घरलाईफस्टाईलतजेलदार चेहऱ्यासाठी असा करा जिऱ्याचा वापर

तजेलदार चेहऱ्यासाठी असा करा जिऱ्याचा वापर

Subscribe

आपल्याकडे जिऱ्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपले पदार्थ जिऱ्याशिवाय पूर्ण होतंच नाहीत. फक्त मसाल्याचा स्वाद वाढवण्यासाठीच नाही तर जिरं हे चेहऱ्यासाठी देखील अतिशय उपयुक्त आहे. चला तर मग जाणून घेऊया याचा वापर कसा करायचा?

सुरकुत्या, काळी वर्तुळे कमी होतात

- Advertisement -

जिऱ्यात बरेच antioxidant असल्याने सुरकुत्या, काळी वर्तुळे आणि त्वचा तजेलदार राहण्यास मदत होते. जीरं रात्रभर पाण्यात भिजवून ठेवल्यास आणि सकाळी उठल्यावर या पाण्याने चेहरा धुतल्यास फायदा होऊ शकतो.

त्वचेमधील रक्तप्रवाह सुरळीत होतो

- Advertisement -

जिऱ्याच्या पाण्याने वाफही घेऊ शकता. यामुळे चेहऱ्यावरील बॅक्टेरिया, इतर अशुद्ध घटकही बाहेर निघण्यास मदत होऊ शकते. यामुळे ब्लॅकहेड्स काढणंही सोपं होऊ शकतं. वाफ घेतल्याने त्वचेमधील रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते.

तजेलदार चेहऱ्यासाठी

जिऱ्यापासून बनलेला फेसपॅकही फायदेशीर ठरु शकतो. फेसपॅक बनवताना थोडी हळद आणि जीरं हे मिश्रण करुन त्यात मधाचे काही थेंब टाकावेत. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावावा, काही वेळाने सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवावा. यामुळे चेहरा तजेलदार होण्यास मदत होऊ शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -