तुम्हीही मिठाचे सेवन जास्त करता का? तर त्यानंतर खा ‘हे’ ३ पदार्थ

मिठाचे सेवन करण्याचे जसे आपल्याला फायदे आहेत तसेच त्याचे अतिसेवन करण्याचे काही तोटे देखील आहेत. मिठात असलेल्या खनिज आणि सोडियमुळे आपले आरोग्य संतुलन उत्तर राहण्यासाठी मदत करतात.

do you eat too much salt? Then eat these 3 foods
तुम्हीही मिठाचे सेवन जास्त करता का? तर त्यानंतर खा 'हे' ३ पदार्थ

आपल्याकडे अनेकांच्या जेवणात मीठाचे प्रमाण जास्त असते. जास्त मीठाचे सेवन केल्याने हाय ब्लडप्रेशर, स्ट्रोक किंवा हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका असतो. मीठाच्या अती सेवनामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे जेवणात मीठ थोडे बेतानेच वापरणे कधीही उत्तम. मीठालाच सोडिअम क्लोराइड असे म्हणतात. मिठाचे सेवन करण्याचे जसे आपल्याला फायदे आहेत तसेच त्याचे अतिसेवन करण्याचे काही तोटे देखील आहेत. मिठात असलेल्या खनिज आणि सोडियमुळे आपले आरोग्य संतुलन उत्तर राहण्यासाठी मदत करतात. तुमच्या आहारात तुम्ही मिठाचे सेवन सर्वाधित करत असाल तर त्याच्या तुमच्या शरीर स्वास्थावर परिणाम होऊ शकतो.  मिठाचे सेवन जास्त केले आहे तर त्यानंतर पुढील पदार्थ नक्की खा याने तुमच्या शरीरातील मीठाचे प्रमाण कमी होऊ शकते.

केळं

केळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतात. खारट पदार्थ खाल्ल्याने शरीरातील ब्लड प्रेशर वाढू शकते. मात्र केळ्याचे सेवन केल्यास ब्लड प्रेशर नियंत्रणात राहू शकते. त्याचप्रमाणे स्ट्रोकचा धोकाही कमी होऊ शकतो. त्यामुळे खारट पदार्थ खाल्ल्यानंतर केळ्याचे सेवन नक्की करावे.

दही

अनेक जण दररोज जेवणात दह्याचे सेवन करतात. दही खाल्ल्याने तोंडाला चव येते आणि त्याचप्रमाणे तुमचे आतडे निरोगी ठेवण्यासाठी ही मदत होते.

किवी

किवी हे थोडे आंबट फळ आहे मात्र तरीही ते पचनासाठी उत्तम मानले जाते. किवीमध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशिअर असते जे उच्च सोडियम प्रवाभ कमी करण्यासाठी मदत करते. किवीमध्ये एन्झाईम नावाचे प्रथिन असते ज्यामुळे पोट फुगण्यासारख्या समस्या कमी करते.

हर्बल चहा

हर्बल चहाचे सेवन केल्यास ही शरीरातील मीठाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे शरीरातील पचनक्रिया कमी करण्यास मदत करते.


हेही वाचा – रोगप्रतिकारशक्ती वाढवा, थंडीतही फिट राहा, आहारात करा या पिठांचा समावेश