घरलाईफस्टाईलवातावरण बदलामुळे सर्दी, खोकला होतोय?

वातावरण बदलामुळे सर्दी, खोकला होतोय?

Subscribe

सर्दी - खोकल्यावर रामबाण उपाय

बऱ्याचदा वातावरणात होणारा गारवा, मध्येच होणारी उष्णता. यामुळे नागरिक प्रचंड हैराण होतो. तसेच सतत होणाऱ्या बदलामुळे सर्दी, खोकला असे आजार देखील उद्धभवतात. मात्र, अशावेळी तुम्हाला डॉक्टरकडे न जाता घरच्या घरी सोपे आणि घरगुती उपचार करुन आजार बरा होऊ शकतो.

  • जवस आणि तीळ सम प्रमाणात भाजून घ्यावे. त्याची पूड तयार करून सकाळी आणि संध्याकाळी कोमट पाण्यात एक चमचाभर टाकून ते पिल्याने लगेच आराम मिळतो.
  • थोडीशी तुरटी तव्यावर भाजून घ्यावी. त्याची पावडर बनवून ती गुळासोबत नियमित सेवन केल्यास सर्दी, खोकला कमी होतो.
  • खोकला दूर करण्यासाठी एक कप पाण्यात एक आल्याचा तुकडा, चिमूटभर दालचिनी आणि ४- ५ काळे मिरे टाकून ते उकळून घ्यावे. ते कोमट झाल्यानंतर गाळून त्यात एक चमचा मध टाकून त्याचे सेवन करावे यामुळे आराम पडतो.
  • एक चमचा कांद्याच्या रसात मध मिसळून ते रोज सकाळी उपाशीपोटी घेतलाने लगेच आराम मिळतो.
  • लसणाच्या ३-४ पाकळ्या आणि अर्धा चमचा हळद एक ग्लास दुधामध्ये टाकून ते उकळा आणि रात्री झोपण्याआधी ते प्यावे. यामुळे आराम मिळतो.
  • कपभर पाण्यात ४-५ लवंग टाकून ते उकळून घा. कोमट झाल्यानंतर त्यात अर्ध लिंबू पिळा. मग त्यात एक चमचा मध मिसळून ते प्यावे.
  • मोहरीच्या तेलामध्ये ४-५ पाकळ्या लसूण टाकून ते गरम करून घ्या. ते कोमट झाल्यानंतर पायाच्या तळव्यांवर आणि छातीवर लावून मालिश करा.
  • १ कप पाण्यात अर्धा चमचा ज्येष्ठमधाची पावडर आणि ८-१० तुळशीची पाने टाकून ते उकळून घ्या. कोमट झाल्यानंतर ते चहासारखे प्यावे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -