घरादाराला,….सुखी ठेवजोस. सगळ्यांना धान्याची बरकत मिळून दिजोस, अशी बोलीभाषेत आर्त साद निसर्ग देवांना आदिवासी घालतात.

- Advertisement -

आदिवासी समाजाचे तारपा हे पारंपरिक वाद्य…या वाद्याचा सूर कानी पडताच लहान मुलांपासून ते वयोवृद्ध आनंदाने गोल फेरा धरून नाचत असतात.

पानांतली पानमोडी

केळी, कवदर, पळस, कुहरुळ इत्यादी झाडांची पाने वाळवून खाद्य पदार्थ बनविण्यासाठी वापरली जातात. काकडी किसून त्यात गोड धोड टाकून पानात टाकून ती वाफ देऊन भाकरी बनवली जाते. तिला काही ठिकाणी पानमोडी म्हणतात. दिवाळी सणात बाखरी, कांदफळे, चवळीच्या शेंगा खात असतात. चवळीच्या डाळीचे वरण, भात, सोयीनुसार भाजी अशा प्रकारच्या खाद्यान्न बनविणे हे दिवाळ सणाचे वैशिष्ट्य.

- Advertisement -

हेही वाचा – राज्य सरकारचा यू-टर्न; वाढीव वीज बिलातून दिलासा मिळणार नाही


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -