घरलाईफस्टाईलपायांच्या थकव्यासाठी घरगुती उपाय आणि अशा बदला मुलांच्या सवयी

पायांच्या थकव्यासाठी घरगुती उपाय आणि अशा बदला मुलांच्या सवयी

Subscribe

सध्याच्या धावपळीच्या युगात प्रचंड वेगाने काम करावे लागते. अशा वेळी चालण्याने किंवा सतत एका जागेवर उभे राहिल्याने पायाला थकवा जाणवू लागतो. या परिस्थितीत घरगुती उपायांनी सुद्धा आराम मिळू शकतो. एखादे वेळी पायाचे दुखणे वाढून ते गुडघ्यापर्यंत पोहोचते. त्यामुळे गुडघे दुखू लागतात.

अशा वेळी एक टेबल घेऊन एक पाय जमिनीवर आणि दुसरा टेबलावर सरळ ठेवावा. पाठीत थोडं वाकून हाताने टेबलावरील पायाचा अंगठा पकडण्याचा प्रयत्न करावा. ही क्रिया पाच सेकंदांपर्यंत करावी. त्यानंतर पायाची अदलाबदल करावी. हात पायाच्या अंगठ्यापर्यंत पोहोचले नाहीत, तरी ते शक्य तेवढे लांबावेत. पायांना नियमितपणे मालिश केल्यानेही पायांचा थकवा दूर होतो. मात्र मालिश करताना चांगल्या प्रकारचे कोल्ड क्रीम किंवा खोबरेल तेलाचा वापर करावा. मालिशमुळे रक्ताभिसरण उत्तम प्रकारे होऊन स्नायूंना आराम मिळतो.

- Advertisement -

पायांवर अथवा पायांच्या बोटांना सूज आली असेल, तर कोमट पाण्यात थोडे मीठ टाकावे. त्या पाण्यात सुमारे दहा मिनिटे पाय ठेवावेत. पायांची सूज आणि थकवा दोन्ही कमी होतात. पायांना थकवा जाणवू नये म्हणून खूप कडक किंवा उंच टाचांच्या चप्पल किंवा सँडल्स वापरणे टाळावे.

अशा बदला मुलांच्या सवयी 

बर्‍याच लहान मुलांना अंगठा चोखण्याची सवय असते. काहींची ही सवय बरेच दिवस कायम राहते. अशा वेळी धाक दाखवणे, शिक्षा करणे, एखादी चापटी मारणे, चारचौघात टीका करणे आदी उपाय केले जातात. पण त्यामुळे मुलांवरील ताण वाढतो. म्हणूनच अंगठा चोखण्याची सवय घालवण्यासाठी पालकांनी संयम ठेवावा. मुलांवर कुठल्याही प्रकारचा ताण येणार नाही याची काळजी घ्यावी.

- Advertisement -

मुलं स्तनपान करणारी असली तर हळूहळू ही सवय कमी करावी. मुलांची उपेक्षा करू नये अथवा त्यांच्या मनात भीती उत्पन्न होईल अशी कृती करू नये.

मुलांना जवळ घेऊन समजुतीच्या स्वरात याचे तोटे सांगावेत. मुलांना विविध खेळात आणि इतर अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये सतत गुंतवून ठेवावं. बराच वेळ अंगठा तोंडात गेला नाही तर शाबासकी द्यावी आणि एखादी भेटही द्यावी. मूल मोठं असेल तर त्याच्या समोर आरसा ठेवावा आणि अंगठा चोखताना तू कसा वाईट दिसतोस, हे दाखवावं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -