घरताज्या घडामोडीश्रावण, नागपंचमी, रक्षाबंधन आणि बरंच काही...

श्रावण, नागपंचमी, रक्षाबंधन आणि बरंच काही…

Subscribe

'हे' आहेत ऑगस्ट महिन्यातील प्रमुख सण-उत्सव.

मराठी वर्षातील सर्वाधिक व्रत-वैकल्य, उपास आणि अतिशय शुभ मानला जाणारा महिना म्हणजे श्रावण. श्रावण महिन्याला येत्या ९ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. या श्रावण महिन्यासह इतरही महत्त्वाचे सण-उत्सव आहेत. ज्यामुळे ऑगस्ट महिना बहरला आहे. यंदाच्या ऑगस्ट महिन्यात कोणकोणते सण आले आहेत जाणून घ्या.

कमिका एकादशी

- Advertisement -
  • आषाढ महिन्यातील वद्य पक्षात येणारी एकादशी कमिका एकादशी म्हणून ओळखली जाते.
  • यादिवशी श्रीविष्णूंच्या आराधना, उपासनेसाठी उत्तम आणि शुभ दिवस म्हणून मानला जातो.
  • बुधवारी, ४ ऑगस्ट रोजी कमिका एकादशी आली आहे.

दीप अमावास्या

  • चातुर्मासातील पहिली अमावास्या म्हणून आषाढ अमावास्येकडे पाहिले जाते.
  • कुटुंबाला सुख, शांती, समाधान लाभावे याकरता अमावास्या आणि पौर्णिमेला रात्री दीपपूजन केले जाते.
  • यंदा, रविवारी ८ ऑगस्ट रोजी दीप अमावास्या आहे.

श्रावण मास

- Advertisement -
  • मराठी वर्षातील सर्वाधिक व्रत-वैकल्य आणि अतिशय शुभ मानला जाणारा महिना म्हणजे श्रावण.
  • सोमवार, ९ ऑगस्टपासून श्रावणाला सुरुवात होत आहे.
  • या महिन्यात शंकराची उपासना केली जाते.

नागपंचमी

  • श्रावण महिन्यातील नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
  • यंदा शुक्रवार, १३ ऑगस्ट रोजी नागपंचमी साजरी केली जाणार आहे.

पुत्रदा एकादशी

  • श्रावण महिन्याच्या शुद्ध पक्षात येणारी एकादशी पुत्रदा एकादशी म्हणून साजरी केली जाते.
  • यंदा बुधवारी, १८ ऑगस्ट रोजी पुत्रदा एकादशी साजरी केली जाणार आहे.

रक्षाबंधन

  • श्रावण पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.
  • यंदा, रविवारी २२ ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे.
  • यादिवशी समुद्राला श्रीफळ अर्पण करुन त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते.
  • यादिवशी बहिण आपल्या लाडक्या भावाला राखी बांधते.

श्रीकृष्ण जयंती

  • श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला म्हणून हा दिवस श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो.
  • यंदा, सोमवारी ३० ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जयंती साजरी केली जाणार आहे.

गोपाळकाला

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -