घरलाईफस्टाईलआरोग्याच्या दृष्टीने उत्तम बर्फी

आरोग्याच्या दृष्टीने उत्तम बर्फी

Subscribe

आरोग्यासाठी थुली ही बर्फी पौष्टिक आहे. या बर्फीमध्ये व्हिटामिन, फायबर, लोह, पोटॅशिअम, प्रोटीन, मॅनरल्स, मॅग्नीशयम, फॉस्फोरस या सारख्या गोष्टी आहे. आज तुम्हाला सोजीच्या वड्या (बर्फी) कशा तयार करतात हे सांगणार आहोत.

साहित्य

१५० ग्रॅम थुली, १०० ग्रॅम दूध, २५० ग्रॅम साखर, १०० ग्रॅम तूप, २५० ग्रॅण खवा, १ चमचा चारोळी, १५ काजूचे काप, अर्धा चमचा वेलची पुड आणि ७ कापलेले पिस्ता.

कृती

  • सर्वप्रथम एका पॅनमध्ये तीन चमचे तूप घाला. मग त्यामध्ये थुली घालून परतून घ्या.
  • एका जाडसर कडईमध्ये दूध उकळवून घ्या. जेव्हा दूधाला उकळली येईल तेव्हा परतवलेली थुली त्यात घाला. दूध आटेपर्यंत या मिश्रणाला मंद साचेवर हालवत राहा.
  • त्यात आता खवा, साखर, वेलची पूड, काजू, चारोळी घालून घ्या.
  • १५ मिनिटे हे सर्व मिश्रण हालवून घ्या आणि नंतर गॅस बंद करा.
  • एका सपाट भांड्यात तूप लावून ते मिश्रण पसरवून घ्या. जेव्हा हे मिश्रण गार होईल तेव्हा त्याच्या तुम्हाला हव्या त्या आकारात वड्या कापून घ्या.
  • त्यानंतर वरून बारीक काप केलेले पिस्ता पसरवा. या झाल्या थुली बर्फी किंवा सोजीच्या वड्या.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -