2025 पर्यंत ‘या’ राशींवर असणार शनीची साडेसाती

ज्योतिष शास्त्रामध्ये शनीला न्याय देवता म्हटलं जातं. कारण शनी देव प्रत्येक व्यक्तीला कर्मानुसार फळ देतात. सोबतच शनीची चाल ग्रहांच्या तुलनेत खूप हळू असते. अडीच वर्षामध्ये तो राशीपरिवर्तन करतो. त्यामुळे कोणत्याही राशीमध्ये त्याला परत पोहचण्यासाठी 30 वर्ष लागतात. यावेळी शनी कुंभ राशीमध्ये आहे. यादरम्यान, 3 राशींवर शनीची साडेसाती असणार आहे. या राशीच्या व्यक्तींना मार्च 2015 पर्यंत अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे या व्यक्तींना खूप सर्तक राहावं लागणार आहे.

2025 पर्यंत ‘या’ राशींवर असणार शनीची साडेसाती

Horoscope Today, April 25, 2022: Check the predictions for all Zodiac signs  | Marca

मकर

मकर राशीच्या व्यक्तींवर 2025 शनीच्या साडेसातीचा तिसरे आणि शेवटचे चरण राहिल. साडेसतीचा तिसरा टप्पा तुलनेने कमी वेदना देतो. मात्र या काळात व्यवहारात सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच आरोग्याची काळजी घ्या.

कुंभ

कुंभ राशीमध्ये स्वतः शनी देव विराजमान आहेत. सध्या या राशीमध्ये शनीच्या साडेसातीचे दुसरे चरण सुरु आहे. हा टप्पा सर्वात कठीण आहे. कुंभ राशीच्या व्यक्तींना 2025 पर्यंत शारिरीक, मानसिक आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या काळात रागावर नियंत्रण ठेवा.

मीन

2025 पर्यंत मीन राशीवर शनीच्या साडेसातीचे पहिले चरण राहील या काळात खर्च वाढेल. आर्थिक समस्या उद्भवतील. जीवनसाथीसोबतचे नाते बिघडेल. तुमच्या जोडीदाराला पूर्ण वेळ देणं चांगले राहील.


हेही वाचा :

तब्बल 70 वर्षांनंतरच्या पंचमहायोगाचा ‘या’ 4 राशींना होणार फायदा