घरलाईफस्टाईलतेलकट त्वचेसाठी घरगुती उपाय

तेलकट त्वचेसाठी घरगुती उपाय

Subscribe

महिला असो वा पुरुष प्रत्येक जण आपण जास्तीत जास्त सुंदर कसे दिसू याचा प्रयत्न करत असतात. प्रत्येकाला वाटत असते आपल्या चेहर्‍यावर पिंपल्स, डाग, सुरकुत्या नसावेत आणि तेलकट किंवा शुष्क त्वचा नसावी. यामुळे आपल्या चेहर्‍यावर पिंपल्स, सुरकुत्या, डाग पडतात. या समस्या दूर करण्यासाठी खूप सारे घरगुती उपाय आहेत. ज्यामुळे आपण चेहर्‍याची तेलकट त्वचा व इतर समस्यांवर उपाय करू शकता. यामुळे आपली त्वचा सुंदर आणि नितळ होण्यास मदत होईल. तेलकटपणा दूर होईल. जर आपली त्वचा तेलकट असेल किंवा शुष्क असेल तर याच्यावर वेगवेगळे उपचार आहेत.

* काकडी, बटाटा हे एकत्र मिळवून आपल्या चेहर्‍यावर लावल्यास आपल्या त्वचेतील तेलकटपणा कमी होईल.

- Advertisement -

लिंबाचा रस, पुदिन्याचा रस आणि मध हे तिन्ही एकत्र करून एक लेप तयार करा आणि हा लेप आपल्या चेहर्‍यावर लावा. आपली त्वचा चमकदार होईल आणि चेहर्‍यावरील डाग, पिंपल्स कमी होतील.

*चंदन एक आयुर्वेदिक औषधी झाड आहे. जर आपण चंदन, हळद आणि मुलतानी माती एकत्र करून लेप बनवून चेहर्‍यावर लावत असाल तर आपली तेलकट त्वचेची समस्या दूर होईल. कारण यामध्ये चेहर्‍यात असलेला ओलावा रोखण्याची क्षमता असते. यामुळे आपल्या चेहर्‍यावर एक चमक येते.

- Advertisement -

*दहीच्या वापराने देखील आपली तेलकट त्वचेची समस्या दूर करू शकतो. यासाठी चेहर्‍यावर १५ मिनिटांसाठी दही लावून ठेवा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्या.

*तसेच दही, तांदळाचे पीठ, बेसन आणि हळद मिळवून पेस्ट बनवा आणि ही पेस्ट आपल्या चेहर्‍यावर चांगल्या प्रकारे लावा. यामुळे आपल्या त्वचेतील तेलकटपणा दूर होईल आणि त्वचा चमकदार होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -