Tuesday, April 20, 2021
27 C
Mumbai
घर लाईफस्टाईल दररोज 'गूळ' खा.. आरोग्य सुधारा!

दररोज ‘गूळ’ खा.. आरोग्य सुधारा!

Related Story

- Advertisement -

फिटनेसची काळजी घेणारे लोक साखरेपेक्षा गुळाला अधिक प्राधान्य देतात. याचं मुख्य कारण आहे गुळामध्ये असलेले आरोग्यदायी घटक. गुळामध्ये सुक्रोज, ग्लुकोज खनिजे तसंच कॅल्शियम, फॉस्फोरस आणि लोह आदी घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे गूळ कोणत्याही ऋतूमध्ये खाल्ला तरी शरीरासाठी लाभदायक ठरतो. आजवर अनेक संशोधनांमधून हे समोर आले आहे. जाणून घेऊया, गुळ खाण्याचे ५ मुख्य फायदे.

पोटाचे व पचनाचे विकार करतो दूर

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, गुळाचे नियमीत सेवन केल्यामुळे पोटाचे आणि पचनाचे विकार दूर होतात. तुम्हाला गॅस किंवा अॅसिडीटीचा त्रास होत असल्यास दररोज जेवणानंतर गूळ खा. गूळ खाल्ल्याने पोटामध्ये गॅस तयार होत नाहीत आणि तुमची पचनक्रियाही सुधारते.

- Advertisement -

मासिक पाळीच्या काळात ठरतो फायदेशीर

महिलांच्या मासिक पाळीच्या काळातही गूळ फायदेशीर ठरतो. मासिक पाळीमध्ये होणाऱ्या पोटाच्या असहाय्य वेदना गूळ त्वरित दूर करतो. त्याकाळात गूळ खाल्ल्यास पोटदुखी लगेच थांबते.

- Advertisement -

सांधेदुखी कमी करण्यासाठी करतो मदत

तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होत असल्याल गूळ आणि दुधाचे एकत्रित सेवन करा. दुधामधील कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी तर गुळामधील लोह यामुळे सांधे मजबूत होण्यास मदत होते. आलं आणि गुळ एकत्रित खाल्ल्यानेही सांधेदुखी कमी होते.

bones

शरीरातील रक्ताचं करतो शुद्धीकरण

गूळ आपल्या शरीरातील रक्त शुद्ध करण्याचे काम करतो. शिवाय गूळामुळे रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढते. त्यामुळे आपली रोग प्रतिकारक शक्ती आणि ताकदही वाढते.

वजन घटवण्यासाठी ठरतो उपयुक्त

तुम्ही फिटनेसची काळजी घेत असाल, तर कुठल्याही रासायनिक प्रक्रियेविना तयार होणारा म्हणजेच केमिकल विरहीत गूळ खा. साखरेच्या तुलनेत हा गूळ कित्येक पटीने शरीरासाठी लाभदायक असतो.

- Advertisement -