घरलाईफस्टाईलवर्किंग वूमन्ससाठी डायट चार्ट

वर्किंग वूमन्ससाठी डायट चार्ट

Subscribe

स्त्रियांनी आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यायला हवी. कारण की त्यांना ऑफिस आणि घरात दोन्हीकडे लक्ष द्यावं लागतं. स्त्रिया सर्वांकडे लक्ष ठेवण्याच्या नादात स्वत:ची काळजी घेत नाही. म्हणून वर्किंग वूमन्सला आपल्या आहारात पोषक वस्तूंचा समावेश केला पाहिजे.

ब्रेकफास्ट
वर्किंग वूमन्सने नाश्ता करायला हवा. घरातून निघण्याआधी आपण दूध, सांजा, कॉर्नफ्लेक्स किंवा सँडविच घ्या. सकाळच्या नाश्त्यात व्हिटॅमिन ‘ए’ युक्त फळं जसे शेवफळ, पपई आणि स्ट्रॉबेरी खाणे फायदेशीर ठरेल. नाश्त्यासाठी वेळ नसल्यास एक ग्लास दुधाबरोबर कोणतंही फळ घ्यावं. याबरोबरच थोडेसे ड्रायफूट्स आपल्याजवळ ठेवावे.

- Advertisement -

लंच
वर्किंग वूमन्सच्या ब्रेकफास्ट आणि लंच यामध्ये चार ते पाच तासांचे अंतर हवे. लंचमध्ये भाजी, डाळ, दही, भात आणि पोळीचा समावेश करा. हिरव्या भाज्या जसे ब्रोकोली, पालक, मेथी व इतर आहारात सामील करा. याव्यतिरिक्त पनीर भुजिया किंवा एग भुजिया पण घेऊ शकता. लंचमध्ये सॅलेड किंवा कोशिंबीर घ्या.

स्नॅक्स-
ऑफिसमध्ये काम करणारी काही लोकं संध्याकाळी भूक लागल्यावर अनहेल्थी फूड खातात जे आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. संध्याकाळी भूक लागल्यावर फळं किंवा कडधान्य खाणे फायद्याचे ठरेल. याने भूकही भागेल आणि आरोग्यासाठी उत्तमही ठरेल.

- Advertisement -

डिनर-
रात्रीचं जेवण झोपण्याच्या दोन ते तीन तासांपूर्वी घ्यायला हवं. याने अन्न पचायला वेळ मिळतो. रात्री जेवल्याशिवाय झोपू नाही. डिनरमध्ये तेलकट पदार्थ खाऊ नये. डिनरमध्ये पोळी आणि कमी मसालेदार भाजी किंवा डाळ खायला हवी. डिनरमध्ये घेतला जाणारा आहार लंच पेक्षा सौम्य असायला हवा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -