घरताज्या घडामोडीHair care Tips : हिवाळ्यात डॅंड्रफपासून सुटका हवीय? ; करा 'हा' उपाय

Hair care Tips : हिवाळ्यात डॅंड्रफपासून सुटका हवीय? ; करा ‘हा’ उपाय

Subscribe

हिवाळा ऋतू जवळ आला की आरोग्याच्या समस्याही वाढतात.त्यामुळे अनेकजण आपल्या जीवनशैलीत बदल करतात. याशिवाय हिवाळ्यात केस गळणे आणि कोंडा यासारखीही समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होते. अशा स्थितीत या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी कढीपत्त्याचा हेअर मास्क तयार करू शकताकढीपत्त्यात अँटी-फंगल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे केसांना कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून वाचवतात.जाणून घ्या कढीपत्त्याचा काय आहे उपाय.

कडुलिंबाचे तेल आणि कढीपत्त्याने हेअर मास्क बनवा

कढीपत्ता घेऊन त्याची पेस्ट बनवा. या पेस्टमध्ये कडुलिंबाचे तेल घालून ते चांगले मिसळा आणि केसांना लावा. १ तास असेच राहू द्या आणि नंतर केस धुवा. हे केसांना कोंड्याच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करते. यासोबतच केस चमकदार होण्यास मदत होते.

- Advertisement -

आवळा, मेथी आणि कढीपत्ता घालून हेअर मास्क बनवा

हा हेअर मास्क बनवण्यासाठी आधी कढीपत्ता घ्या. सर्व प्रथम हे पान बारीक करून पेस्ट बनवा. त्यानंतर आवळा पावडर, मेथीची पूड आणि कांद्याचा रस मिसळा. हे सर्व मिसळून पेस्ट बनवा आणि डोक्यावर ३० मिनिटे लावा. त्यानंतर कोमट पाण्याने केस धुवा. लक्षात ठेवा की केस धुताना कोणत्याही प्रकारचे शॅम्पू वापरू नका. आठवड्यातून दोनदा वापरल्यानंतरच तुम्हाला फरक दिसू लागेल.

कढीपत्ता आणि दही घालून केसांचा मास्क बनवा

हा हेअर मास्क बनवण्यासाठी प्रथम कढीपत्त्याची पेस्ट घ्या. त्यात २ चमचे दही घाला. ते तुमच्या केसांच्या संपूर्ण लांबीवर लावा आणि २० मिनिटे सोडा. यानंतर केस कोमट पाण्याने  धुवा. तुम्ही हे आठवड्यातून तीन वेळा वापरा. यामुळे कोंड्याची समस्या पूर्णपणे दूर होईल. यासोबतच कोंडा परत येऊ देत नाही.

- Advertisement -

 


हे ही वाचा – Health Tips : थंडीच्या महिन्यात सुकामेवा खा अन् ठणठणीत रहा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -