घरलाईफस्टाईलनैसर्गिक उपाय असले तरीही हे ‘ 6’ पदार्थ चेहर्‍यावर लावू नका

नैसर्गिक उपाय असले तरीही हे ‘ 6’ पदार्थ चेहर्‍यावर लावू नका

Subscribe

आजारपणाप्रमाणेच चेहर्‍यावरील डाग, अ‍ॅक्नेचा त्रास कमी करण्यासाठीही घरगुती उपाय केले जातात. पण असे केल्याने काही वेळेस चेहर्‍यावर त्याचे दुष्परिणाम दिसून येतात.

अल्कोहोल
त्वचा खूपच तेलकट असेल तर अल्कोहोल वापरून त्वचा शुष्क केली जाते.पण चेहर्‍यावर अल्कोहोल चोळल्याने त्वचेतील अत्यावश्यक लिपिड्स, प्रोटीन्स आणि फॅट्स निघून जातात. परिणामी त्वचेतील दाह वाढण्याचा धोका असतो.

- Advertisement -

मेयॉनीज –
त्वचेतील मॉईश्चरायझर टिकून राहण्यासाठी तुम्ही बाजारात उपलब्ध असलेल्या मॉईश्चरायझरचाच वापर करा. कारण मेयॉनीझचा वापर केल्यास त्वचेतील छिद्र क्लॉग होऊ शकतात. परिणामी अ‍ॅक्नेचा त्रास वाढू शकतो.

कच्ची अंडी –
अंड्याचा मास्क बनवून चेहर्‍यावर लावल्यास पोअर्स टाईट होण्यास मदत होते. तसेच अनावश्यक केस काढले जातात. असा सल्ला अनेक ठिकाणी वाचायला, बघायला मिळतो. पण अंड्यातील बॅक्टेरियांचे प्रमाण फुड पॉयझनिंग करण्यास कारणीभूत ठरते. परिणामी त्यामुळे त्रासदेखील होऊ शकतो.

- Advertisement -

लिंबाचा रस
लिंबाचा रस टॅनिंग कमी करण्यासाठी, डाग कमी करण्यासाठी वापरा असा सल्ला दिला जातो. परंतु त्यामधील अ‍ॅसिडीक घटक त्वचेचे नुकसान करू शकतात. अनेकदा फेस पॅकमध्येही लिंबाचा रस असल्यास त्वचेमध्ये जळजळ जाणवते.

बेकिंग सोडा –
प्रामुख्याने अ‍ॅक्नेचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी बेकिंग सोडा फायदेशीर ठरतो. परंतु त्यामधील घटक त्वचेतील पातळीचे नुकसान करतात. परिणामी त्वचेमध्ये जळजळ, खाज येणे अशा समस्या वाढतात.

दालचिनी –
मसाल्याचा वापर करून अनेक आजारांवर नियंत्रण मिळवता येतं असा सल्ला दिला जातो. पण दालचिनीमुळे त्वचेतील जळजळ वाढते. त्वचेतील पातळीचं नुकसान होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -