घरलाईफस्टाईलडोळ्यात काजळ घालण्याची फॅशन !

डोळ्यात काजळ घालण्याची फॅशन !

Subscribe

माणसाच्या चेहर्‍यामध्ये डोळ्यांची महत्त्वाची भूमिका असते. समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यांना काजळ लावलेलं असेल तर ते डोळे दिसायला आकर्षक वाटतात. बहुतेक मुलीचे डोळे ‘कजरारे’ दिसतात. दृष्ट लागू नये यासाठी लावलं जाणारं काजळ आज फॅशन बनलं आहे.

काजळ लावताना काय काळजी घ्यायची ते पाहूया
काजळ भरलेले डोळे कोणाला आवडत नाहीत? वाईट नजरेपासून वाचवणारं काजळ डोळ्यांचं सौंदर्य वाढवतं. सुंदर चेहरा, आकर्षक डोळे आणि डोळे आकर्षक बनवण्यासाठी लावलेलं काजळ पहायला सर्वांनाच आवडतं. शाळा, कॉलेजपासून ऑफिसपर्यंत मुली-महिलांमध्ये डोळ्यांना काजळ लावायची फॅशन आहे. बदलत्या काळात आपल्या डोळ्यांना काजळाच्या सहाय्याने सॉफ्ट लूक कसा देता येईल ते पाहूया…

दहा रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंत काजळ
बाजारात अनेक कंपन्यांनी काजळ उपलब्ध केलं आहे. अगदी दहा रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंत काजळ उपलब्ध आहेत. तुम्ही घरीही काजळ बनवू शकता. बाजारात काजळ अनेक रुपात मिळतं. आपल्या सोयीनुसार पेन्सिल, लिक्विड आणि सॉलिडसारख्या रूपात तुम्ही ते घेऊ शकता.

- Advertisement -

काजळ कसं लावाल?
बोटांच्या पुढील भागाने डोळ्यांच्या खालच्या पापणीवर काजळ लावलं जातं. हे काजळ वरच्या पापणीलाही लावतं तर तुमच्या चेहर्‍याचं सौंदर्य आणखी उठून दिसेल.काजळ लावताना डोळ्यांच्या सुरूवातीपासून मध्यापर्यंत फिकट काजळ लावा. यानंतरच्या पुढील भाग गडद काजळ लावा. यामुळे तुमच्या डोळ्यांना सॉफ्ट लूक मिळेल आणि ते मोठेही भासतील.

 चेहरा पाण्याने स्वच्छ धुवाकाजळ लावण्यापूर्वी डोळ्यांसहित सर्व चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे चेहरा स्वच्छ होईल. काजळ लावण्यापूर्वी आपल्या डोळ्यांच्या चारही बाजूला कोरडेपणा आहे, असं भसल्यास चारही बाजूला मॉईश्चरायजर लावूनच काजळ लावा.डोळ्यांच्या लांबीनुसारच काजळ लावा. डोळ्यांच्या जास्त बाहेर किंवा डोळ्यांच्या मध्ये अर्धवट काजळ लावलं जाणार नाही याकडे लक्ष द्या.

- Advertisement -

फ्रिजमध्ये थंड करून घ्याकाजळ लावण्यापूर्वी ते फ्रिजमध्ये थंड करून घ्या. यामुळे तुमच्या डोळ्यांना गारव्याबरोबरच ताजेपणाही वाटेल. शरीरातील उष्णतेमुळे काजळात असलेल्या वॅक्सवर परिणाम होतो आणि काजळ पसरतं. अशा वेळी सोबत काजळ आणि एक छोटा आरसा ठेवा. काजळ पसरलं तर ते सहज काढता येईल आणि पुन्हा नवं काजळ लावता येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -