घरलाईफस्टाईलउन्हाळा करा ‘थंडा थंडा - कुल कुल’

उन्हाळा करा ‘थंडा थंडा – कुल कुल’

Subscribe

दरवर्षीप्रमाणे कडक उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. हवामानातील बदलांमुळे विविध प्रकारचे आजारदेखील उद्भवतात. डोक्यावर तळपता सूर्य, शरीरातून टपकणार्‍या घामाच्या धारा, अंगाची होणारी लाही लाही आणि घशाला सतत पडणारी कोरड या सगळ्यामुळे जीव अगदी हैराण होतो. अशावेळी थंड पेयाचे सेवन करावेसे वाटते. मात्र, बंद पॅकेटमधील पेय शरीरास घातक ठरतात. मात्र, घरच्याघरी तयार करण्यात आलेल्या पेयांचे सेवन नेहमीच शरीरास उत्तम. अशीच काही खास घरगुती पेय पाहणार आहोत.

*लिंबू सरबत हे घरच्या घरी तयार करता येणारे पेय असून, यामुळे भूकदेखील वाढते. तसेच हे पचण्यास पाचक असे पेय आहे.

- Advertisement -

*अ‍ॅसिडीटीवर कोकम सरबत हा एक रामबाण उपाय असून, हे पेय घरच्या घरी बनवून ठेवतादेखील येते.

*आवळा सरबत हे वात, पित्त, कफ कमी करणारे पेय असून, हे थंड पेय शरीरास लाभदायक ठरते.

- Advertisement -

*गोड, थंड, पचायला हलके, भूक वाढविणारे, तहान शमविणारे, शरीराला ताकद देणारे आणि लघवीला साफ करणार्‍या नारळाच्या पाण्याचे उन्हाळ्यात सेवन करावे.

*दह्यापासून ताक बनवणे अगदी सोपे असून, त्यात थोडीशी जिरेपूड घालावी, यामुळे जेवणदेखील चांगले पचते.

*मनुका गरम पाण्यात भिजवून काही काळ ठेवून नंतर कुस्करून गाळून ते पाणी प्यावे. यामुळे थकवा, चक्कर, शरीराची आग कमी होण्यास मदत होते.

*उन्हाळ्यात मूतखड्याचा त्रास अधिक चाळवतो. अशावेळी एक ग्लास पाण्यात १ चमचा धणे आणि १ चमचा ओवा रात्री कोमट पाण्यात भिजवून सकाळी वस्त्रगाळ करून ते पाणी सलग २१ दिवस प्यायल्यास मूतखड्याचा त्रास कमी होतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -