घरताज्या घडामोडीलॉकडाऊनदरम्यान अशा प्रकारे लहान मुलांचे घरात मन रमवा

लॉकडाऊनदरम्यान अशा प्रकारे लहान मुलांचे घरात मन रमवा

Subscribe

सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत लहान मुलांना घरी ठेवणे फार कठीण असते. त्यांना सतत बाहेर जाऊन खेळण्याची सवई असते. मात्र लॉकडाऊन दरम्यान बाहेर खेळायला जाण्यास सक्त मनाई असते. त्यामुळे घरी बसून आता लहान मुले खूप कंटाळत असतील. म्हणून अशा परिस्थितीत त्यांच्यासोबत काय करायचे याच्या खास टिप्स तुमच्यासाठी…

तुम्ही तुमच्या मुलांसोबत दररोज कोणते तरी झटपट तयार होतील असे पदार्थ बनवा. त्याच्या आवडतीच्या पदार्थांना प्रथम प्राधान्य द्या. त्यामुळे मुलांना त्यांच्या आवडीचे पदार्थ करण्यात मज्जा येईल आणि त्यांचा यामध्ये वेळेही निघून जाईल.

- Advertisement -

जेव्हा तुम्ही जेवण बनविण्यासाठी जाल तेव्हा तुम्ही मुलांना घेऊन जा. त्यांना भाज्या किंवा फळे धुण्याची कामे द्या. तसंच जेवण बनवताना त्यांना त्या पदार्थापासून शरीराला होणारे फायदे सांगा.

तसंच मुलांना तुमचे अनुभव आणि वेगवेगळ्या गोष्टी सांगा. मुलांशी मित्र किंवा मैत्रीण असल्यासारखे बोला. त्यामुळे मुले देखील तुम्हाला त्याचे अनुभव सांगितली.

- Advertisement -

मुलांना दररोज चित्र काढायला सांगा. चित्र काढताना तुम्ही देखील मदत करा. तसंच मुलांना जे आवडेल ते करायला द्या.
घरातील साफ-सफाई करण्यासाठी मुलांची मदत घ्या. तसंच त्यांना घरातील वस्तू नीट आणि कशा ठेवायच्या याची त्यांना माहिती द्या. अशा प्रकारे मुलांना घरी कोणत्या तरी गोष्टीमध्ये गुंतवूण ठेवा. जेणे करून ते घरी कंटाळणार नाहीत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -