Eco friendly bappa Competition
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : गुरुवार २४ ऑगस्ट २०२३

राशीभविष्य : गुरुवार २४ ऑगस्ट २०२३

Subscribe

मेष : तुमच्यावर एखादा आरोप झाल्याने तुम्ही उदास व्हाल. तात्पुरता प्रश्न निर्माण होईल. दादागिरी करून चालणार नाही.

- Advertisement -

वृषभ : कठीण असलेले काम लवकर करून घ्या. सरकार दरबारी असलेला प्रश्न सोडवता येईल. वरिष्ठांची मदत घेता येईल.

मिथुन : धंद्यात फायदा होईल. कला-क्रीडा क्षेत्रात कौतुकाचे बोल ऐकावयास फायदा होईल. नातलगांची भेट होईल. मजा कराल.

- Advertisement -

कर्क : धंद्यातील तणाव कमी करता येईल. शेजारी तुमच्याकडे मदतीची अपेक्षा ठेवेल. जुने काम परत मिळवता येईल.

सिंह : क्षुल्लक कारणाने नोकरीत तणाव होऊ शकतो. जबाबदारी वाढेल. कायदा मोडू नका. नोकर कमी होण्याचा संभव आहे.

कन्या : अपेक्षित व्यक्तीची मदत घेता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात प्रभाव पडेल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल.

तूळ : आत्मविश्वासाने निर्णय घेता येईल. स्पर्धेत जिंकाल. नवीन ओळख धंद्यासाठी उपयुक्त ठरेल. पद मिळेल.

वृश्चिक : सामाजिक कार्यात नावलौकिक मिळेल. लोकप्रियता मिळेल. कल्पनाशक्तीला चालना मिळेल. धंद्यात प्रगती होईल.

धनु : तुमच्या क्षेत्रातील समस्या सोडवण्याचा मार्ग मिळेल. वाटाघाटीत यश मिळेल. जुने पैसे वसूल करा.

मकर : महत्त्वाचे काम करता येईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा सांभाळा. भलते आश्वासन देऊ नका.

कुंभ : खर्चावर बंधन घालावे लागेल. शेजारी मदत मागण्यास येतील. व्यवसायात उधारीवर माल देऊ नका.

मीन : आज ठरविलेल्या कामात यश मिळवता येईल. आप्तेष्ठांची भेट घेता येईल. जुना प्रश्न सुटेल.

- Advertisment -