घरलाईफस्टाईलमकरसंक्रात स्पेशल : तिळगुळ खा, आरोग्य सुदृढ ठेवा!

मकरसंक्रात स्पेशल : तिळगुळ खा, आरोग्य सुदृढ ठेवा!

Subscribe

जाणून घ्या तिळगुळाचे आरोग्यदायी फायदे

मकरसंक्रात हा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अवघे काही दिवसच राहिले आहेत. त्यामुळे घराघरातील सर्वच गृहिणी तिळगुळाचे लाडू बनवण्यात व्यस्त झाल्या आहेत. तिळगुळाचे लाडू बनवण्याची त्यांची लगबग सुरु झाली आहे. मात्र, हे तिळगुळाचे लाडू जरी मकरसंक्रातीकरता बनवले जात असले तरी देखील त्यांचे आरोग्याकरता असंख्य असे फायदे आहेत. चल तर जाणून घेऊया तिळगुळाचे आरोग्यदायी फायदे.

शरीरात उष्णता वाढवण्यासाठी

- Advertisement -

मकरसंक्रात हा सण थंडीच्या दिवसात येतो. त्यामुळे या दिवसाच शरीराला उष्णतेची फार आवश्यकता असते. दरम्यान, तिळामध्ये निसर्गत: उष्ण गुणधर्म असतात. त्यामुळे अनेकदा हिवाळ्यामध्ये तिळाचे सेवन केले जाते. त्यामुळे जर तिळ आणि गुळ एकत्र करुन तयार झालेले लाडवाचे सेवन केल्यामुळे शरातील उष्णता वाढते.

सौंदर्य वाढविण्यासाठी

- Advertisement -

तिळामध्ये शरीरासोबतच सौंदर्याला आवश्यक असणारी पोषक तत्वे असतात. त्यामुळे तिळगुळाचे लाडू खाल्ल्यास थंडीमध्ये रुक्ष झालेली त्वचा निरोगी राहण्यास मदत होते आणि त्यामुळे सौंदर्य वाढण्यास देखील मदत होते.

हृदयाचे आरोग्य

तिळामध्ये अस्तित्वात असलेले पौषक तत्व कॅल्शिअम, आयर्न, मॅग्नेशिअम, झिंक आणि सेलेनियम इत्यादी हृदयासाठी फायदेशीर ठरतात. तसेच जेवण तयार करताना तिळाच्या तेलाचा वापर केल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासही मदत होते. त्यामुळे निरोगी हृदयासाठी तिळाचे सेवन करणे फार फायदेशीर आहे.

कॅन्सरपासून बचाव

एका संशोधनामध्ये असे समोर आले आहे की, तिळामध्ये सेसमीन नावाचे एक अ‍ॅन्टीऑक्सिडंट आढळून येते. जे कॅन्सरच्या पेशींची वाढ रोखण्याचे काम करतात. यामुळे लंग कॅन्सर, पोटाचे कॅन्सर, ल्यूकेमिया, प्रोटेस्ट कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर यांसारख्या कॅन्सरवर परिणामकारक ठरतात.

डी – जीवनसत्त्व मिळते

अनेकजण थंडीमध्ये व्यायाम किंवा मॉर्निंग वॉक करण्यासाठी जात नाहीत. मात्र, मकरसंक्रातीच्या निमित्ताने अनेक तरुणपिढी मकरसंक्रातीनिमित्त पतंग उडवण्यासाठी घराबाहेर पडतात. त्यामुळे त्यांच्या शरीराला आवश्यक असणारे डी – जीवनसत्त्व सहजरित्या सूर्याच्या किरणापासून मिळते. त्यामुळे मकरसंक्रातीच्या दिवशी तरी पतंग उडविण्याच्या निमित्ताने घराबाहेर पडा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -