घर भविष्य साप्ताहिक राशीभविष्य राशीभविष्य रविवार २ जुलै ते शनिवार ८ जुलै २०२३

राशीभविष्य रविवार २ जुलै ते शनिवार ८ जुलै २०२३

Subscribe

मेष ः- या सप्ताहात कर्क राशीत सूर्य प्रवेश, शुक्र, शनि प्रतियुती होत आहे. तुमच्या धंद्यात समस्या येईल. मशीनमध्ये बिघाड संभवतो. नोकरांना दुखवू नका. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे मुद्दे विचारात घेतले जातीलच असे समजू नका. चर्चा करताना मैत्रीपूर्ण वातावरण ठेवा. नोकरीत कामाचा व्याप व वरिष्ठांचा दबाव राहील. घरातील वृद्ध व्यक्तींची काळजी वाटेल. कला-क्रीडा क्षेत्रात टिकून राहता येईल. शोध कार्यात जिद्द ठेवा. दिशा मिळेल. कोर्टाच्या कामात सल्ल्यानुसारच बोला. जमीन, घर यासंबंधी समस्या येऊ शकते. विद्यार्थी वर्गाने प्रवेशासाठी निश्चित धोरण ठरवावे. चंचलता करू नये. शुभ दि. २, ६

- Advertisement -

वृषभ ः- या सप्ताहात कर्क राशीत सूर्य प्रवेश, चंद्र, बुध प्रतियुती होत आहे. चंद्र ग्रहणापर्यंत क्षुल्लक तणाव संभवतो. धंद्यात मोठे काम मिळेल. वसुली करता येईल. वाटाघाटीत यश येईल. राजकीय-सामाजिक कार्यात योजनांना रेंगाळत ठेवू नका. लोकांची कामे करा. तरच पुढे तुमचा निभाव लागेल. संसारात शुभ समाचार मिळेल. नोकरीत प्रगती होईल. प्रेमाला चालना मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल. ओळखी होतील. शोध कार्यात यश मिळेल. कोर्टकेस सारखे किचकट मुद्दे संपवा. विद्यार्थी वर्गाला नवीन अभ्यास योग्य प्रकारे निवडता येईल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. शुभ दि. ३, ७

मिथुन ः- या सप्ताहात कर्क राशीत सूर्य प्रवेश, शुक्र, नेपच्यून त्रिकोणयोग होत आहे. चंद्र ग्रहणानंतर अडचणीवर जिद्दीने जय मिळवाल. धंदा वाढवता येईल. चर्चा सफल होईल. वाटाघाटीत फायदा होईल. राजकीय-सामाजिक कार्यात गोड बोलून तुम्हाला अडचणीत आणले जाईल. वरिष्ठांची मदत मिळू शकेल. समाजसेवा करत रहा. नोकरीत वर्चस्व राहील. डोळ्यांची काळजी घ्या. पैसे उधळू नका. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. ओळखी वाढतील. शोध कार्यात अडचणींचा सामना करावा लागेल. विद्यार्थी वर्गाने मनाची स्थिरता ठेवल्यास योग्य निर्णय घेता येईल. मोठ्यांचे ऐकावे. शुभ दि. ४, ८

- Advertisement -

कर्क ः- या सप्ताहात तुमच्याच राशीत सूर्य प्रवेश, चंद्र, बुध प्रतियुती होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला संसारात गैरसमज होईल. जवळच्या व्यक्तीची चिंता वाटेल. धंद्यात वाढ करता येईल. भागीदाराबरोबर मतभेद होईल. राजकीय-सामाजिक कार्यात राहून गेलेले काम करता येईल. प्रतिष्ठा वाढेल असे कार्य पूर्ण करा. लोकांच्या विरोधाला कमी समजू नका. गुप्त कारवायांना समजून घ्या. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. शोध कार्याला दिशा मिळेल. यश मिळेल. कोर्टाच्या कामात गुुप्तता ठेवा. विद्यार्थी वर्गाची समस्या कमी होईल. चांगले मित्र सोडू नका. व्यसन करू नका.
शुभ दि. २, ५

सिंह ः- या सप्ताहात कर्क राशीत सूर्य प्रवेश या सप्ताहात होत आहे. शुक्र, नेपच्यून त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात अडचण येईल. वाद वाढेल. खर्च वाढू शकतो. ओळखीचा उपयोग होऊ शकतो. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्या मताला विरोध होईल. वरिष्ठ तुमच्यावर दबाव आणतील. गोड बोलून तुम्हाला धाक दाखवतील. घरातील कामे करून घ्या. नोकरीत कामांचा व्याप वाढेल. कायद्याच्या विरोधात जाऊन कोणताच निर्णय घेऊ नका. कला-क्रीडा क्षेत्रात मेहनत घ्या. अपेक्षा जास्त ठेवू नका. शोध कार्यात समस्या येईल. प्रवासात घाई करू नका. विद्यार्थी वर्गाचा विचारांचा गुंता वाढेल. शुभ दि. ३, ६

कन्या ः- या सप्ताहात कर्क राशीत सूर्य प्रवेश, चंद्र, बुध प्रतियुती होत आहे. धंद्यातील समस्या लवकर सोडवा. जम बसवा. नवे कंत्राट मिळवा. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. राजकीय-सामाजिक कार्यात जनतेच्या सुखासाठी काम करा. पुढील काळासाठी स्थान टिकवा. तरच टिकाव धरता येईल. संसारात चांगली घटना घडेल. जमीन, घर खरेदी करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. कोर्टकेस संपवता येईल. प्रयत्न करा. शोध कार्यात प्रगती होईल. नोकरी मिळेल. परदेशात जाण्याचा योग येईल. विद्यार्थी वर्गाने निश्चित विचार करून पुढील ध्येय ठरवावे. शुभ दि.४, ७

तूळ ः- या सप्ताहात कर्क राशीत सूर्य प्रवेश, शुक्र, नेपच्यून त्रिकोणयोग होत आहे. प्रत्येक दिवशी तुम्ही तुमची कामे करून घ्या. धंद्यात जम बसेल. थकबाकी वसूल करा. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला योजनांना गती देऊन प्रगती करता येईल. लोकांचा संग्रह वाढवता येईल. घरगुती कामे होतील. शेअर्सचा अंदाज घेता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकदार यश मिळेल. नोकरीचा प्रश्न सुटेल. कोर्टकेसमध्ये सप्ताहाच्या शेवटी किरकोळ समस्या येऊ शकते. शोध कार्यात यश मिळेल. विद्यार्थी वर्गाला योग्य दिशा मिळेल. मन चंचल करू नका. शुभ दि. ५, ८

वृश्चिक ः- या सप्ताहात कर्क राशीत सूर्य प्रवेश, चंद्र, बुध प्रतियुती होत आहे. साडेसातीचे शेवटचे पर्व सुरू आहे. तुमच्या प्रत्येक कामाला गती देता येईल. धंद्यात यश मिळेल. नवीन काम मिळेल. भागीदाराबरोबर तडजोडीचे धोरण ठेवा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे वर्चस्व राहील. लोकांची नाराजी राहील. तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करा. घरातील कामे वाढतील. गैरसमज होऊ शकतो. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. नवीन ओळखीवर भाळून जाऊ नका. शोध कार्याला वेग येईल. वरिष्ठ कौतुक करतील. विद्यार्थी वर्गाला उत्तम प्रगती करता येईल. चांगली संगत सोडू नका.
शुभ दि. २, ४

धनु ः- या सप्ताहात कर्क राशीत सूर्य प्रवेश, शुक्र, नेपच्यून त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात तणाव होऊ शकतो. क्षुल्लक कारणाने कामगारांची नाराजी होईल. दुर्लक्ष करू नका. राजकीय-सामाजिक कार्यात स्पष्ट बोलणे इतरांना खपणार नाही. गैरसमज होईल. संसारात वृद्ध व्यक्तीची काळजी घ्यावी लागेल. प्रवासात घाई करू नका. वाहन सावधपणे चालवा. नोकरीच्या ठिकाणी काम वाढेल. वरिष्ठांना मदत करावी लागेल. कला-क्रीडा स्पर्धेत जास्त कष्ट घ्यावे लागतील. कोर्टकेस अडचणीची वाटेल. शोध कार्यात धावपळ होईल, पण यश खेचता येईल. विद्यार्थी वर्गाने विचलित न होता वागावे. शुभ दि. ३, ५

मकर ः- या सप्ताहात कर्क राशीत प्रवेश करणारा सूर्य तुमच्या कार्याला दिशा देईल. धंद्यात वाढ होईल. गुंतवणूक करणारे समोरून येतील. गोड बोलून एखादी व्यक्ती तुमची दिशाभूल करेल. तेवढे सावध रहा. राजकीय-सामाजिक कार्यात प्रभाव पडेल. लोकांच्या उपयोगी पडल्याने त्यांना जाणीव राहील. संसारात काम वाढेल. क्षुल्लक तणाव होईल. स्वतःच्या खाण्याची काळजी घ्या. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. शोध कार्यात यशस्वी व्हाल. कोर्टकेसमध्ये आशादायक वातावरण राहील. विद्यार्थी वर्गाने चांगली संगत ठेवावी. वाहन जपून चालवा. शुभ दि. ४, ६

कुंभ ः- या सप्ताहात कर्क राशीत सूर्य प्रवेश, शुक्र, नेपच्यून त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात मोठे काम मिळाले तरी समस्या होईल. वाद होईल. मित्र मदत करेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमची जिद्द महत्त्वाची ठरेल, परंतु लोक त्याला हट्टीपणा म्हणतील. टीका होईल. नोकरीमध्ये कोणताही निर्णय घेताना घाई करू नका. कामात दुर्लक्ष होऊ शकते. कला-क्रीडा क्षेत्रात मेहनतीचा उपयोग होईल. कौतुक होईल. शोध कार्यात विघ्न येऊ शकते. वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल. विद्यार्थी वर्गाने योग्य सल्ल्याने प्रवेश घ्यावा. अभ्यासात आळस करू नये. वडील माणसांना दुखवू नये. शुभ दि. ५, ७

मीन ः- या सप्ताहात कर्क राशीत सूर्य प्रवेश, चंद्र, बुध प्रतियुती होत आहे. महत्त्वाची धंद्यातील समस्या दूर करता येईल. थकबाकी वसूल होईल. मोठे कंत्राट मिळवा. राजकीय-सामाजिक कार्यात योजनांना गती देता येईल. नोकरीत चांगली प्रगती होईल. परदेशात जाण्याचा योग येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. मोठ्या लोकांचा परिचय होईल. नवे शिकण्यास मिळेल. कोर्टकेस जिंकाल. संसारातील समस्या सुटेल. अविवाहितांना स्थळे येतील. घर, जमीन खरेदी-विक्रीत फायदा होईल. शोध कार्यात यश मिळेल. शिक्षणात मनाप्रमाणे यशस्वी व्हाल. शुभ दि. ६, ८

- Advertisment -