घरभविष्यएका आठवड्यानंतर 'या' ६ राशींचं बदलणार आयुष्य; बृहस्पतींच्या संक्रमणाने होणार मोठे बदल

एका आठवड्यानंतर ‘या’ ६ राशींचं बदलणार आयुष्य; बृहस्पतींच्या संक्रमणाने होणार मोठे बदल

Subscribe

देवगुरू बृहस्पती १२ वर्षानंतर आपल्या स्वतःच्या राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. देवगुरू १३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजून २३ मिनिटांनी मीन राशीमध्ये प्रवेश करतील. यामुळे या राशींना त्याचं उत्तम फळ मिळण्याची शक्यता आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार एप्रिल महिना ग्रहांच्या संक्रमणासाठी अतिशय उत्तम आहे. खरंतर या महिन्यामध्ये सर्व ९ ग्रहांच्या  राशी परिवर्तन होणार आहे. याचदरम्यान ग्रहांमध्ये देवगुरू बृहस्पती १२ वर्षांनंतर आपल्या स्वतःच्या राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. देवगुरू १३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजून २३ मिनिटांनी मीन राशीमध्ये प्रवेश करतील. यामुळे या राशींना त्याचं उत्तम फळ मिळण्याची शक्यता आहे.

मेष 
बृहस्पती आपल्या १२ व्या रेषेत प्रवेश करतील, ज्यामुळे या दरम्यान तुम्हाला देश-विदेशाचा प्रवास करावा लागू शकतो. धार्मिक कार्यात रस वाढेल. तसेच तुमचे दाम्पत्य जीवन आनंदात राहील. व्यापारामध्ये आर्थिक लाभ होईल.

- Advertisement -

वृषभ
बृहस्पती आपल्या ११ व्या रेषेत प्रवेश करतील, ११ वी रेष तुमच्या आर्थिक स्थितीचा असतो. त्यामुळे या ठिकाणी गुरू असल्याने तुम्हाला आर्थिक बाबतीत विशेष लाभ होईल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात सौख्याचं वातावरण राहील. विद्यार्थ्यांसाठी उत्तम काळ असेल.

मिथुन
गुरू तुमच्या कर्म स्थानी असतील, कुंडलीत १० व्या भाव कर्मांशी संबंधित मानला जातो. अशावेळी तुम्हाला रोजगारात जबरदस्त फायदा होईल, शिवाय करिअरमध्ये सफलता प्राप्त होईल, नोकरदार लोकांना मान-सन्मान मिळेल.

- Advertisement -

कर्क
गुरू तुमच्या ९ व्या भावात असेल, ९ व्या भावाला भाग्याशी संबंधित मानलं जातं, बृहस्पतीच्या प्रवेश तुमच्यासाठी अनुकूल असेल, यावेळी तुमचा पगार वाढू शकतो, तसेच तुमच्या संपत्तीमध्ये देखील वाढ होऊ शकते.

सिंह
गुरू तुमच्या ८ व्या भावात असेल, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. परंतु वैवाहिक जीवनात कलह निर्माण होऊ शकतो.

कन्या
तुमच्या करता बृहस्पतीचा प्रवेश लाभकारी असेल, कुटुंबासोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल. ज्यांचं लग्न झालेलं नाही, अशा लोकांना विवाहाचे प्रस्ताव येतील. शिवाय आर्थिक लाभसुद्धा होईल.


हेही वाचाः B Praak : सिंगर बी प्राक होणार पुन्हा बाबा; लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवशी प्रेग्नेंसीची घोषणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -