घरICC WC 2023तुम्हाला तुमच्या वसीम अक्रमवर विश्वास नाही; पाकिस्तानच्या माजी खेळाडूची शमीने घेतली शाळा

तुम्हाला तुमच्या वसीम अक्रमवर विश्वास नाही; पाकिस्तानच्या माजी खेळाडूची शमीने घेतली शाळा

Subscribe

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू हसन रझा याने भारतीय गोलंदाजांना वेगळे चेंडू दिले जात असल्याने भारतीय गोलंदाजांची कामगिरी इतर देशांच्या गोलंदाजांपेक्षा चांगली होत असल्याचे बेताल वक्तव्य केले होते.

नवी दिल्ली : सध्या सुरू असलेल्या विश्वचषकात टीम इंडिया जोरदार प्रदर्शन करून अव्वल स्थानावर आहे. तर दुसरीकडे आपलाच प्रतिस्पर्धी असलेला पाकिस्तान संघ विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. असे असतानाच पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने शमी आणि इतर भारतीय गोलंदाजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. त्या वक्तव्याला मोहम्मद शमी यांने फक्त त्याला प्रत्युत्तरच दिले नाही तर चक्क त्याची शाळाच घेतली. (You dont trust your Wasim Akram Shami took the school of the former player of Pakistan)

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू हसन रझा याने भारतीय गोलंदाजांना वेगळे चेंडू दिले जात असल्याने भारतीय गोलंदाजांची कामगिरी इतर देशांच्या गोलंदाजांपेक्षा चांगली होत असल्याचे बेताल वक्तव्य केले होते. एकीकडे भारतीय गोलंदाज आपल्या अप्रतिम स्विंग गोलंदाजीने फलंदाजांना चकित करत आहेत, तर दुसरीकडे याच परिस्थितीत इतर देशांचे गोलंदाजही दमछाक करताना दिसत आहेत. हसन रझा म्हणाला होता की, भारतीय गोलंदाजांना खास चेंडू दिले जात आहेत त्यामुळे त्यांची कामगिरी अप्रतिम आहे. माजी पाकिस्तानी खेळाडूच्या या विधानावर बरीच टीका होत आहे, माजी दिग्गज पाकिस्तानी गोलंदाज वसीम अक्रमनेही हसन रझा यांचे विधान चुकीचे असल्याचे म्हटले होते आणि असे वक्तव्य ऐकल्यानंतर मला लाज वाटते. आता खुद्द भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीने हसन रझाच्या अशा वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : प्रदूषण रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू; मुख्यमंत्र्यांनी घेतील आढावा बैठक

- Advertisement -

या शब्दांत शमीने दिले रझाला उत्तर

सोशल मीडिया इन्स्टावर पोस्ट शेअर करून शमीने पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूची शाळा घेतली. पोस्टमध्ये शमीने लिहिले, लाज वाटली यार, खेळावर लक्ष केंद्रीत कर मूर्खपणावर नाही… कधीतरी इतरांच्या यशाचा आनंद घ्या. शिट यार, हा आयसीसी विश्वचषक आहे, तुझी स्थानिक स्पर्धा नाही. तू खेळाडू होतास तू? वसीम भाई (वसीम अक्रम) यांनीही तुला समजावले आहे. एकूणच असे वाटते की तुझा खेळाडू वसीम अक्रमवर विश्वास नाही. असे मोहम्मद शमीने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा : उठा उठा देवेंद्रजी पोलिसांची गाडी थांबली…; व्हिडीओ पोस्ट करत अंधारेंचा फडणवीसांवर थेट हल्ला

विश्वचषकात मोहम्मद शमीची कामगिरी

शमीची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. या विश्वचषकात मोहम्मद शमीने अप्रतिम गोलंदाजी केली आहे आणि 4 सामन्यात 16 विकेट्स घेण्यात यश मिळवले आहे. शमी विश्वचषकाच्या इतिहासात भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. शमीने आतापर्यंत विश्वचषकात भारताकडून एकूण 47 विकेट्स घेतल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -