Wednesday, May 5, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE कोरोनाविरोधी प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या ऊसाच्या रसाचे आठ फायदे

कोरोनाविरोधी प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या ऊसाच्या रसाचे आठ फायदे

Related Story

- Advertisement -

सध्या कोरोना विषाणूने हाहाकार माजवल्याने देशात सध्या आरोग्यविषयक आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा वापर होताना दिसतो. अनेक नागरिक आपल्या खाण्यात विविध पोषक फळे, भाजा, धान्य, कडधान्यांचा समावेश करत आहेत. मात्र कोरोनाविरोधात लढण्यासाठी तुम्हा उस हे फळ देखील अत्यंत उपयुक्त ठरत आहे. सध्या उन्हाळाच्या दिवसात आणि कोरोना काळात ऊसाचा रस पिणे आपल्या आरोग्यास अत्यंत फायदेशीर ठरत आहेत. कारण ऊसाचा रसामध्ये ए, बी १, बी २, बी ३, बी ५, बी ६ आणि व्हिटामिन सी असे पोषक घटक असतात. याशिवाय या रसात मॅग्नेशियम, लोह आणि कॅल्शियमही हे घटकही मोठ्याप्रमाणात आढळतात. त्यामुळे शरारीस उपयुक्त असे सर्व घटक ऊसामध्ये मिळतात. उसाचा रस पोटासाठी देखील अतिशय प्रभावी मानला जातो.

विशेष म्हणजे ऊसाचा रसाचा सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास अधिक मदत होते. त्यामुळे कोरोनापासून दूर राहण्यासाठी दररोज किमान एक ग्लास ऊसाचा रसाचे सेवन करा. ऊसाचा रस रोगप्रतिकारक शक्ती वाढण्याबरोबरच इतर आजारांवरही रामबाण उपाय मानला जातो. चला तर मग जाणून घेऊ उसाच्या रसाचे आणखी ८ फायदे.

- Advertisement -

१) ऊसाच्या रसाचा नियमित सेवनाने चेहऱ्यावरील मुरुम, काळे डाग कमी होतात. तसेच शरारीत रक्त शुद्ध होते. उसामध्ये सुक्रोजचे प्रमाण असल्याने शरीरावरील जखम लवकर बरी होण्यास मदत होते.

२) उन्हाळात तीव्र सुर्यप्रकाशामुळे सतत घाम येत असल्याने चेहऱ्यावरील उत्साह,, तेजी कमी होते. यावेळी ऊसाचा रसाचे सेवन केल्यास चेहऱ्यावरील मरगळ दूर होत तेज पुन्हा येते.

- Advertisement -

३) लघवी करताना बर्‍याच लोकांना वेदना, जळजळ किंवा अस्वस्थता जाणवते. अशा लोकांनी उसाचा रस प्यावा. उसाचा रस मूत्र समस्येवर मात करण्यासाठी मदत करू शकतो.

४) ऊसाच्या रसामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि लोह आणि पोटॅशियम असल्याने आपल्या शरीरातील हाडे मजबूत करण्यास मदत करते.

५). ऊसामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्याने आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होऊन वजन कमी करण्यास मदत होते.

६) ऊसाचा रसात अल्कधर्मीचे प्रमाण जास्त असल्याने रोज रसाचे सेवन केल्यास स्तन, पोट आणि फुफ्फुसांचा कर्करोगासारख्या आजारापासून दूर राहता येते.

७) ऊसाचा रसाचे सेवनामुळे आपल्या शरीरात ग्लूकोजचे प्रमाण संतुलन राहते ज्यामुळे मधुमेह आजाराचा धोका कमी होतो. त्यामुळे नैसर्गिकरित्या गोड असणारा ऊसाचा रस मधुमेहाचे रुग्ण देखील पिऊ शकतात.

८) गरोदरपणात थकवा आणि इतर आजार टाळण्यासाठी ऊसाचा रस खूप फायदेशीर ठरतो. रोग प्रतिकारशक्ती वाढण्याबरोबरच गरोदर महिलांना बद्धकोष्ठतेचा समस्येपासून दूर ठेवण्यास उसाचा रस अत्यंत गुणकारी आहे.


Corona Vaccine : अनेक राज्यात लसच उपलब्ध नाही, १ मे पासूनच्या तिसऱ्या टप्प्याच्या लसीकरण मोहिमेवर प्रश्नचिन्ह


 

- Advertisement -