Lucky Finger : अशी बोटं असणाऱ्या मुली असतात आपल्या पार्टनरसाठी लकी

समुद्र शास्त्रानुसार अशा भाग्यवान मुलींबद्दल सांगणार आहोत ज्यांच्या बोट्यांच्या रचने वरून त्या आपल्या पार्टनरसाठी किती लकी आहे हे ओळखू शकतो

ज्योतिष शास्त्रात जसे आपण व्यक्तिच्या जन्म कुंडली वरून भविष्य आणि स्वभाव ओळखतो तसेच समुद्र शास्त्रात व्यक्तिची शरीर रचना, आकार यांवर भाष्य केले जाते. आज आपण समुद्र शास्त्रानुसार अशा भाग्यवान मुलींबद्दल सांगणार आहोत ज्यांच्या बोट्याच्या रचने वरून त्या आपल्या पार्टनरसाठी किती लकी आहे हे ओळखू शकतो.

या मुली असतात आपल्या पार्टनरसाठी लकी

  • लहान बोटं असणाऱ्या मुली
    समुद्र शास्त्रानुसार ज्या मुलींच्या हाताची बोटं लहान असतात, त्या खूप खर्चीक असतात या मुलींना शॉपिंग आणि लग्जरी वस्तू खरेदी करण्याची आवड असते. परंतु यांची खासियत अशी असे असते की,या मुली कोणतेही नाते चांगल्या प्रकारे निभावतात. सुख-दुःखात सर्वांना साथ देतात. तसेच यांचे विचार खुले असतात. या मुलींचे मन साफ असते.
  • वैवाहिक आयुष्याचे रहस्य सांगतात अशी बोटं
    समुद्र शास्त्रानुसार हाताच्या बोटांकडील भाग बारीक असतो. अशी बोटं असणाऱ्या मुलींचे वैवाहिक आयुष्य सुखी असते. तसेच या खूप प्रेमळ असतात. घरातील व्यक्तींची खास काळजी घेतात. शिवाय इतकंच नाही या मुली पतीसाठी खूप लकी असतात.
  • गोल आणि लांब बोटं असणाऱ्या मुली
    समुद्र शास्त्रानुसार गोल आणि लांब बोटं असणाऱ्या मुली खूप सौभाग्यशाली असतात. या मुली आपल्या स्वभावाने सगळ्यांचेच मन जिंकून घेतात. या कोणत्याही परिस्थितीत आपल्या पतीला साथ देतात.

 


हेही वाचा :ग्रहांचा राजा सूर्य बदलणार तुमचे आयुष्य, ‘या’ राशींना होणार दुप्पट फायदा