मेष : महत्त्वाची कामे करून घ्या. घरातील व्यक्तीच्यासाठी वेळ खर्च होईल. खाण्याची काळजी घ्या.
वृषभ : धंदा वाढेल. तुमच्या प्रगतीचा विचार तुम्हाला करावा लागेल. कल्पनाशक्तीला वाव मिळेल.
मिथुन : मौज-मजा करण्याचा, नातलगांना भेटण्याचा बेत ठरवाल. मान-प्रतिष्ठा मिळेल.
कर्क : धंद्यात दगदग झाली तरी ओळख वाढेल. तुमच्या कार्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागेल.
सिंह : आज ठरविलेले काम आजच करा. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. वाटाघाटीत यश मिळेल.
कन्या : नोकरीत वरिष्ठांना दुखवून चालणार नाही. प्रवासात घाई करू नका. व्यवहारात सावध रहा.
तुला : आजचे काम उद्यावर टाकू नका. भावनांना आवर घाला. धंद्यात लक्ष द्या.
वृश्चिक : ठरविलेले काम वेळच्या वेळी करा. धंदा वाढेल. महत्त्वाच्या कामासाठी प्रवास कराल.
धनु : आर्थिक लाभ होईल. जुने येणे वसूल करा. तुमचे बोलणे प्रभावी ठरेल.
मकर : लोकसंग्रह वाढवण्याचा प्रयत्न करा. जुने मित्र भेटतील. वाद मिठवण्याचा विचार होईल.
कुंभ : व्यवहारिक बोलणी यशस्वी होतील. नोकरीतील प्रश्न सुटेल. प्रतिष्ठा वाढेल.
मीन : प्रगतीची दिशा खुली होईल. गंभीरपणे विचार करा. विरोधक मैत्री करण्यासाठी येतील.