घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : बुधवार २१ जून २०२३

राशीभविष्य : बुधवार २१ जून २०२३

Subscribe

मेष : आनंदी रहाल. तुमच्या धोरणाला इतरांचा पाठिंबा जिद्दीने मिळवावा लागेल. विरोध सहन करता येईल.

वृषभ : कोर्टाच्या कामात योग्य व्यक्तीचा सल्ला घेता येईल. धंद्यात चालढकलपणा करू नका. सावध रहा.

- Advertisement -

मिथुन : मनावर दडपण येईल. भावना व कर्तव्य यांचा मेळ नीट घाला. कामात चुका कमी करा. यश मिळेल.

कर्क : उत्साहित रहाल. कामातील बदल फायदेशीर ठरेल. तब्येतीची काळजी घ्या. धंद्यात वाढ होईल.

- Advertisement -

सिंह : अरेरावी करण्यामुळे सामाजिक कार्यात वाद निर्माण होऊ शकतो. राग आवरा. शेजार्‍याला मदत कराल.

कन्या : स्पर्धेत जिंकाल. नवीन ओळख उत्साह देणारी ठरेल. प्रेेमाला चालना मिळेल. धंद्यात लाभ होईल.

तूळ : जिद्दीने सर्व कामे पूर्ण कराल. गरजूंना मदत करा. ओळख उपयोगी पडेल. कोर्टाचे काम मार्गी लागेल.

वृश्चिक : तुमच्या कार्याला योग्य वळण मिळेल. अडचण दूर करता येईल. योग्य ठिकाणी खर्च करा.

धनु : धंद्यात फायदेशीर योजना समोरून येऊ शकते. नातलगांचा सहवास मिळेल. प्रगतीकारक संधी चालून येईल.

मकर : महत्त्वाची कामे होतील. दौर्‍यात यश मिळेल. लोकप्रियतेत वाढ होईल. धंद्यात वाढ होईल.

कुंभ : किरकोळ कारणाने राग वाढेल. प्रवासात घाई करू नका. कला-क्रीडा क्षेत्रात माघार घ्यावी लागेल.

मीन : ठरविलेला कार्यक्रम योग्य वेळेत पूर्ण करता येईल. कामातील सहकारी मदत करतील. तब्येत उत्तम राहील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -