घरICC WC 2023शोएब अख्तरचे ट्वीट व्हायरल; म्हणाला- वर्ल्ड कप अजून सुरू आहे का?

शोएब अख्तरचे ट्वीट व्हायरल; म्हणाला- वर्ल्ड कप अजून सुरू आहे का?

Subscribe

2023 च्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानची आतापर्यंतची कामगिरी अत्यंत खराब राहिलेली आहे.

नवी दिल्ली : न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका विश्वचषक 2023 च्या 32 व्या सामन्यानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये अख्तरने ‘वर्ल्ड कप अजून सुरू आहे का? असा प्रश्न विचारला. त्याच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी त्याला उत्तरंही दिली आहेत. (Shoaib Akhtars tweet goes viral Said Is the World Cup still going on?)

2023 च्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानची आतापर्यंतची कामगिरी अत्यंत खराब राहिलेली आहे. या स्पर्धेत चार पराभव पत्करावा लागलेला बाबर आझमचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर होता, त्यानंतर पाकिस्तानी चाहत्यांसाठी हा विश्वचषक संपला. मात्र, गेल्या काही सामन्यांचे निकाल पाहिल्यानंतर पाकिस्तानच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा पुन्हा वाढल्या आहेत.

- Advertisement -

पहिले दोन सामने नेदरलँड्स आणि नंतर श्रीलंकेला पराभूत करून पाकिस्तानने 2023 च्या विश्वचषकाची शानदार सुरुवात केली होती. पण कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या भारताशी सामना करताना त्यांची ट्रेन रुळावरून घसरली. भारताकडून सामना हरल्यानंतर पाकिस्तानला ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेकडूनही पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर त्यांच्या उपांत्य फेरीतील प्रवेशावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या सगळ्या पार्श्वभूमीवर शोएब अख्तरने हे ट्वीट केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : PHOTO: तुम घाटी लोग क्या स्टेडीयम बनाओगे? अन् वानखेडे स्टेडियम उभं राहलं

न्यूझीलंडच्या पराभवावर पाकिस्तानचे भवितव्य

विश्वचषकात उर्वरित तीन सामने जिंकण्याबरोबरच पाकिस्तानला इतर संघांच्या निकालावरही अवलंबून राहावे लागणार आहे. पाकिस्तानने बांगलादेशला 7 व्या सामन्यात पराभूत केले, तर भारताने इंग्लंडचा पराभव केला, अफगाणिस्तानने श्रीलंकेचा आणि दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडचा पराभव केला. पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठायची असेल, तर त्यांना पुढील दोन सामन्यांमध्ये न्यूझीलंडच्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागेल.

हेही वाचा : सगळ्या विरोधकांना तुरुंगात डांबा अन् मगच निवडणुका घ्या; ठाकरे गटाचा उपरोधिक सल्ला

 

भारतीय गोलंदाजाबद्दल काय म्हणाला अख्तर?

अख्तरने भारतीय गोलंदाजांचे खूप कौतुक केले. तो म्हणाला, शम्मी आणि बुमराहने दाखवून दिले आहे की ते जगातील सर्वात शक्तिशाली गोलंदाज आहेत. फलंदाजी चांगली होती, पण गोलंदाजांनीही आपले कौशल्य दाखवले. कुलदीप यादववर अख्तर म्हणाला, मला माहित नाही प्रकरण काय आहे. खेळपट्टी ओली असो वा कोरडी, म्हणजे ज्या जोडीने भारत खेळत आहे ते विश्वचषक जिंकू शकतात असा विश्वाससुद्धा त्यांने व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -