घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : मंगळवार १९ मार्च २०२४

राशीभविष्य : मंगळवार १९ मार्च २०२४

Subscribe

मेष – मित्राचा राग शांत करण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या मदतीने शेजार्‍यांची कामे होतील. धंद्यात नवे काम मिळेल.
वृषभ – सामाजिक कार्यात विरोधक टीका करण्याचा प्रयत्न करतील. अडचणी वाढण्याची शक्यता आहे. संयम बाळगा.
मिथुन- मनावरील ताण कमी होईल. मुलांच्या सहवासाने दु:ख कमी होईल. धंद्यासाठी प्रवास संभवतो. प्रकृतीकडे दुर्लक्ष नको.
कर्क – कामात आक्रमक पवित्रा घेऊ नका. तुमच्या मताशी इतरांची मते जुळणे कठीण होईल. कायद्याचे उल्लंघन करू नका.
सिंह – मित्रांच्या वादात मध्यस्थी करावी लागेल. तुमच्याबद्दल इतरांना आदर वाटेल. धंद्यासाठी भांडवल उभे करणे सोपे जाईल.
कन्या – सामाजिक कार्यात लोकांच्या अपेक्षा वाढतील. शत्रूला तुमच्या सहकार्याची गरज निर्माण होईल. धंद्यात लाभ होईल.
तूळ- संततीच्या समस्येवर उपाय शोधता येईल. अडचणीवर मात करता येईल. नवीन कामासाठी प्रवास होईल. यश मिळेल.
वृश्चिक- दुसर्‍यांच्या मताचा मान ठेवा. तुमच्या कामातील अडचणी कमी करण्याचा प्रयत्न करावा लागेल. सहकारी मदत करतील.
धनु – कामात तुमच्या विचारांना चालना मिळेल. महत्त्वाची व अपेक्षित असलेली व्यक्ती भेटण्यात यश मिळवता येईल.
मकर – तुमचे आकर्षण इतरांना वाटेल. मित्र-परिवार वाढेल. धंद्याला मदत मिळेल. नोकरवर्गाची नाराजी दूर करा.
कुंभ – वेळेवर ठरविलेली कामे पूर्ण करा. सामाजिक कार्यात महत्त्वाच्या विषयावर लोकांशी चर्चा करता येईल. धंद्यात वाढ होईल.
मीन – कामात दगदग होईल. घरातील प्रश्नांवर राग वाढेल. संयम बाळगा. शांततेतून मार्ग काढता येईल. कोर्ट केस जिंकाल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -