घरमुंबईMumbai Airport : मुंबई विमानतळावर 9 मे रोजी सेवा सहा तासांसाठी पूर्णपणे...

Mumbai Airport : मुंबई विमानतळावर 9 मे रोजी सेवा सहा तासांसाठी पूर्णपणे बंद; कारण काय?

Subscribe

मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने येत्या 9 मे रोजी मुंबई विमानतळावर देखभालीची कामे करण्यात येणार आहेत. यासाठी मुंबई विमानतळ सकाळी 11 ते सायंकाळी 5 अशा वेळेत बंद राहणार आहे. या

मुंबई : मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने येत्या 9 मे रोजी मुंबई विमानतळावर देखभालीची कामे करण्यात येणार आहेत. यासाठी मुंबई विमानतळ सकाळी 11 ते सायंकाळी 5 अशा वेळेत बंद राहणार आहे. या कालावधीमध्ये मुंबई विमानतळावरील विमान सेवा पूर्णपणे बंद असणार आहे. (Services at Mumbai Airport completely shut down for six hours on May 9)

मान्सूनमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो, याचा परिणाम धावपट्टीवर होऊ नये यासाठी दरवर्षी पावसाळ्यापूर्वी देखभाल दुरुस्तीचे कामे हाती घेण्यात येतात. मुंबई विमानतळावरील विमान प्रवास व सर्व सुविधा सुरळीत आणि व्यवस्थित राहाव्यात यासाठी ही हाती घेण्यात येत असून यासंदर्भात सर्व विमान कंपन्यांना सहा महिन्याआधीच माहिती देण्यात येते. यावर्षी देखील 9 मे रोजी देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे 9 मे रोजी सकाळी 11 ते 5 या कालावधीत विमानसेवा तात्पुरती पण पूर्णपणे बंद राहणार आहे.

- Advertisement -

विमानतळ ऑपरेटर एमआयएएल (MUMBAI INTERNATIONAL AIRPORT LIMITED) ने विमानतळ बंद राहण्यासंदर्भात सोमवारी निवेदन काढले आहे. यात त्यांनी विमान कंपन्यांनी त्यांच्या विमान उड्डाणांचे नियोजन करावे असे आवाहन केले आहे. तसेच मुंबई विमानतळावर धावपट्टी, टॅक्सीवे आणि ऍप्रनचे जाळे सुमारे 1 हजार 33 एकरावर बांधण्यात आले आहे. आहे. त्यामुळे पावसाळ्यांच्या महिन्यांत ऑपरेशनल सातत्य सुनिश्चित करण्यासाठी, धावपट्टी आणि संबंधित सुविधांवर वेळेवर तपासणी आणि दुरुस्तीची कामे करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे देखभाल दुरुस्तीचे कामे झाल्यानंतर सायंकाळी पाच नंतर विमानतळावरील सेवा पुन्हा सुरळीत होईल, असे विमान प्रशासनाने म्हटले आहे.

मुंबई विमानतळ जगातील व्यस्त विमानतळ

मुंबई विमानतळ हे जगातील सर्वात व्यस्त विमानतळापैकी एक आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने येथे मोठ्या प्रमाणात व्यावसायिक आणि पर्यटक येत असतात. हे विमानतळ भव्य आणि प्रशस्त आहे. तसेच विमानतळावरील दोन धावपट्ट्यांंपैकी मुख्य धावपट्टीवरून तासाला सुमारे 46 विमानांचे आगमन व उड्डाण होते; तर दुय्यम धावपट्टीवरून तासाला सुमारे 35 विमानांचे उड्डाण व आगमन होते. सध्या दररोज सुमारे 950 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण होत असते.

- Advertisement -

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -