घरभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यराशीभविष्य : रविवार २५ फेब्रुवारी ते शनिवार २ मार्च २०२४

राशीभविष्य : रविवार २५ फेब्रुवारी ते शनिवार २ मार्च २०२४

Subscribe

मेष :- या सप्ताहात चंद्र, गुरू लाभयोग, बुध नेपच्यून युती होत आहे. उद्योगात जम बसेल. मागील येणे वसूल करा. नवे काम मिळवा. तुमची जिद्दच उपयोगात येईल. राजकीय-सामाजिक कार्यात मोठे लोक आरोप करतील. टीका करतील. तुमचे मन स्थिर ठेवा. शांत राहा. राग आवरा. प्रकृतीकडे दुर्लक्ष नको. लोकांची साथ मिळेल. आर्थिक मदतही मिळेल. घरातील तणाव कमी करू शकाल. नोकरीत वरिष्ठांना विचारून निर्णय घ्या. डोळ्यांची काळजी घ्या. कला-क्रीडा क्षेत्रात उत्साह वाढेल. तुमच्याशी स्पर्धा करणारे वाढतील. संशोधनाच्या कामात फसवणूक करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. तुम्ही बुद्धिने काम करा. मित्र मदत करतील. शुभ दि. २५, २९

वृषभ :- या सप्ताहात चंद्र, शुक्र लाभयोग, बुध, नेपच्यून युती होत आहे. धंद्यात वाढ होईल. नवे काम मिळेल. प्रयत्नांचा जोर वाढवा. कायदा कुठेही मोडू नका. प्रमाणिकपणाने काम करा. पोटाचा त्रास होण्याची शक्यता आहे. तब्येतीची काळजी घ्या. राजकीय-सामाजिक कार्यात जास्त मेहनत घ्यावी लागेल. वरिष्ठांचा पाठिंबा असला तरी बरोबरचे लोक अडचणी आणण्याचा प्रयत्न करू शकतात. रागाचा पारा वाढवण्याचा कट करतील. संयम बाळगा. प्रवासात सावध राहा. घरगुती तणाव कमी होईल. घरातील वृद्ध व्यक्तीची चिंता वाटेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. संशोधनाच्या कामात दिशाभूल होऊ देऊ नका. विद्यार्थ्यांनी परीक्षा चांगल्याप्रकारे द्यावी. शुभ दि. २६, १

- Advertisement -

मिथुन :- या सप्ताहात चंद्र, गुरू त्रिकोणयोग, चंद्र, बुध युती होत आहे. नोकरीत मनाप्रमाणे अडलेले काम करून घेता येईल. धंद्यात फायदा वाढेल. मोठे कंत्राट मिळू शकेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्या योजना मार्गी लावा. तत्परता दाखवा तरच पुढे निभाव लागेल. प्रगतीची संधी मिळेल. लोकांचे मन वळवता येईल. घरातील वातावरण आनंदी राहील. कला-क्रीडा क्षेत्रात चमक दिसेल. पैसा, प्रसिद्धी मिळेल. शेअर्समध्ये लाभ होईल. कोर्ट केस संपवण्याची संधी मिळू शकेल. संशोधनाच्या कामात यश मिळेल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांनी आळस सोडून स्वतःचे ध्येय गाठावे. घर, जमीन खरेदी विक्रीत फायदा होईल. शुभ दि. २७, २

कर्क :- या सप्ताहात चंद्र, मंगळ लाभयोग होत आहे. मीन राशीतील सूर्य तुमच्या पाठीशी आहे. धंद्यात मिळेल ते काम नीट पूर्ण करा. जास्त अपेक्षा ठेवू नका. नम्र राहा. वाद होतील. कामगार बंड करतील. त्यांना सांभाळून घ्या. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा टिकवण्यासाठी दूरदृष्टीकोन ठेवा. जवळचे लोक कट करतील. प्रवासात खाण्यापिण्याची काळजी घ्या. भावना-व्यवहार यांचा गुंता होईल. तुमच्या कामाचे वरिष्ठांकडून कौतुक होईल. प्रमोशन होईल. कला-क्रीडा क्षेत्रात फसगत संभवते. गोड बोलून जवळीक करणार्‍या व्यक्तीपासून सावध राहा. कोर्ट केस चिंता वाढवू शकते. संशोधनाच्या कामात शांतपणे विचार करा. तुमची कामाची पद्धत पडताळून पाहा. शुभ दि. २८, ३

- Advertisement -

सिंह :- या सप्ताहात चंद्र, गुरू लाभयोग, चंद्र, शुक्र युती होत आहे. घरातील ताणतणाव कमी करू शकाल. वृद्ध व्यक्तीला दुखवू नका. नोकरीत वरिष्ठांच्या शब्दाला मान द्या. प्रामाणिकपणाने काम करा. नवीन नोकरी मिळू शकेल. राजकीय-सामाजिक कार्यात एखादी नजर चूक होईल. त्यामुळे प्रतिष्ठा कमी होऊ शकते. दुसर्‍यावर आरोप करताना स्वतःच्या कार्याकडे दुर्लक्ष करू नका. लोकांचा विश्वास मिळवता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात नवीन ओळखी होतील. कोर्ट केस सावधपणे हाताळावी लागेल. संशोधनाच्या कामात अडथळे येतील. प्रकृतीकडे लक्ष द्या. जीवनसाथी, मुले यांचे विचार ऐकून घ्या. विद्यार्थ्यांना यश खेचून आणता येईल. अरेरावी करू नका. शुभ दि. २५, २८

कन्या :- या सप्ताहात चंद्र, मंगळ लाभयोग होत आहे. मीनेतील सूर्य तुमची प्रतिष्ठा जाऊ देणार नाही. तुम्ही धंद्यात वाद वाढवू नका. कायदा पाळा. रागावर ताबा ठेवा. कामगार विरोधात जाण्याची शक्यता आहे. बुद्धिमता उपयोगी पडेल. सप्ताह कठीण आहे. त्यामुळे घरातील जबाबदारी वाढेल. प्रकृतीची काळजी घ्या. वडील माणसांचा शब्द मोडू नका. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिमा सांभाळा. प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यापेक्षा तटस्थ राहा. सहकारी दुतोंडेपणा करतील. कला-क्रीडा क्षेत्रात स्पर्धा वाढेल. मैत्रीत मतभेद होईल. कोर्टमध्ये फसवा-फसवी होऊ शकते. चांगली संगत ठेवा. व्यसनाने नुकसान होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात आळस करू नये. प्रेमात तणाव होईल. शुभ दि. २६, २९

तूळ :- या सप्ताहात चंद्र, गुरू लाभयोग, बुध, नेपच्यून युती होत आहे. धंद्यात वाढ करण्याच्या प्रयत्नाला यश मिळेल. सप्ताहाच्या शेवटी रागाचा पारा वाढवणारी घटना राजकीय-सामाजिक कार्यात घडून येईल. तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न होईल. टीकात्मक चर्चा होऊ शकते. लोकांची सहाय्यता तुम्हाला मिळेल. नोकरीत क्षुल्लक तणाव होईल. सहकारी मदत करतील. घरातील वातावरण छान ठेवता येईल. आप्तेष्टांच्या भेटी होतील. वृद्ध व्यक्तींची काळजी वाटेल. कला-क्रीडा क्षेत्रात मेहनतच जास्त करा. नवीन ओळखीने तुमचा उत्साह वाढेल. संशोधनाच्या कामात चौकसबुद्धी वापरा. नम्रपणे बोला. विद्यार्थी वर्गाने वडीलधार्‍या लोकांचा मान ठेवावा. यश मिळेल. शुभ दि. २७, १

वृश्चिक :- या सप्ताहात चंद्र, मंगळ केंद्रयोग, चंद्र, बुध युती होत आहे. धंद्यात प्रयत्न जास्त, यश कमी अशी परिस्थिती राहील. ओळखीतून कामे मिळण्याचे आश्वासन मिळेल. घरातील व्यक्तींची मर्जी राखावी लागेल. नाराजी होऊ शकते. स्वतःच्या खाण्याची काळजी घ्या. राजकीय-सामाजिक कार्यात प्रभाव वाढेल. प्रवासाचा बेत आखाल. वाहन जपून चालवा. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. यश, प्रसिद्धी मिळेल. नोकरीत प्राणाणिक कामातून वरिष्ठांना खूश करता येईल. प्रमोशन मिळेल. संशोधनाच्या कामात सहकारी वर्गाला कमी समजू नका. त्यांची मदत घ्या. विद्यार्थी वर्गाला यश मिळवता येईल. मौज-मजेत जास्त वेळ जातो का, याकडे लक्ष द्या. शुभ दि. २८, २

धनु :- या सप्ताहात चंद्र, शुक्र लाभयोग, बुध, नेपच्यून युती होत आहे. साडेसातीचे दुसरे पर्व सुरू आहे. या सप्ताहात धंद्यात तुमचा जम बसवता येईल. मोठे कंत्राट मिळवण्याचा प्रयत्न करा. भागीदाराबरोबर चांगली चर्चा होईल. थकबाकी मिळवा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्या हातून काही कामे राहून गेली असतील तर ती पूर्ण करा. गैरसमज दूर करा. तुमचे स्थान टिकवण्यासाठी मेहनत घ्या. लोक मदत करतील. पैसाही मिळेल. त्यामुळे कार्य चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. कला-क्रीडा-साहित्यात नावलौकिक, लाभ मिळेल. संशोधनाच्या कामात प्रगती होईल. नोकरीतील समस्या कमी होईल. घरात शुभ समाचार मिळेल. विद्यार्थी वर्गाने मेहनत घ्यावी. मनाप्रमाणे यश मिळेल. शुभ दि. २६, २८

मकर :- या सप्ताहात बुध, नेपच्यून त्रिकोणयोग, गुरू, शुक्र युती होत आहे. या सप्ताहात तुमच्या मनातील कामे पूर्ण करता येतील. लोकांची मदत फारच महत्त्वाची ठरेल. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा राहील. अनुभवी व्यक्तींना न दुखावता त्यांच्याकडून चांगल्या महत्त्वाच्या गोष्टी शिकून घ्या. तुमचे ध्येय पूर्ण करण्याचा पूरेपूर प्रयत्न करा. व्यवसायात चांगली संधी मिळेल. गुरुठायी असलेल्या व्यक्तीला नाराज करू नका. कला-क्रीडा क्षेत्रात कष्ट जास्त घ्यावे लागतील. कौतुक होईल. प्रसिद्धी मिळेल. परदेशात जाण्याचा योग येईल. नोकरीत वरिष्ठांच्या मदतीला उभे राहावे लागेल. विद्यार्थी वर्गाने चांगल्या संगतीत राहून अभ्यासक्रम पूर्ण करावा. शुभ दि. २७, २९

कुंभ :- या सप्ताहात चंद्र, गुरू लाभयोग, बुध, गुरू युती होत आहे. काही कारणास्तव क्षुल्लक तणाव झाला तरी त्यानंतर तुमची सर्व कामे व्यवस्थित पूर्ण करू शकाल. धंद्यात मोठी उडी घेता येईल. कंत्राट मिळेल. मागील येणे वसूल करा. शेअर्समध्ये तज्ज्ञांच्या योग्य सल्ल्याने पैसे ठेवता येतील. संसारात चांगल्या घटना घडतील. समारंभात हजर रहावे लागेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्वाचे कार्य पूर्ण होईल. प्रसिद्धी मिळेल. धडपड केल्याने समाधान मिळेल. लोकांचा विश्वास मिळवता येईल. कला-क्रीडा साहित्यात प्रगतीची संधी मिळेल. परदेशात जाण्याची तयारी करू शकाल. नोकरी लागेल. संशोधनात यश येईल. विद्यार्थी वर्गाला मनाप्रमाणे यश मिळवता येईल. शुभ दि. २८, १

मीन :- या सप्ताहात चंद्र, गुरू त्रिकोणयोग, चंद्र, मंगळ लाभयोग होत आहे. आत्मविश्वास वाढेल. जास्त उतावळेपणा कुठेही करू नका. घाईत कोणतेही काम चांगले होत नाही, तुमच्या मनाप्रमाणे घटना आता घडत जातील. सप्ताहाच्या सुरुवातीला खर्च चुकीच्या ठिकाणी होऊ शकतो. घरात वाद होईल. धंद्यात सावध राहा. मैत्री तुटण्याची शक्यता निर्माण होईल. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा मिळेल. अधिकाराचे पद मिळण्याची आशा वाढेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. स्पर्धा करणारे वाढतील. नोकरीत सहकारी वर्गाला कमी समजू नका. संशोधनाच्या कामात प्रगती होईल, पण धावपळ वाढेल. संततीच्या प्रगतीने तुम्हाला समाधान मिळेल. नोकरीत शुभवार्ता कळेल. शुभ दि. २९, २

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -